हैदराबाद : परदेशात चांगल्या नोकरीत राहूनही काही तरुणांना आपल्या गावाकडे जाऊन मायभूमीचे पांग फेडावे वाटतात. गावाकडे काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच जन्माला येतात प्रेरणादायी यशोगाथा. आधुनिक दुग्धव्यवसाय कसा करावा? हे दाखवून देणारा आयआयटी इंजिनियर किशोर इंदुकुरी यांचा सिदस् फार्म ब्रँड म्हणजे अशीच एक भन्नाट डेअरी फार्मिंग सक्सेस स्टोरी आहे.
Karnataka’s IIT Engineer Kishore Indukuri left lucrative US Job to Start Sid’s Farm Dairy, A Fantastic Dairy Farming Success Story
आजच्या युगात अनेक तरुणांचे स्वप्न असते ते आयआयटी, आयआयएम सारख्या मानांकित, दर्जेदार आणि अव्वल शिक्षण संस्थेतून पदवी मिळविण्याचे. त्यानंतर अनेकांना चांगली नोकरी मिळवून परदेशात सेटल व्हायचे असते. अनेक तरुण सातासमुद्रापार जाऊन आपल्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करतात, परंतु त्यांच्यापैकी बरेचसे हे या पैसे कमावणाऱ्या गर्दीचा एक भाग बनतात. कुठेतरी त्यांच्या इच्छा-आकांक्षा दडपल्या जातात. मात्र, काही ध्येयासक्त तरुणांना हा चाकोरीतला सुखकर, आलिशान प्रवास आकर्षक वाटत नाही. परदेशातही त्यांना मायभूमीची ओढ सतावत असते. त्यातलेच एक किशोर इंदुकुरी.
Kishore Indukuri Sid’s Farm Dairy
आधुनिक दुग्धव्यवसाय कसा करावा?
किशोर इंदुकुरी यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून गावातही डेअरी व्यवसाय कसा फुलवावा, हे दाखवून दिले आहे. अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते कर्नाटकातील आपल्या गावी परतले. फक्त 20 गायींनी त्यांनी सिद्धार्थ या मुलाच्या नावाने डेअरी फार्म सुरू केला. आता त्याची वार्षिक उलाढाल 44 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परदेशात नोकरी आणि जीवनासाठी धावधाव करीत असलेल्या तरुणांपुढे इंदुकुरी यांनी नवा आदर्श उभा केला आहे. आयआयटीयन असूनही त्यांनी मनाचे ऐकले, इतकेच नाही तर एक चांगला व्यवसायही उभारला. चला, जाणून घेऊया त्यांची यशोगाथा…
असा सुरू झाला प्रवास
इंदुकुरी हे मूळचे कर्नाटकातील. आयआयटी खरगपूर येथून त्यांनी इंजिनिअरिंग पदवी घेतली. नंतर उच्च शिक्षणासाठी, एमएस करण्यासाठी ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंदुकुरी अमेरिकन टेक कंपनी इंटेलमध्ये रुजू झाले. टॉप कंपनी, टॉप सोयी-सुविधा, लाखोंचा पगार अशी चांगली नोकरी असूनही त्यांचे मन मात्र तिथे रमतच नव्हते. नोकरीत त्यांचे काम उत्तम होते. उत्तम परफॉर्मन्समुळे चांगले ॲप्रायझल, प्रमोशन, मान-सन्मान मिळत होते. तरीही इंदुकुरींचे मन तृप्त नव्हते. अखेर इंटेलमध्ये सहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नोकरीचा निरोप घेतला आणि भारतात परतले.
अशा प्रकारे सुरू केला डेअरी फार्म
नोकरी सोडून इंदुकुरी हे भारतात, कर्नाटकातील आपल्या गावी परतले खरे; पण काय करायचे हे काही त्यांनी ठरविलेले नव्हते. आपल्या गावालगतच्या परिसरात, जिल्हाभरात नंतर राज्यातील शहरी-ग्रामीण भागात हिंडून त्यांनी अभ्यास केला. विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कुठल्याही सरकारी योजनेच्या भानगडीत पाडण्यात त्यांना रस नव्हता. या सर्व अभ्यास, निरिक्षणातून त्यांना लक्षात आले, की भारतात चांगल्या आणि निरोगी दुधाचे पर्याय फारच कमी आहेत. विशेषत: डेअरी फार्मची स्वच्छता म्हणावी तितकी चांगली नसते. उत्तम स्वच्छता, भेसळ नसलेल्या, उत्तम प्रतीच्या, दर्जेदार दुधाला मागणी भरपूर आहे; पण तशा निकषांवर आधारित उत्पादन होत नाही. ग्राहकांची जास्त पैसे मोजायचीही तयारी असते. त्यातून मग किशोर इंदुकुरी यांनी डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सिदस् फार्म हैदराबादचे प्युअर घी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा
20 गायींपासून सुरू झाला प्रवास
इतरांप्रमाणेच या यशाचा प्रवासही अगदी लहान गोष्टीपासूनच सुरू झाला. 2012 मध्ये त्यांनी फक्त 20 गायींच्या गुंतवणुकीने सुरुवात केली. आधी गायींचे स्वतः दूध काढण्यापासून ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व कामे ते स्वतः करत. विविध गोठ्यांना, डेअरी उद्योगांना भेटी देऊन इंदुकुरी यांनी सर्व कामे शिकून घेतली, माहिती जाणून घेतली. आयआयटीयन असून सुद्धा स्वतः कुठलेही काम करण्याची लाज त्यांनी बाळगली नाही. सरकारी अनुदान, योजनांचे लाभ घ्यायचे नव्हते; परंतु कार्यशाळातून तंत्र, बारकावे समजून घेतले. इंटरनेट, युट्यूबच्या माध्यमातून डेअरी उद्योगातील नवे तंत्रज्ञान आणि ट्रेंड्स त्यांनी अभ्यासले. हे सारे ज्ञान आपल्या डेअरी फार्ममध्ये अवलंबले. त्यातून मग सिदस् फार्म ब्रँड पुढे नावारूपाला आला.
अशाप्रकारे केली पहिली गुंतवणूक
किशोर इंदुकुरी सुरुवातीस पारंपरिक पद्धतीने कॅनमधून दूध साठवून वाटप करायचे. नंतर त्यांनी साठवणुकीसाठी घरातीलच फ्रीजचा वापर सुरू केला. चिलर, डीप फ्रीझर अशी छोटी गुंतवणूक सुरुवातीला केली गेली. नंतर त्यांनी आपल्या बचतीतून अत्याधुनिक स्टोअर सिस्टीम उभारण्यासाठी गुंतवणूक केली, ज्यामुळे दूध काढल्यापासून ते प्रसूतीपर्यंत दूध जास्त काळ टिकते. दूध खराब होण्याचा धोका टळून किपिंग क्वालिटी वाढली. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
डेअरी फार्मिंग सक्सेस स्टोरी : वार्षिक उलाढाल पोहोचली 44 कोटी वर
सुरुवातीला गावातच सुरू केलेला किशोर इंदुकुरी यांचा गोठा, डेअरी फार्म हे आता हक्काचे मोठे मार्केट असलेल्या हैदराबाद महानगराजवळ नव्या स्वरूपात विस्तारले आहे. त्याला एका ऑर्गनाईज्ड उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अवघ्या 10 वर्षात एव्हढी मोठी झेप हे इंदुकुरी यांच्या मेहनतीचे फळ आहे. 2018 पर्यंत हैदराबादच्या आसपासच्या सहा हजार ग्राहकांना दूध पुरवठा करणारा सिदस् डेअरी फार्म आता तब्बल 10,000 ग्राहकांना दुधाचा पुरवठा करत आहे. 44 कोटींच्या उलाढालीतही आता मोठी वाढ झाली असून ती 50 कोटी पार गेली आहे.
मुलाच्या नावावरून सिदस् डेअरी फार्म नाव
इंदुकुरी यांनी मुलगा सिद्धार्थ याच्या नावावरून आपल्या उद्योगाचे नाव हे सिदस् डेअरी फार्म असे ठेवले आहे. या सध्या डेअरी फार्ममध्ये 120 कायम कर्मचारी आहेत. शिवाय हंगामी व रोजंदारी कर्मचारी आणि विविध कंत्राटी सहकारी वेगळेच. गाय आणि म्हशीच्या दुधापासून इंदुकुरी यांनी सुरुवात केली होती. आता त्याशिवाय दूध पावडर (स्कीम्ड मिल्क), ए 2 दूध व इतरही अनेक प्रकारची प्रक्रिया उत्पादने बनवली जात आहेत. यामध्ये तूप, दही, सेंद्रिय पनीर यांचा समावेश आहे.
सिदस् डेअरी फार्म संपर्क क्रमांक :
08008002152 (फक्त व्हॉटस् अप)
04066588366 (डेअरी फार्म पाहणी चौकशी)
ई-मेल : [email protected]
वेबसाईट : https://www.sidsfarm.com/
तुम्हाला हेही वाचायला नक्कीच आवडेल; रिलेटेड स्टोरीज वाचण्यासाठी खालील संबंधित लिंकवर क्लिक करा 👇👇
Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
हर्बल फार्मिंग : कलियुगातील ‘संजीवनी’ असलेल्या ‘नोनी’ फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल दुप्पट नफा
https://eagroworld.in/10019/
Comments 4