ऊस हे महाराष्ट्र राज्यातील नगदी पिकांपैकी एक महत्वाचे पीक आहे. परंतु आजच्या महागाईच्या आणि जागतिकीकरणाच्या दिवसात शेती व्यवसाय हा अधिक खर्चिक होत चालला आहे, दिवसेंदिवस ऊस पिकाचा वाढता खर्च आणि घटते उत्पादन लक्षात घेता ऊस शेती तोट्याची होत चालली आहे, म्हणून ऊस उत्पादक शेतकरी ऊस शेती ऐवजी इतर पिकं घेण्याकडे कल वाढलेला दिसत आहे.
यावर उपाय म्हणून उसाची शेती फायदेशीर होण्यासाठी उसासोबत त्याच शेतीत आणि एकाच वेळी आंतरपिक घेणे ही काळाची गरज ठरणार आहे.
ऊस आणि आंतरपिक कालावधी….
ऊस वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन उसाचा आणि आंतरपिकाचा एकूण कालावधी व लागवड हंगाम यांचा योग्य आणि आणि नियोजन करून आंतरपिके घेणे महत्वाचे आहे…..
महाले यांच्या शेतातील ‘ऊस आणि आंतरपिक कोबीवर्गीय’ पिकं नियोजन
# सुरू ऊस आणि आंतरपिक लागवड क्षेत्र 1.5एकर
# लागवड तारीख 25 जानेवारी 2021
ऊस लागवड करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशी नुसार बेणे प्रक्रिया करून लागवड करण्यात आली आहे…
सुरू उसामध्ये पत्ताकोबी आणि फुलकोबी ही आंतरपिक
लागवड केली आहेत तर मधू मका हे सापळा पीक म्हणून लागवड केली आहे.
लागवड पद्धत
सरी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, शेत तयार करतांना प्रत्येकी 2 फूट अंतरावर संपूर्ण शेतात सरी पाडून घेतली, लागवड करतांना एक सरी आड ऊस बेणे लागवड केली तर एक सरी आड कोबी6 पिकांची लागवड केली आहे. फुलकोबीची 3000 रोपे तर पत्ताकोबीची 3000रोपे अशी एकूण 6000रोपे लागवड करण्यात आली आहे……
नेहमीच उसात आंतरपिक फायदेशीर ठरणार
मंगेश महाले यांच्या म्हणण्यानुसार उसामध्ये आंतरपिक अधिक आर्थिक फायदा होतो. पप्रामुख्याने आंतरपिकमुळे एकुण उत्पादनांत वाढ होते…
उसासाठी बियाणे, खते, व मशागतीचा केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो…
हे आहेत उसात आंतरपिकाचे फायदे….
1 एकाच शेतात आणि एकाच वेळेस दोन किंवा दोन पेक्षाअधिक पिकं घेण्यात शक्य….
2 उपलब्ध शेतीचा अधिक वापर..…..
3 तण नियंत्रण सोपे होते
4 आंतरपिक कमी कालावधीत उत्पादीत होऊन चलन फिरते राहते.
5 कमी कालावधीत आणि कमी मेहनतीने अधिक उत्पादन
6 कमी आंतरमशागत
7 आंतरपिकच्या उरलेल्या पालापाचोळा सेंद्रिय पदार्थ खत म्हणून उपयोग
8 पाणी खत आणि वेळेची अधिक बचत होते
मंगेश महाले
9561545284
अध्यक्ष – वसुंधरा सेंद्रिय बहुउदेशीय शेतकरी गट, सायगाव ता. चाळीसगांव जि. जळगांव