• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हार्वेस्टरच्या व्यवसायातून वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल

संधीचे सोने करण्यासाठी वयाचे बंधन नसते

Team Agroworld by Team Agroworld
July 8, 2021
in यशोगाथा
0
हार्वेस्टरच्या व्यवसायातून वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कालानुरूप आपल्याकडे शेतीत विविध बदल होत आहेत. त्यातील ठळक बदल म्हणजे शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनांचा मर्यादित वापर. राज्यात आता शेतीच्या कामासाठी अनेक बैल जोड्या ठेऊन संभाळणारे शेतकरी राहिले नाहीत. भलेही तो २५-३० एकर शेतीवाला जमीनदार असेल तरी तो ८ बैली नांगराने नांगरणी करण्याऐवजी जास्त अश्वशक्तीचे ट्रॅक्टर स्वतः खरेदी करतो किंवा भाडेतत्वावर लावून जमीन नांगरून घेतो. हाच बदल लक्षात घेत विविध शेतकऱ्यांनी अशी अवजारे भाडेतत्वावर देत एका नवीन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आपल्या शेतीला नवीन जोडव्यवसाय निर्माण केला आहे. असाच प्रयोग नवनाथ मुळे   यांनी केला हार्वेस्टरच्या व्यवसायातून ते वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल करत आहेत.

शेतीत विविध बदल घडत असतांना सन  २००० पासून पीक पद्धतीही बदलत गेली. पिकांच्या काढणीसाठी  बैलजोडीच्या वापर कमी होत जाऊन विविध मशिनरी आली. जसे की काढणी, मोडणी, मळणी करणारी वेगवेगळी मशिन्स आली. त्याचबरोबर एकत्रित  हे सर्व काम करणारे हार्वेस्टर सारखे मोठे मशिनही आले. पण तेव्हा हे मशीन चालवणारे बहुतेक सर्वजण राजस्थानी होते. हे मात्र फार कमी युवकांच्या लक्षात आले. पण किंमत जास्त असल्यामुळे व सतत कष्ट नको असल्यामुळे कोणीही त्याकडे वळले नाही. नेमके हेच एका चाळीशी उलटलेल्या तरुणाच्या लक्षात आले. साल २००९ तेथून प्रवास सुरु झाला एका जिद्दीचा. आता त्यांचे वय ५५ च्या जवळ असून १० वर्षात त्या शेतकऱ्यांने बँकेचे घेतलेले कर्ज १५ लाख रु. परतफेड करून २०२०/२१ मध्ये एक कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय.

अंबाजोगाईपासून १५ कि.मी. अंतरावर बीड जिल्ह्यात पैठण (सावळेश्वर) नावाचे एक गाव आहे. तेथे नवनाथ चौधरी यांचे चार भावांचे एकत्र कुटुंब आहे. कुटुंबात एकूण १२ एकर जमीन. चौघंही शिकलेले. एकजण बी.ए., दुसरा बी.एड. तर तिसरा एम.कॉम. चौथा पदवीधर. शेती पूर्ण कोरडवाहू. सर्वांची लग्ने झालेली. एक जालना येथे नोकरीस, दोघे शेतात तर एम.कॉम. झालेल्या भाऊने कृषी निविष्टाचे दुकान गावातच सुरु केले आहे. याचेच नाव नवनाथ मुळे. ५५ वर्षीय नवनाथ यांनी १९९६ मध्ये कृषी सेवा केंद्र सुरु केले होते. विविध कंपनीचे बियाणे, खते व औषधे विक्री करतांना त्यातून मिळणारे उत्पन्न खूप कमी असे. युरियाच्या एका गोणीमागे तर फक्त २ रु.च मिळत. खरीप व रब्बीचा हंगाम गेला की मग काहीच फारसे काम नसे. मात्र कृषि केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रयोगशील व आधुनिकीकरणाची कास धरणारे शेतकरी संपर्कात आले. त्यांच्या अडचणी माहिती होत गेल्या. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतांना हार्वेस्टर मशीनची गरज लक्षात आली. दरम्यान अशी

सेवा देणाऱ्याशी संपर्क आला आणि याबाबत प्राथमिक माहिती मिळाली.
पुरेसा नफा मिळत नसल्याने २००६ /२००७ नंतर कृषी निविष्ठांचा व्यवसाय बंद केला. शेती करावी तर पाणी नव्हते. पैठण गावाजवळून एक नदी वाहत असे तिला डिसेंबर पर्यंत पाणी असायचे. तेथून साडेपाच हजार फूट पाईपलाईन  टाकून (३ इंची ) शेतात पाणी आणले. शेतात एक विहीर ५० फूट खोल घेऊन त्यात ते पाणी
जमा करून खरीप/रब्बी पिके सोयाबीन, तूर, गहु, हरभरा, मका, ज्वारी अशी पिकं घेणे सुरु केले. पण मिळणारे उत्पन्न पुरेसे नव्हते. त्यांना हार्वेस्टर मशीन वरील राजस्थानी चालक पाहून विचार आला की या मशीनवर हे फक्त राजस्थानीच का असतात? आपले महाराष्ट्रीयन कामगार का नाहीत. यांच्या मालकीच्या या मशीन
का नाहीत.? अनेकांशी चर्चा केल्यानंतर आपण हे हार्वेस्टर मशीन घेण्याचा निर्णय झाला.

कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे
मार्गदर्शन
घरी सर्वांशी चर्चा करून जालना येथील नोकरी करणाऱ्या भावाकडून एक लाख रु. आणले. परभणी येथील हार्वेस्टर विक्रेता एजन्टशी संपर्क साधला. ते पैठणला आले. या काळात त्यांचा श्री. प्रमोद रेणापूरकर, तंत्रज्ञान प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, डिघोळअंबा यांचेशी संपर्क झाला. के.व्ही.के.येथे त्यांनी चौधरी यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बँक कर्जाबाबत मार्गदर्शनही केले. चौधरी यांनी हार्वेस्टरची संपूर्ण तांत्रिक माहिती घेतल्यानंतर त्या एजन्टला एक लाख रु.दिले व मशीन बुक केली. ऑगस्ट २०१० मध्ये एस.बी.एच. कडे कर्जासाठी अर्ज दिला. तो ऑक्टोबर महिन्यात मंजूर होऊन १० लाख रु.कर्ज मिळाले.
मशीनची किंमत १६ लाख रु. होती. पैकी १ लाख एजन्ट जवळ दिले होते. उर्वरित १५ लाख रु. चा धनादेश ऑक्टोबर महिन्यातच एजन्टकडे दिला. त्यानंतर ८ दिवसात मशीन आली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मशीन आली. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु झाला होता. तीन महिने हंगाम मिळाला. तो ३ लाख रु.चा झाला. त्यानंतर मशीनचे २०११ मध्ये अंबाजोगाई आर.टि.ओ. कडे नोंदणी केली. त्यानंतर पुन्हा गहु मळणीचा हंगाम पूर्ण केला. नोव्हेंबर ते एप्रिल असा ६  महिन्याचा पूर्ण हंगाम एकूण ५ लाख रु. चा झाला होता. पैसा कमी मिळाला असला तरी सर्व अनुभव मिळाला.

शेतीला जोडधंद्याची जोड

हार्वेस्टर मशिनच्या कामामुळे जिद्द व आत्मविश्वास वाढला. यातून के.व्ही .के. च्या मार्गदर्शनाखाली विहीर पुनर्भरण, जैविक बांधबंदिस्ती करून शेतीला पाणी उपलब्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मका काढणी, मळणीच्या यंत्रासह मूग, उडीद, धने काढणीसाठी काही नवीन जोडयंत्रे घेण्याचे ठरले. एकूणच या नव्या जोडधंद्यामुळे शेतीला पूरक उद्योगाची जोड मिळाली. क्लास कंपनीचे कंबाईंन हार्वेस्टरच्या मदतीने वर्षातील सात महिने ८.५ फूट कटर बार असलेले ६० एच .पी.च्या ताकदीतून पुढील वर्षी साडेतीन लाख  खर्च करून वर्षात एकूण ७..७० लाख रु.चा व्यवसाय केला. त्यापैकी २.५० लाख रु. बँक भरणा केले. तेव्हापासून (२०११) दरवर्षी ४०० ते ५०० शेतकऱ्यांचे २०० ते ३०० हेक्टर वरील विविध पिकांची काढणी करून  शेतकऱ्यांचे काम वेळेत व कमी खर्चात करून दिले. त्यामुळे त्यांना बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटकातूनही बोलावणे येते. त्यामुळे त्यांचा हंगाम कधीच वाया गेला नाही. पहिल्या वर्षी खर्च वजा जात चार लाख वीस हजार रु.चा नफा मिळवणारे नवनाथ चौधरी यांनी दरवर्षी नफ्यात भरच टाकत नेली .२०२०/२०२१ मध्ये त्यांनी १० लाख रु.पेक्षा जास्त  व्यवसाय केला आहे. ३० टक्के खर्च वजा जाता नफ्यातही वाढ झाली आहे.

मशीनमुळे प्रयोगात्मक शेती पाहता आली.
गेल्या तीन वर्षांपूर्वीच बँकेचे संपूर्ण कर्ज व्याजासह परतफेड केले, त्यामुळे नफा वाढला असल्याचे चौधरी सांगतात. हार्वेस्टर दुरुस्तीसाठी परभणी येथून मेकॅनिक मागवावा लागत होता. आता कोठेही दुरुस्ती होते. दरवर्षी मशीनचा दुरुस्ती व देखभाल खर्च म्हणुन ५० हजार रु. लागतात. दोन चालक ठेवले आहेत. तर डिझेल एकरी ६ ते ७ लिटर लागते. मका, तुर ही पिके काढणीसाठी जड असतात. तर गहु व सोयाबीन काढणीसाठी सोईचे असते, गहु ओला नसावा लागतो. नाहीतर मशीन जाम होते. या मशीनमुळे एक फायदाही झाला. विविध ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांनी केलेली प्रयोगात्मक शेती पाहता आली. अनेक चांगले वाईट अनुभव आले.
त्याचा फायदा घरच्या शेतीसाठी झाला. आम्ही एकत्र कुटुंब असलो तरी चुली वेगळ्या आहेत. माझी शेती लहान भाऊ पाहतो. शेतात तुषार संच बसवला आहे. त्यामुळे पाणी कमी वापरातून जास्त चांगले उत्पन्न मिळते आहे. नवनाथ चौधरी यांनी पैठण येथील त्यांच्या राहत्या घरालगत अर्धा एकरमधे विविध फळझाडे लावली आहेत. त्यात केशर, हूर जातीचा आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, जांभूळ, विशेष म्हणजे  ४ झाडे सफरचंदाची लावून चांगली वाढवली आहेत. काही झाडांची फळे खातो आहोत. हे सगळे हार्वेस्टर मशीन घेतल्यामुळेच झाले असा माझा विश्वास आहे.

आताचे युग यांत्रिकीकरणाचे

तरुण शेतकऱ्यांनी शेतीसाठी नवीन जोड धंदा करावा. तसेच शेतीत तंत्रज्ञान वापरून कमी पाणी व कमी रासायनिक खते वापरून ज्या  पिकातून आपले उत्पन्न वाढेल अशी पिके घ्यावीत. मी यापुढे गावात
शेतकरी गट उभा करणार असून त्या माध्यमातून सर्व छोटी मोठी शेतीसाठी लागणारी यंत्रे ठेवणार आहे. त्यातून आपले काम झाले की ती औजारे इतर गरजू शेतकऱ्यांना भाड्याने (मोलाने)  देणार आहे. त्यांची उत्पन्न मिळणारच. कारण आता शेतकऱ्यांपाशी वेळ नाही. हे युग शेतीत काबाडकष्टाचे राहिले नसून यांत्रिकीकरणाचे आहे.याची जाणीव सर्वच लहान मोठ्या शेतकऱ्यांना आहे. त्याचाच फायदा जो घेईल तोच यापुढे टिकणार आहे.
 नवनाथ चौधरी. ९४२२००९६५८

प्रमोद रेणापूरकर
,तंत्रज्ञान प्रमुख कृषी विज्ञान केंद्र  डिघोळअंबा ता.अंबाजोगाई जि .बीड
७५८८५६६६९१ …

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंबाकृषी विज्ञान केंद्रचिकूजांभूळजोड धंदाडिघोळअंबापेरूपैठण (सावळेश्वर)बीडसीताफळहार्वेस्टर
Previous Post

हरितक्रांती सोबतच शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती होणे गरजेचे – कुलगुरू डॉ अशोक ढवण

Next Post

कांदा लागवड तंत्रज्ञान…

Next Post
कांदा लागवड तंत्रज्ञान…

कांदा लागवड तंत्रज्ञान...

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish