पूर्वजा कुमावत
स्वप्नं पाहायला कोणतंही भांडवल लागत नाही, पण ती पूर्ण करायला मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास हवा असतो अशीच एक जालना जिल्ह्यातील व्यक्ती म्हणजेच अंकिता मोरे. शून्यावरून सुरुवात करून, त्यांनी कोंबड्यांच्या व्यवसायातून केवळ आर्थिक उन्नतीच नव्हे तर सामाजिक ओळखही मिळवली. आपल्या गावातील इतर तरुणांना व शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी त्या प्रेरणादायी ठरले आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने कसा फायदेशीर ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण अंकिता मोरे यांनी दिले आहे.

जालना जिल्ह्यातील गोलापांगरी गावातील अंकिता मोरे. याचं प्राथमिक शिक्षण इंटरनॅशनल स्कूल, जालना येथे झाल आहे व माध्यमिक शिक्षण हे जालन्यातील गोंदेगाव या गावात झाले. त्यांनी त्यांची डिग्री ही बी. एस. सी. एग्रीकल्चर खोंडी येथे केल. हल्ली त्या लॉ (Law) च शिक्षण घेता आहेत. अंकिता यांना बी.एस.सी. एग्रीकल्चर मध्ये अगोदर पासून ज्ञान होते. त्या आज 5 हजार कोंबड्यांचे पालन करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांना दाखवून द्यायचे आहे, की आपण आपल्या शेतीतून भरघोस नफा मिळवू शकतो.
नवीन सुरुवात
अंकिता मोरे या वयाच्या 18 वर्षापासून पोल्ट्री फार्म चालवत आहेत. 2020 ला कोविडमध्ये थांबलेला, दुकाने, वाहतूक व्यवस्था थक्क झालेले व संपूर्ण लोक आपापल्या घरात राहत. त्याचवेळी अंकिता मोरे यांनी स्वतःला सिद्ध केले व या कोरोना काळात त्यांनी घरच्या घरी उपाय शोधून पोल्ट्री उभारली. यामध्ये त्यांना त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील पाठिंबा देत होते. पोल्ट्री ची सुरुवात अंकिता मोरे व त्यांचे भाऊ रोहन मोरे या दोघांनी सुरू केली. अंकिता मोरे यांची पिढीजात शेती असल्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीतच रुजलेल आहे. त्यांच्याकडे एकूण 35 एकर शेती असुन त्यात त्यांनी विविध पीक घेतले जसे की मोसंबी साडेचार एकर मध्ये घेतले आहे व टरबूज, सोयाबीन, ऊस इत्यादी पिके ते घेतात.

शेडची उभारणी
सुरुवातीला त्यांच्याकडे गाईचा गोठा होता व तो गोठा रिकामा असायचा. त्याच गोठ्याला त्यांनी शेडमध्ये रूपांतरित केले. गोठ्याच्या आजूबाजूला जाळी लावून घेतली. चिक फीडर आणि पाणी पिण्याची टाकी त्यांनी आणली. पक्षी जास्त वाटल्यामुळे त्यांनी परत अजून त्यांच्या द्राक्षाच्या बागेतील इंगल वरती शेड तयार केले आणि त्यांना यामध्ये चांगला रिझल्ट मिळाला व खर्च कमी असल्यामुळे त्यांचा नफाही वाढला.
पक्षांची स्वतः ब्रूडिंग व लसीकरण करतात अंकिता मोरे यांना पोल्ट्री फार्म बद्दल संपूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आणलेल्या 500 पक्ष्यांचे ब्रूडिंग केली. ब्रूडिंग म्हणजे 21 दिवसाचा कालावधी असतो जिथे पक्षांना पंख येईपर्यंत त्यांना उब द्यावी लागते. छोटे पिल्लू आईच्या खाली बसतात ते पोल्ट्री फार्म मध्ये शक्य होत नाही त्यामुळे त्यांना आर्टिफिशिअल उब देऊन मोठे केले जाते. या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना 2 वेळा लसीकरणही करावे लागते. पहिले लसीकरण 14 व्या दिवशी व दुसरे लसीकरण 21 व्या दिवशी करावे लागते. गावरान कोंबड्यांमध्ये लसीकरणाच्या तारखा वेगवेगळ्या असतात. कोंबड्यांना गुंबोरो, लासोटा बूस्टर अशा प्रकारचे लसीकरण करावे लागते. अंकिता यांचे बी.एस.सी. एग्रीकल्चर झाल्यामुळे त्यांना या गोष्टीचे ज्ञान होते व कोविडमध्ये सर्व बंद असल्यामुळे व्हेटर्नरी डॉक्टर येत नसत त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन 500 पक्षांना लसीकरण केले. त्यानंतर त्यांचा हळूहळू 500 पक्षांचा प्रवास हा 1500 पक्षांवर आला व आता त्यांच्याकडे एकूण 5000 पक्षी आहेत.

पक्ष्यांचे खाद्य
अंकिता या स्वतः घरच्या घरी कोंबड्यांचे खाद्य तयार करतात. सुरुवातीला ते कोंबड्यांचे खाद्य बाहेरून मागवत असतात पण त्यांना ते परिवारात नव्हते व खर्चही जास्त होत होता. अंकिता म्हणतात की पोल्ट्रीमध्ये जेवढा खर्च कमी करणार तेवढे नफा आपल्याला जास्त मिळतो. म्हणून तर मी स्वतः खाद्य बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला ते कोंबड्यांना मक्याचा भरडा द्यायचं पण त्यांनी खाद्य पदार्थावर अभ्यास करून त्यात बदल केला. मक्याचा भरडा डीओसी (DOC) आणि त्यात 50% ग्रीन फॉडर म्हणजेच शेवग्याचा पाला, दुधीचा पाला आणि लसूण घास हे टाकतात. या खाद्यपदार्थात पक्षांना एक्स्ट्रा सप्लिमेंट द्यावे लागतात जसे की कॅल्शियम, प्रोटीन, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम इत्यादी.
पक्षांना खाद्य देण्याची वेळ
अंकिता यांनी पक्षांना वाढवण्यासाठी दोन मुलींना कामाला ठेवले आहेत. ते पक्षांना खाद्य सकाळ, दुपार, संध्याकाळ या 3 वेळेमध्ये देतात. तिघं वेळेला ते त्यांना लसूने घास कट करून टाकतात. मग एका दिवसाला या पक्षांना 2.5 क्विंटल खाद्य लागते. ओला चारा आणून ते मशीन मध्ये कुट्टी करून घेतात त्यानंतर त्याचे मशीनमध्ये दाणे बनवून पक्षांना खाण्यासाठी देतात. अंकिता या ते पक्षांना मोकळ्या हवेत ठेवतात जेणेकरून ते पक्षी शेतातील किडे आळी खाऊ शकतात. पक्षी मोकळ्या असल्यामुळे त्यांना आजारही लवकर होत नाही. त्यांनी त्यांच्या शेताच्या आजूबाजूला कंपाउंड करून माशांची जाळी लावून त्याला झटका मशीनही लावून घेतली आहे. जेणेकरून कुत्रे मांजर आत येणार नाही. ते पक्षी रात्रीच्या वेळेस शेवग्याच्या झाडावर झोपतात.
उत्पादन व विक्री उलाढाल
नफा सांगायचं म्हटलं तर एका पक्षीमागे त्यांना 600 रुपये नफा मिळतो. म्हणजे जर पक्षी कटिंग साठी असेल तर एका पक्ष्यांचा खर्च 100 रुपये होतो आणि त्यांचा एक पक्षी हा 700 रुपयाला विकला जातो म्हणजेच त्यांना एका पक्षी मागे 600 रुपये नफा मिळतो. आणि कोंबडी अंडी देणारी असली तर त्याचा दोन वर्षाचा खर्च मोजावा लागतो. एक कोंबडी साधारणता दोन वर्षापर्यंत अंडी घालते. एक कोंबडी वार्षिक 120 अंडी देते तर दोन वर्षात तिची 240 अंडी होतात. हे अंडी ते 15 रुपये प्रमाणे विकतात. यात त्यांना जवळजवळ एका कोंबडीचा खर्च चारशे रुपये होतो व नफा 2600 रुपये रुपये मिळतो. त्यांच्याकडे एकूण 5000 पक्षी आहेत, त्यापैकी 3000 पक्षी हे 2.5 महिन्यांचे आहेत. व 2000 पक्षी हे 6 महिन्यांच्या आहेत. त्यामध्ये 1200 कोंबड्या अंडी देणाऱ्या आहेत. दिवसाला त्यांच्या फॉर्ममध्ये 100 ते 120 अंडी निघतात आणि दिवसेंदिवस 15 ते 20 अंडी वाढत आहेत.
– अंकिता मोरे,
8956396699













