• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

स्वाध्याय कार्यातून मालखेड्यात समृद्धी

पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून घडले परिवर्तन

Team Agroworld by Team Agroworld
December 24, 2020
in इतर
0
स्वाध्याय कार्यातून मालखेड्यात समृद्धी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आज देशभरात भौतिक संसाधनाने विकसित होत असलेली लाखो गावे आहेत. शहराप्रमाणेच गावे देखील सर्वसोयीयुक्त बनत आहेत. अनेक गावे स्वच्छ, सुंदर देखील बनली आहेत. या भौतिक विकासाच्या काळातही गावातील माणुसकीला जागृत करत गावाच्या सर्वांगीण विकासाची क्रांती घडवून आणण्याचे कार्य स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी करून दाखवले आहे. दादांच्या मअमृतालयम्फ या प्रयोगातून सर्वांगीण विकसित झालेली आज देशभरात अशी शेकडों गावे आहेत. या गावांमध्ये मनुष्य गौरवाचा झेंडा आज डौलाने फडकत आहे. यापैकीच मालखेडा (ता. भोकरदन, जि. जालना) हे गाव आहे.

पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) म्हणजे कृतिशील तत्त्वचिंतक. त्यांनी मानवाचा आत्मिक विकास व्हावा, मानव्य प्रस्थापित व्हावे म्हणून वेद, उपनिषद, गीता आदींचे विचार आधुनिक संदर्भाने मांडताना विविध प्रयोगातून हे विचार प्रत्यक्षपणे साकार देखील केले. मंदिर, तीर्थयात्रा, एकादशी आदी सांस्कृतिक साधनांच्या पाठीमागील भाव आणि उद्देश जपत नव्या रूपात ही साधने मानव्याचा विकास कार्यात आणली व या सांस्कृतिक साधनांचाही जीर्णोद्धार केला. दादांनी दिलेले विचार आणि कृती ज्यांच्या जीवनात आली ती लाखो लोकं आज स्वाध्याय परिवारात आहेतच. यासोबतच दादांच्या विचारांतून गावांगावांमध्ये सकारात्मक बदल घडत आहे. मालखेडा देखील यापैकी एक गाव आहे.

यज्ञातून विचार ज्योत पेटली
मानव्याच्या विकास प्रक्रियेत यज्ञ हे एक सांस्कृतिक साधन आहे. ऋषिंनी जंगली आणि पशुसमान जीवन जगणार्‍यांना यज्ञाद्वारे मानव्याचं रूप दिले आहे. ऋषिंना अपेक्षितच ज्ञान, कर्म आणि भक्तीचे यज्ञीय स्वाध्याय कार्य पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी करून दाखवले आहे. मानवाला मानवाशी आणि त्याला दैवी कार्यात जोडणे, मानवातील चैतन्य जागृत करून त्याचा गौरव वाढवणे, मानवाला सद्विचार देऊन सुसंस्कृत करणे या ऋषिंच्या यज्ञ संकल्पनेला दादांनी पुनर्जीवित केले. 30 मार्च 1983 मध्ये अन्वी (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे पूजनीय दादांच्या उपस्थितीत असाच एक यज्ञ झाला. त्यातून स्वाध्यायी कृतिशील अन्वीच्या आसपासच्या गावांमध्ये सांस्कृतिक विचार घेऊन फिरले. दादाजींच्या पदस्पर्शाने ही यज्ञीय भूमी पवित्र बनली आणि त्यांच्या मंगल प्रासादिक वाणीने ही भूमी भारावून गेली. या यज्ञातून स्वाध्यायाच्या दैवी विचारांचे बीज अन्वी जवळील मालखेडा गावात देखील रुजले. या गावात स्वाध्यायी विचारातून क्रांतीकारी बदल होत गेले. दादांच्या विचारांची शक्ती आणि यज्ञाचे फलित म्हणजे आज सांस्कृतिक, भौतिक समृद्धींनी हे गाव संपन्न बनले आहे.

गावाची पूर्व स्थिती वेगळीच
सिल्लोड आणि भोकरदन या तालुक्याच्या गावांच्या मध्यावर साधारण दीड हजार लोकसंख्यंचे मालखेडा हे गाव आहे. येथील गावकर्‍यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. दोन तालुक्याच्या मध्यावर असल्याने काहीजण व्यापार, व्यवसाय करणारे देखील आहेत. या गावात स्वाध्याय कार्य स्थिर होण्यापूर्वी या गावाची परिस्थिती फारशी अभिमानस्पद नव्हती. व्यसनाधीनता, राजकीय गटबाजी आणि सामाजिक भेदाभेदांनी गाव तसे दूषित बनलेले. गावात हेवेदावे, भांडणतंटे या गोष्टी तशा नित्याच्या ठरलेल्या. पण म्हणतात ना की, संस्कार केले तर पशू देखील चांगले वागतात, तर मग माणूस का नाही बदलू शकत? चांगले विचार आणि संस्कार मिळाले तर मवाल्याच्या वाल्मीकीफ देखील होतो. अगदी तसेच काहीसे या गावातील गावकर्‍यांचे देखील झाले. अन्वी येथील यज्ञाच्या निमित्ताने स्वाध्यायाचे सद्विचार येथे पोहचलेच होते आणि पूजनीय दादांचे विचार ऐकण्यासाठी गावातून काही जण यज्ञस्थळी (अन्वी) देखील गेले होते. यानंतर खर्‍या अर्थात मालखेड्यात स्वाध्याय कार्य सुरू झाले. त्यानंतर दादांचे विचार आणि प्रेम या गावाला सातत्याने मिळत गेले.

सद्विचारांनी व्यसनाधीनता गेली
स्वाध्यायाचे विचार कळण्यापूर्वी आज या कार्याशी जोडलेल्यापैकीच काही जण व्यसनाच्या आहारी गेलेले होते. गावातील एक जण तर हातभट्टीची दारु तयार करून विक्री करत. त्यांच्याकडेही स्वाध्यायाचे विचार सातत्याने पोहचत राहिले. यामुळे त्यांनाही मानवी जीवनाचे आणि सद्विचारांचे महत्त्व पटले आणि ते स्वाध्याय कार्याशी जोडले. स्वाध्यायात मिळालेल्या सद्विचारांमुळे दारु विक्रीचा व्यवसाय त्यांनी स्वतःहून बंद केला. केवळ पैसा मिळतो म्हणून नको ते करणार्‍यांसाठी मद्यविक्री करणार्‍या या व्यक्तीतील परिवर्तन म्हणजे डोळ्यात अंजन घालण्यासारखे होते. गावातील मद्यपान करणार्‍या आणि करविणार्‍यात झालेला हा बदल काही असाच सहज झालेला नव्हता. दादांचे सद्विचारांचे सान्निध्य आम्हाला मिळाल्यानेच हे घडू शकले, असे येथील एका स्वाध्यायीने सांगितले. ते म्हणाले की, स्वाध्याय कार्याने आम्हाला आम्ही व्यसनाधीन आहोत म्हणून नाकारले नाही आणि आमचं व्यसन सुटावं म्हणून कधी फटकारलं देखील नाही. या कार्यातून आम्हाला दादांचे विचार मिळाले की, मदेव माझ्या हृदयात आहे आणि तोच माझं जीवन चालवतो. मग देव जर माझ्या हृदयात असेल तर आपलं जीवन देवाला अपेक्षित असं संस्कारितंच असायला हवंफ दादांनी समजावलेले असे मानव्याचे विचार अमुच्या बुद्धिमध्ये स्थिर होतं गेले. अमुचे विचार शुद्ध होत गेल्यानं आचरणं देखील शुद्ध बनत गेलं. आमुच्यात आमूलाग्र बदल होऊन आमुची व्यसनं कधी दूर झाली हे आमच्याही लक्षात आले नाही. त्यांनी सांगितले की, दारुचे व्यसनं सुटल्याने कुटुंबात देखील सौख्याचे वातावरण निर्माण झाले. व्यसनावर होणारा अनाठायी खर्च बंद झाला आणि आर्थिक परिस्थितीत सुधारली.

स्वाध्याय केंद्र सुरू झाले
आसपासच्या गावातील स्वाध्यायी बंधू-भगिनी नियमित मालखेडा गावात येऊ लागले. कोणतेही प्रलोभन न दाखवता केवळ दादांचे विचार आणि प्रेमंच त्यांनी या गावकर्‍यांना दिले. त्यांच्या सातत्याने येण्यामुळे गावातून देखील काहीजण स्वाध्यायी विचारांचे बनू लागले. जीवन विकासाचे खरे शिक्षण ज्यातून दिले जाते, असे स्वाध्याय केंद्र या गावात सुरू झाले. या केंद्रातून वेद, उपनिषद, गीता आदींचे दादांनी समजावलेले विचार सर्वांना मिळू लागले. सुरवातीच्या काळात स्वाध्यायाचा विचार समजून घेेणार्‍यांपेक्षा त्याला विरोध करणार्‍यांची संख्या गावात मोठी होती. त्यावेळी गावात जे काही बोटावर मोजण्याएवढे स्वाध्यायी विचारांचे होते ते मात्र या दैवी कार्यासाठी ठाम बनत गेले.

योगेश्वर कृषितून संस्काराची पेरणी
गावातून स्वाध्याय केंद्रात जोडले जाणार्‍यांची संख्या हळूहळू वाढत गेली. स्वाध्याय विचारात जोडलेल्या व्यक्तींमधील परिवर्तन विरोध करणार्‍यांना दिसू लागले. जीवन विकासात या कार्याची किती आवश्यकता हे त्यांच्याही लक्षात आले. व्यक्ती परिवर्तन घडतं गेले तेव्हा त्यांच्या कुटुंबांमध्येही संस्कार रुजू लागले. बालकांसाठी बालसंस्कार केंद्र सुरू झाले. युवा, युवतींसाठी युवती केंद्र, महिलांसाठी महिला केंद्र आणि वयस्थांसाठी मानार्ह केंद्र देखील सुरू झाले. या सर्व केंद्रातून बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना जीवनलक्षी शिक्षण मिळू लागले. गावात संस्काराचे सिंचन होऊ लागले. या दरम्यान दादांनी दिलेला मयोगेश्वर कृषीफ हा प्रयोग गावात झाला. आपण जे काही काम करतो ते काहीकाळ देवासाठी निःस्वार्थपणे केल्यास ती देखील भक्ती होते, हा दादांचा अनुपम विचार गावकर्‍यांना पटला. देवाचे शेत म्हणून ठराविक क्षेत्र निवडले. त्यात देवासाठी कृतिभक्ती म्हणून एकत्र येत शेतीतून भक्ती सुरू झाली. दादांनी दिलेला हा प्रयोग म्हणजे शेतीचा नव्हे तर तो देखील मानवी जीवन विकासाचाच भाग बनला. या कृषीत होणारी कृती म्हणजे स्वाध्यायींसाठी पूजा करणे ठरले. त्यातून गावकर्‍यांमध्ये संस्काराची पेरणी झाली. वाईट विचार, प्रथा, रुढी यांची निंदणी केली. दादांनी समजावलेल्या सांस्कृतिक विचारांचे खतपाणी मिळाले आणि गावात खर्‍या भक्तीचे पीक बहरले. गावात सुख, शांती आणि समृद्धीचे वारे वाहू लागले.

अभिनव मंदिर साकारले
या दरम्यान गावकर्‍यांनी निर्धार केला की, दादांनी समजावलेला मअमृतालयम्फ प्रयोग साकारित व्हायला हवा. गावात दादांनी समजावलेले देवाचे असे घर (मंदिर) बांधूयात की, जिथे सर्व भेदाभेद विसरून गाव एकत्र येईल. देवाच्या या मंदिरात फक्त आणि फक्त जीवन विकासाचे विषय कानावर पडतील. गावात कोणीही स्वाध्यायी विचारांपासून वंचित राहू नये म्हणून कृतिशील स्वाध्यायी झपाटून कामाला लागले. बघता बघता गाव स्वाध्यायमय त्यांनी करून टाकला. गावकरी आपल्या उत्पन्नातून ठराविक भाग देवासाठी म्हणून काढू लागले. यातूनच त्यांनी कोणाकडेही वर्गणी न मागता आपल्या कष्टातून वर्ष 2012 मध्ये अमृतालय हे भगवंताचे अभिनव मंदिर साकारले. या अमृतालयम्मध्ये गावकरी सकाळ, संध्याकाळ नियमित एकत्र येतात. सांस्कृतिक कार्याचा विचार येथे करतात. एकमेकांची सुखंदुःखे समजून घेतात. येथे कोणताही जातीभेद किंवा सामाजिक भेद मानला जात नाही. सर्वजण एकाच प्रभूची लेकरं आहेत, भावनेतून गावकरी जोडले गेले आहेत. गावात कोणी उपाशी राहू नये याची काळजी तर घेतलीच जाते, पण गावात एखाद्यावर संकट ओढावले तर प्रसंगी आर्थिक स्वरुपातील देखील त्याची काळजी घेतली जाते. यासाठी गावकरी आपल्या उत्पन्नातून भगवंताचा जो विशिष्ट भाग काढतात तो भगवंताचा प्रसाद म्हणून अशा प्रसंगी गरजवंतापर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता हे सर्व होते.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
स्वाध्यायी विचारांनी मालखेडा गावाची सांस्कृतिक बांधणी होत गेली. गावातील व्यक्तींची मनं आणि हृदयं जुळल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीसाठी मतदान न करता, गावाने निवड पद्धत राबवली. गावात प्रमुख तीन कुळ आहेत. त्यातून प्रतिनिधी स्वरुपात सदस्यांची एकमताने निवड होते. या निवडलेल्या सदस्यांपैकी सरपंच पदासाठी इच्छुकांच्या नावाच्या चिठ्ठ्या केल्या जातात आणि यातून गावाचा सरपंच देखील बिनविरोध निवडला जातो. या बदलामुळे गावात निवडणुकीच्या काळात जे हेवेदावे, रुसवेफुगवे निर्माण व्हायचे ते बंद झाले. निवडणूकीसाठी प्रशासनाचा वेळ आणि होणारा खर्च देखील वाचला. यातून गावात एका पद्धतीची मराजकीय क्रांतीचफ दादांच्या विचारांनी केली. गावातील निर्णय देखील सर्वजण मिळून घेतात. यामुळे गावातील अनेक चूकीच्या परंपरा, प्रथा, अनिष्ठ रुढींना मुठमाती देऊन चांगल्या गोष्टींचा स्वीकार झाला. गावात पशूचा बळी देण्याची प्रथा होती. ही अनिष्ट प्रथा देखील अनेकांनी स्वतःहून बंद केली आहे.

श्रमभक्तीतून जलसंधारणाचे कार्य
निसर्गाकडे केवळ उपयुक्तता हा दृष्टीकोन न ठेवता दादांनी भावपूर्वक निसर्गाला जपण्याची दृष्टि सुद्धा दिली आहे. याचा परिपाक म्हणजे मालखेडा गावात भूमातेची कृतज्ञता म्हणून विहीर आणि बोअर पुनर्भरण (वेल रिचार्ज) प्रयोग झाले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी मनिर्मलनीरफ यासारख्या बंधार्‍याची कोणत्याही शासकीय मदतीशिवाय निर्मिती झाली. याबाबत एक स्वाध्यायी म्हणाले की, ङ्गआमच्या गावात हे प्रयोग होण्यापूर्वी शेतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य असायचे. माझी पंधरा एकर शेती, मात्र विहिरीचे पाणी लवकर आटल्याने कोरडवाहू सारखीच स्थिती होती. भूमातेची कृतज्ञता म्हणून मी विहिरीचे पुनर्भरण प्रयोग केला. यातून जमिनीत पाणी साठत गेले. याचा परिणाम असा झाला की, गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात देखील विहिरीला पाणी राहते. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी आता मुबलक पाणी उपलब्ध झालेफफ गावात अनेकांनी हे प्रयोग केले आहेत. जल पुनर्भरणाचे काम करताना मश्रमदान नव्हे तर श्रमभक्तीफ हा उदात्त विचार ठेवून लाखो रुपये खर्चाची ही कामे स्वाध्यायींनी मिळून केली. या सर्व उपायांनी शेतशिवारातील पाणी पातळी वाढली. या प्रयोगांची दखल शासकीय पातळीवर देखील घेतली गेली. जिल्हाभरात येथील प्रयोगांचा संदेश प्रशासनाने दिला.

वृक्षांचे रोपण, संवर्धन
दरवर्षी गावात 12 जुलै रोजी माधववृंद दिन साजरा होतो. यानिमित्ताने वृक्षांचे रोपण आणि पूजन होते. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे गावकरी वृक्षांची काळजी घेतात आणि त्याचा सांभाळ करतात. यामुळे गाव आज वनराजीने नटलेले आहे. आठ दिवसातून एकदा गावकरी प्रकृति पूजन म्हणून गावात साफसफाई देखील करतात. यामुळे या गावातील स्वच्छता देखील वाखाण्याजोगी आहे. गावातील ऐक्य, शांतता आणि स्वच्छता बघून शासनाने विविध पुरस्कार देवून गावाचा वेळोवेळी गौरव देखील केला आहे. माणसाचा आत्मिक विकास झाला, त्याचे विचार परिवर्तन घडले तर त्याचा भौतिक विकास देखील घडून येतो. एकेकाळी मोलमजुरी करणारे गावातील काही स्वाध्यायी आज भौतिक साधनांनी देखील संपन्न बनले आहेत. केवळ स्वाध्याय विचारांच्या बळावर आम्ही विकसित होऊ शकलो हे ते आवर्जून सांगतात. आपले कुटुंब, शेती, व्यवसाय सांभाळून गावातील कृतिशील या जीवन विकासात्मक स्वाध्याय कार्याचा वारसा जपत आहेत.


भक्ती ही सामाजिक शक्ती
पूजनीय दादांनी मभक्ती ही सामाजिक शक्ती आहेफ हा विचार केवळ दिला नाही तर तो साकारित करण्यासाठी या पद्धतीचे विविध प्रयोग केले आहेत. यात योगेश्वर कृषी, श्रीदर्शनम्, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर, हिरामंदिर, गोरस, एकवीरा, श्रीधर वाटिका यासारखे असंख्य प्रयोग आहेत. स्वाध्यायी विचारातून काय परिवर्तन होऊ शकते? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मालखेडा गावात झालेले हे कार्य आहे. दादांनी आज स्वाध्याय कार्यातून क्रांती घडवली आहे. आज दादांच्या कन्या
सौ. धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या नेतृत्वात स्वाध्याय परिवार हे कार्य विश्वव्यापक करत आहे. हजारो गावांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, आधात्मिक आणि भावनिक असे आमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणार्‍या दादांसारख्या कृतिशील तत्त्वचिंतकाला या त्यांच्या जन्म शताब्दी वर्षात कृतज्ञतापूर्वक वंदन.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अमृतालयएकवीरागावकरीगोरसग्रामपंचायत निवडणूकजालनादादापांडुरंगशास्त्री आठवलेभोकरदनमत्स्यगंधामालखेडायोगेश्वर कृषीवृक्षमंदिरव्यवसायशेतीश्रमभक्तीश्रीदर्शनम्श्रीधर वाटिकासौ. धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी)स्वाध्यायस्वाध्याय केंद्रस्वाध्यायीहिरामंदिर
Previous Post

पावनखिंड भाग – 7 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

शेतकऱ्यांचा सन्मान; आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार : कृषी मंत्री भुसे

Next Post
शेतकऱ्यांचा सन्मान; आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार : कृषी मंत्री भुसे

शेतकऱ्यांचा सन्मान; आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार : कृषी मंत्री भुसे

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.