प्रतिनिधी/ पुणे
अरबी समुद्रातील पूर्व मध्य भाग व राज्याची किनारपट्टी या दरम्यान या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती व दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक व उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या वातावरणामुळे राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून (दि. १४ सप्टेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला आहे.
काय आहे वातावरण?
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्राच्या वायव्य परिसर ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. यासह उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या पुर्व मध्य आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे.
कुठे बरसणार वरुणराजा
सर्वप्रथम कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी केला असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात जोरदार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दि १४ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी तर १५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी कोकण , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यताही हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Joint this group
हे वर्ष शेतकरी साठी काहीतरी वेगळी दिशा दाखवेल काय हवामानाचे अंदाज सर्व फेल गेलेत कोणीही पुढील हंगामाचे नियोजन करण्याच्या तयारीत दिसत नाही खरीप पिकांचे नुकसान आणि रबी हंगामातील पिके कोणती घ्यावीत दोन्ही बाबी निसर्ग कृपेवर अवलंबून आहेत माझे वैक्तीक मत जर घेतले तर माझे शेतात मूग पीक पूर्ण गेले एकरी साधारण खर्च २०००० वाया गेला उत्पादन सोडा परंतु जास्त पावसामुळे नुकसान झाले ले पीक काढणीस किंवा जमिनीत गडण्याचे वेळ वाया गेली तरीही हार न मानता आमचे बंधू पुन्हा रबी पिकाचे नियोजन करत आहे परंतु आमच्या खानदेशात मूग वर आम्ही आमचे केळीचे नियोजन करत असतो मागील वर्षी ची केली लागवड चे पुढे काय होईल ते आणि कापूस पीक संरक्षण करणेची तारांबळ पाहता देव ही साथ देत नाही पाऊस थांबला वाटते तेवढ्यात आज ऍग्रो वन पेपर मधे पुढील हप्त्यात पाऊस अंदाज दाखवत आहेत उत्तर महाराष्ट्र मध्ये ही असो वेळेवर काय सुचेल ते शेतकरी करतो हे मात्र खरे कारण शास्त्रीय आणि संशोधन हे प्रयोग शाळेत कितपत यशस्वी होत आहेत ते ही कळत नाही या परिस्थितीत कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि विस्तार कार्य करते जर मनापासून साथ देतील कमी खर्चात जास्त उत्पादन पेक्षा आहे त्या परिस्थितीत काय करता येईल तो सल्ला शेतकरी ना देणे महत्त्वाचे असते.परंतु नुकसान भरपाई मिळावी म्हणून राजकीय आणि काही कर्ज घेणारे शेतकरी या परिस्थितीत मागणी ही करतात परंतु तुटपुंजी मदत मिळते ९०%शेतकऱ्यांना परंतु ज्यांनी विमा घेतलेले शेतकरी हे जास्तीत जास्त फायदा कसे मिळेल त्यासाठी सर्व तो परी पर्याय शोधत आहेत .शासन कधीही जे शेतकरी कर्ज मुक्ती पासून वंचित किंवा कर्ज n घेणारे घेणारे शेतकरी यांच्या बाबतीत कोणीही काहीही बोलत नाही .या मुळे शेतकऱ्यांना ही काही ना पैसे कमी मिळाले तर काहींना काहीच मिळाले नाही म्हणून नाराज होत असतात.
नैसर्गिक आपत्ती कुठेही असो राजकीय नेते दर वेळी आपल्या विभागात जास्त मदत कशी मिळेल ते पाहतात परंतु ज्या भागात नेते मंडळी व्यापारी वृत्तीची असतात ते व्यापाऱ्यांकडे लक्ष देऊन त्यांना ही मदत मिळावी म्हणून स्वार्थ साठी प्रयत्न करतात .शेवटी प्रत्येक माणूस आपले फायद्यासाठी राजकीय पक्षांनी दिल्या अस्वसान वर अवलंबून राहून मदत कधी मिळेल त्याची वात पाहत बसतो.
मात्र शेतकरी थांबत नाही काहीतरी करून पुन्हा आशेवर जगत असतो.निसर्ग साथ देईल आणि एक दिवस शेतकऱ्याचा येईलही परंतु तो दिवस ३०% शेतकऱ्यांना तारत असतो ७०%शेतकरी आपली इतर सर्व खर्च कमी करून आपले आयुष राम भरो से सोडत असतो. सद्या ची कोरोना परिस्थिती पाहिली तर सर्वात कमी मदत ही शेतकऱ्यांना मिळत आहे परंतु राजकारणी उद्योगपती यांनी कमाई असूनही सरकारी कोरोना मदत आपल्यात जास्त प्रमाणात खर्च करत आहेत शेतकरी मात्र नशिबाला दोष देऊन खर्चाने
रोग बरा करणेसाठी आयुष गुरफटलेले जगत आहे.