• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हजाराच्या व्यवसायाची कोट्यावधीची उडाणे

यवतमाळ जिल्हयातील देवेंद्र भोयर यांची पोल्ट्री उद्योगात भरारी

Team Agroworld by Team Agroworld
June 28, 2021
in यशोगाथा
0
हजाराच्या व्यवसायाची कोट्यावधीची उडाणे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अवघ्या दोन हजार रुपयाच्या बक्षीस रक्‍कमेवर सुरु केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने कोट्यावधीच्या उलाढालीचा पल्ला गाठला, असे म्हटले तर कदाचीत कोणाचाच विश्‍वास बसणार नाही. परंतू तरोडा (जि. यवतमाळ) येथील देंवेंद्र भोयर या उच्चशिक्षीत युवकाने दुर्दम्य आत्मविश्‍वासाच्या बळावर हे शक्‍य करुन दाखविले आहे. दिड महिन्यात दोन लाखावर पक्ष्यांची विक्री त्यांच्या या व्यवसायातून होते.

देवेंद्र भोयर यांचे पार्डी (ता.कळंब, जि. यवतमाळ) हे मुळ गाव. त्यांचे वडील एकनाथराव हे जिल्हा परिषदेत अधीक्षक पदावर नोकरीवर. मात्र मुलींचे लग्न व कौटूंबीक गरजा भागविताना त्यांना गाठीशी पैसा जोडता आले नाही. परिणामी एकनाथरावांच्या निधनानंतर या कुटूंबाला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागला. याच काळात देवेंद्र यांचे शिक्षण सुरु होते. बी.कॉम, बी.पी.एड., एम.ए असे शिक्षण त्यांनी घेतले. उच्चशिक्षणानंतरही नोकरी नसल्याने देवेंद्र हे निराशेत होते.

क्रिकेटमधून घडला बदल

देवेंद्र भोयर यांना महाविद्यालयीन जीवनापासून क्रिकेटचा लळा होता. विजयंता क्रिकेटक्‍लब मध्ये ते खेळत असत. याच क्रिकेट क्‍लबच्या वतीने खेळविण्यात आलेल्या एका सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यापोटी त्यांना प्रेक्षक व आयोजकांकडून 100-200 रुपये याप्रमाणे बक्षीस मिळत गेली. तब्बल 2 हजार रुपये यातून गोळा झाले. रोजगाराच्या शोधात असलेल्या देवेंद्र यांनी त्या रक्‍कमेचा व्यवसाय उभारणीकामी वापर करण्याचा निश्‍चय केला. यवतमाळ येथील सिव्हील लाइन परिसरातील घराच्या मागेच त्यांनी 1996-97 साली छोटी पोल्ट्री सुरु केली. प्रायोगीक तत्वावर सुरु केलेल्या या पोल्ट्रीत अवघे 100 पक्षी होते. जबलपूर येथून हे पक्षी मागविण्यात आले. रेल्वेने हे पक्षी धामणगाव (जि.अमरावती) व तेथून मित्राच्या कारने हे पक्षी यवतमाळाला आणले. यवतमाळातील एका पोल्ट्री व्यवसायीकाकडून त्यांनी या व्यवसायाचे मार्गदर्शन घेतले होते. त्याच्याच मार्गदर्शनात त्यांनी हा व्यवसाय उभारला. सुरवातीला 100 पक्ष्यांच्या संगोपनातून त्यांना 300 रुपयांचे उत्पन्न झाले.

आणि नोकरी नाकारली.

पोल्ट्री व्यवसाय सुरु करणाऱ्या देवेंद्र यांना यवतमाळ अर्बन को-ऑप बॅंकेत नोकरीची ऑफर या काळात आली. परंतू नोकरीऐवजी मला व्यवसाय वाढीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज दया ! असा आग्रह त्यांनी बॅंक व्यवस्थापनाकडे धरला. बॅंक व्यवस्थापनाने देवेंद्र यांचा आत्मविश्‍वास पाहून त्यांना एक लाख रुपयांच्या कर्जाची उपलब्धता करुन दिली.

दूधाचा रतीब घालणाऱ्याची मिळाली साथ

देवेंद्र यांच्याकडे पोल्ट्री व्यवसाय वाढीसाठी जागा नव्हती. त्यांच्याकडे दूधाचा रतीब घालण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडे त्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्याने त्याला होकार देताच; देवेंद्र यांनी आपला व्यवसाय स्थलांतरीत करुन वाढविला. त्याकरीता बॅंकेकडून मिळालेल्या कर्ज रक्‍कमेचा विनीयोग करण्यात आला. 1998 मध्ये हा बदल त्यांनी केला होता. 1700 पक्ष्यांची तेथून विक्री होत होती. त्यानंतर टप्प्याटप्याने त्यांनी पोल्ट्री व्यवसाय वाढविला. या व्यवसायातून मिळालेल्या रक्‍कमेतून त्यांनी तरोडा (ता.बाभूळगाव, जि. यवतमाळ) येथे चार एकर शेत खरेदी केले. स्वमालकीच्या या शेतात त्यांनी 2000 साली आपला व्यवसाय स्थलांतरीत केला. तरोडा येथे 25 हजार पक्ष्यांचे संगोपन होते. व्यवसायातून पैसा जुळत गेल्याने उत्साह वाढलेल्या देवेंद्र यांनी व्यवसाय वृध्दीचा निर्णय घेतला. त्याकरीता त्यांनी माधनी (जि. यवतमाळ) तसेच सुलतानपूर (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथे शेती खरेदी केली. आज त्यांच्याकडील जमीनधारणा 50 एकरावर पोचली आहे.

हायटेक शेड

देवेंद्र भोयर हे आजच्या घडीला अवघ्या दिड महिन्यात दोन लाख पक्ष्यांची विक्री करतात. यावरुनच त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. सुलतानपूर, तरोडा, एरड या गावांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आज आहे. पक्ष्यांकरीता त्यांनी हायटेक शेडची उभारणी केली आहे. पक्ष्यांना फिडींग करीता स्वयंचलीत यंत्रणा त्यांनी बसविली आहे. फिडींगकरीता सेन्सार यंत्रणा असून पॉट (भाडे) मध्ये असलेले पक्षीखाद्य संपताच सेन्सरला कळते आणि भांडी पुन्हा खाद्याने आपोआप भरतात. पक्ष्यांना पाणी पिण्याकरीता वरच्या बाजूला निप्पल सिस्टम बसविलेली आहे. निप्पलला चोच मारल्यानंतर त्यातून येणारे पाणी पक्षी पितात.

देवेंद्र यांच्याकडील प्रत्येक शेड हे इनव्हारमेंट कंट्रोल पध्दतीचे आहे. शेडच्या दोन्ही बाजूस पडदे लावण्यात आले आहेत. त्यासोबतच आतल्या बाजूस तापमान मोजणी यंत्र व सेन्सर बसविले आहे. तापमानात घट किंवा वाढ झाल्यास सेन्सर स्वयंचलीत यंत्रणेला संदेश देतो आणि तापमान नियंत्रीत केले जाते. अशाप्रकारच्या हायटेक पोल्ट्रीफार्मची उभारणी करण्यात आली आहे. 400 फुट लांब आणि 28 फुट रुंद अशा आकाराच्या भव्य शेडची त्यांनी उभारणी केली आहे. या शेडची क्षमता 11 हजार 200 अशी पक्षी क्षमता आहे. 200 रुपये प्रती चौरस फुट याप्रमाणे या शेडच्या उभारणीवर त्यांना खर्च आला. त्यामध्ये स्वयंचलीत यंत्रणेवरील खर्चाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले. भारनियमनाच्या काळात पक्ष्यांकरीता जनरेटरची व्यवस्था आहे.

बाजारपेठ केली उपलब्ध

आंधप्रदेश, पश्‍चीम महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील कोंबडी बाजाराचा आढावा घेऊन त्याआधारे विक्री दर ते ठरवितात. यवतमाळ शहरात हॉटेल व्यवसायीकांना कोंबडी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. त्याच बाजारात सुरवातीला त्यांनी आपले ग्राहक शोधले. त्यानंतर व्यवसायातील बारकावे व बाजारपेठेचा अंदाज आल्याने त्यांनी आंध्रप्रदेश, पश्‍चीम महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना माल विक्रीस सुरवात केली.

पक्ष्यांचे व्यवस्थापन

हैदराबाद येथून एक दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी ते करतात. कमीत कमी 35 तर जास्तीत जास्त 45 दिवसानंतर त्या पक्ष्यांची विक्री होते. या कालावधीत एका पक्ष्याला साडेतीन किलो (91 रुपये) खाद्याची गरज भासते. मजूरी, वीजबील आणि व्हॅक्‍सीनेशन यावर एका पक्ष्यामागे सरासरी पाच रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासोबतच 25 रुपये प्रती नग पक्ष्याची खरेदी याप्रमाणे 121 रुपयांचा खर्च एका पक्ष्यामागे होतो. 64 रुपये किलो दराने पक्ष्याची विक्री होते. एका पक्ष्याचे वजन सरासरी 2 किलो 100 ग्रॅमपर्यंत राहते.
पोल्ट्री व्यवसायात कोट्यावधीची उलाढाल

45 दिवसानंतर त्या पक्ष्यांची 134 रुपयांना विक्री केली जाते. उत्पन्न व खर्चाच्या या ताळेबंदानुसार एका पक्ष्यामागे 13 रुपयांचा निव्वळ नफा होतो. एका महिन्यात 2 लाखावर पक्ष्यांची विक्री होते. त्यावरुनच या व्यवसायातील एकूणच उलाढालीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या या व्यवसायाने आज कोट्यावधीच्या उड्डाणाचा पल्ला गाठला आहे. आता नव्याने त्यांनी स्वतःच अंड्यापासून पिल्ले तयार करण्याकामी हॅचरी देखील उभारली आहे. आठवड्याला 80 हजार पक्षी अशी याची क्षमता आहे. परंतू बर्डफ्लू आणि कोरोनामुळे मार्केट स्थिर नसल्याने हा प्रकल्प ते कमी क्षमतेने चालवितात.

देवेंद्र भोयर तरोडा (जि. यवतमाळ )9422165198

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंध्रप्रदेशकोंबडी बाजारदूधपक्षीपश्चीयम महाराष्ट्रपार्डीपोल्ट्रीफिडींगमध्यप्रदेशयवतमाळव्हॅक्सीदनेशन
Previous Post

शेततळयावर बहरली द्राक्षशेती

Next Post

सेंद्रिय निविष्ठातून लाखोंची उलाढाल

Next Post
सेंद्रिय निविष्ठातून लाखोंची उलाढाल

सेंद्रिय निविष्ठातून लाखोंची उलाढाल

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish