पुणे : दिवसेंदिवस औषधांची गरज वाढत असून औषधी वनस्पती मात्र कमी होत आहेत. त्यामुळे येणा-या काळात या औषधी वनस्पतींचे महत्व वाढत जाणार आहे. शेतक-यांना या औषधी वनस्पती नर्सरीतून(रोपवाटीका) Medicinal Plants Nursery चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
सर्पगंधा, सफेद मुसळी, अनंतमुळ, शतावरी होतेय दुर्मीळ
भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे 7,000 कोटींची उलाढाल आहे. जंगल हे औषधी वनस्पतीचे नैसर्गिक भांडार आहे. औषधी वनस्पतीपैकी 90 टक्के वनस्पती ह्या जंगलातूनच गोळा केल्या जातात. त्यापैकी सुमारे 48 टक्के वनस्पती औषधी निर्मितीसाठी समूळ उपटल्या जातात. त्यामुळे सर्पगंधा, सफेद मुसळी, अनंतमुळ, शतावरी, खाजकुहिली, रक्तचंदन आदी वनस्पती दुर्मिळ होत आहेत.
वनौषधीची लागवड करण्यासाठी रोपांची, बियाण्याची अथवा लागवड योग्य वनस्पतीच्या भागांची नर्सरीत निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रजातीची निवड, त्याची मागणी, दर इत्यादी माहिती असणे गरजेचे आहे. औषधी वनौषधीची वेगळी नर्सरी स्थापन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे त्याबाबत नेमके मार्गदर्शन केले जाते.
Medicinal Plants Nursery औषधी वनस्पती नर्सरीसाठी आवश्यक गोष्टी
औषधी वनस्पतींची नर्सरी सुरू करण्यासाठी ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या भागात मागणी हवी किंवा आपल्याला परिसरातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना फायदेशीर औषधी वनस्पती लागवडीकडे वळवता यायला हवे. ज्या भागात मोठ्या प्रमाणावर वनौषधी लागवड होत आहे, अशा ठिकाणापासून मध्यवर्ती ठिकाणी नर्सरी उभारावी. नर्सरीत त्या भागातील मागणीनुसार वेगवेगळ्या प्रजातीची रोपे तयार करावी.
क्षेत्र : निच-याची जमीन निवडावी, उतार 1 ते 3 टक्के असावा.
पाणी व्यवस्थापन : नर्सरीच्या ठिकाणी बारमाही पाणी पुरवठा असावा. तसेच पाण्याची टाकी, तुषार सिंचन इत्यादी असावे.
कुशल मजूर : बिजप्रक्रीया, कलम बांधणे, कंदाचे विभाजन करणे, पिशव्या भरणे, पाणी देणे ही कामे कुशल मजुरांकडून करावी.
संसाधने : नर्सरीसाठी या साधनांची गरज भासते. त्यामध्ये चांगली पोयटामाती, वाळू, खते, बियाणे, मातृवृक्ष, ट्रॅक्टर, असणे आवश्यक आहे.
प्रजातीची निवड : प्रजातीची निवड करतेवेळी स्थानिक मागणी असलेल्या जातीची निवड करावी. नर्सरीमध्ये त्या हवामानात होणा-या प्रजातीची निवड करणे गरजेचे आहे.
औषधात मुळे वापरली जाणाऱ्या वनस्पतींना मागणी
सध्या वनौषधीची लागवड व्यापारी तत्त्वावर होत आहे त्याचप्रमाणे नर्सरी व्यवसायसुद्धा व्यापारी तत्वावर करणे गरजेचे आहे. ज्या वनस्पतीची मुळे औषधात वापरली जातात. त्या वनस्पती वारंवार लावल्या जातात, तसेच हंगामी वनस्पतीसुद्धा वारंवार लावल्या लागतात, अशा वनस्पतीची मागणी जास्त आहे.परंतु बहुवार्षिक वृक्षांची पाने औषधात वापरली जातात, अशा वनस्पतीची मागणी कमी असते.
रोपनिर्मिती अन् रोपांची उपलब्धता
वृक्ष वेली व झुडपे एकाच क्षेत्रात लावण्यायोग्य प्रजाती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळू शकतील. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या “औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पात” या बातमीतील छायाचित्रात नमूद केलेल्या औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र वनविकास महामंडळही करते मार्गदर्शन
महाराष्ट्र वनविकास महामंडळ अंतर्गत स्वतंत्र औषधी वनस्पती संवर्धन आणि विकास शाखाही आहे. त्याद्वारे विशेषत: ज्यांची मुळे आणि साल वापरतात अशा प्रजातींसाठी वनक्षेत्रातून या वनस्पती संकलन करणाऱ्यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. औषधी, सुगंधी, खाद्य आणि नैसर्गिक रंग देणाऱ्या वनस्पतींच्या लागवडीस प्रोत्साहनही दिले जाते. नाशिक, ठाणे, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या नर्सरी आहेत. या ठिकाणीही औषधी, सुगंधी वनस्पतींची रोपे व मार्गदर्शन मिळू शकते.
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी लागवड मंडळ (एमएसएच), हे राज्यस्तरीय मंडळ राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) अंतर्गत औषधी वनस्पतींशी संबंधित सर्व बाबींच्या समन्वयासाठी एक एजन्सी आहे.
Claim your super offer now; More than 100+ offers 👇
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Wow, प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची, प्रोसेस्ड फूड निर्यात 30% ने वाढली; अपेडाने जाहीर केली आकडेवारी
- बी.एस.सी. अॅग्री की बी.टेक. अॅग्री इंजिनिअरिंग? कृषी पदवीसाठी कोणता पर्याय अधिक उत्तम…
Comments 7