• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांनो असे करा आपत्कालीन पीक नियोजन – अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 14, 2022
in तांत्रिक
1
आपत्कालीन पीक नियोजन

आपत्कालीन पीक नियोजन

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तूर
* तूर हे पीक अति पावसाला संवेदनशील आहे म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहिलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. तूर पिकात फाईटोप्थेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी चारही बाजूने एक मीटर अंतरावर कार्बेन्डाझिम 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
* अतिपावसामुळे तूर, पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे.करिता शेताच्या एका बाजूने ङ आकाराचा 2 फुट चर खोदून ज्यादा पाण्याचा निचरा करावा.
* जिथे कुठे मर रोगाची किवा मुळकुजवा रोगाची सुरुवात होत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरिया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे.
* हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझियम 4 किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/NW6M1yxTidg

कापूस
* अतिपावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे.
* कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात एक ओळ सोडून लहान चर काढावेत.
* अकस्मिक मर किंवा मूळकुज दिसू लागल्यास कॉपरऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक युरिया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हे द्रावण झाडांच्या मुळा जवळ प्रति झाड 100 मिलि द्यावे. तसेच पीक 30 ते 40 दिवसांचे झाले असल्यास दोन टक्के युरीयाची फवारणी करावी. यासाठी 200 ग्रॅम युरिया प्रती दहा लिटर पाणी असे प्रमाण वापरावे.
* पिकाची वाढ पूर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पीक 40 ते 45 दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशी करिता 31 किलो तर बागायती कपाशी करिता 51 किलो निमकोटेड युरिया प्रति एकरी द्यावा.
* खत पाण्याचा निचरा झाल्यावरच द्यावे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केलेला कापूस सध्या पाते अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर पातेगळ होत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी एन ए ए या संजीवकाची 40 मिली प्रति 180 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकरी किंवा 2.5 मिली प्रतिदहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे पातेगळ थांबण्यास मदत होते.
* कपाशीवर रस शोषक किडी विशेषतः मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टिसीलियम लेकॅनी 40 ग्रॅम किंवा अ‍ॅसीटामिप्रीड (20 टक्के) 60 ग्रॅम किंवा डायमीथोएट (30 टक्के) 260 मिली प्रति एकर या प्रमाणे फवारावे.

NIrmal Seeds

आपत्कालीन पीक नियोजन

पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जास्त पाऊस आणि उशिरा झाल्याने खरीप ज्वारी, बाजरी, मुग ,उडीद,तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, मका इत्यादी पिकांना हानिकारक ठरला आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकास बसला आहे. अशा परिस्थितीत 15 ऑगस्ट नंतर कोणती पिके घ्यावीत याचे पिक नियोजन कसे असावे याचा विचार होणे गरजेचे आहे.
कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून, चार 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.
ऑगस्टचा दुसरा पंधरवडा – सूर्यफूल, तूर, एरंडी. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1)
सप्टेंबर पहिला पंधरवडा – रब्बी ज्वारी.
मराठवाडा विभाग
मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो.
* सप्टेंबर दुसरा पंधरवडा – रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल, हरभरा, जवस आणि गहू.
* ऑक्टोबर पहिला पंधरवडा – रब्बी ज्वारी, करडई आणि जवस गहू, रब्बी गहू.

* ऑक्टोबर दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा: हरभरा,करडई,जवस.गहू,रब्बीज्वारीआणिसूर्यफूल.

Ajeet Seeds

विदर्भ विभाग
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश होतो.कृषी हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश व जास्त पावसाचा प्रदेश अशा तीन उपविभागांमध्ये विभागला जातो. या तिन्ही उपविभागांत ढोबळ मानाने एकाच वेळी पाऊस पडतो.
* पीक उत्पादनातील (जोखीम) कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
* राज्य शासन राबवित असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येणार आहे. त्याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.
* मजूर कमतरता लक्षात घेता मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जात आहे.
पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे. पिकास पाणी द्यावे. आपापल्या विभागात प्रत्यक्षात पावसास होणारी सुरवात विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार शेतकर्‍यांनी पीक नियोजन करावे.
काही ठळक बाबी
* अति पावसाच्या( इगतपुरी, महाबळेश्वर, कोंकण, गोंदिया, भंडारा , सिंदेवाही ) प्रदेशात 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान हुलगा (कुलथी), Rice Bean, वाल, पावटा इत्यादी पिके घ्यावीत
* मध्यम पावसाच्या प्रदेशात तूर, सूर्यफूल,मका इत्यादी पिकांचे उशिरा पक्व होणारे वाण पेरावेत.
* कोरडवाहू भागात : तूर,मटकी, बाजरी इत्यादी पिकांचे उशिरा पक्व होणारे वाण पेरावेत.

डॉ. मधुकर बेडीस, डॉ. योगेश पाटील, श्री. कैलास महाले
कृषि तंत्र विद्यालय, जळगाव – 425001

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Wow, प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची, प्रोसेस्ड फूड निर्यात 30% ने वाढली; अपेडाने जाहीर केली आकडेवारी
  • नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार सर्वसमावेशक धोरण निश्चि

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंतरपीकआपत्कालीन पीक नियोजनकापूसकृषी हवामानशास्त्रतूरपीक नियोजनव्यवस्थापन
Previous Post

पाण्यात बुडणारी शहरे : आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच! A1 Solution

Next Post

Weather Warning…! पुन्हा एकदा पाऊस आला मोठा; आणखी 4 दिवस मान्सून पाऊस सक्रीय राहणार

Next Post
पाऊस आला मोठा 15 Sept Rain Alert

Weather Warning...! पुन्हा एकदा पाऊस आला मोठा; आणखी 4 दिवस मान्सून पाऊस सक्रीय राहणार

Comments 1

  1. Pingback: कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी - Agro World

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish