चंदीगड : पंजाबमधील काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्ताची मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी कृषी विभागाला कापूस पट्ट्यात कायमस्वरूपी पथके नेमून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची सुरुवातीच्या टप्प्यातच तपासणी केली जावी, असे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री मान यांनी बुधवारी या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कापूस हे पंजाबमधील मुख्य नगदी पीक असल्याने कापूस लागवडीच्या क्षेत्रात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रादुर्भावग्रस्त माळवा प्रदेशात कृषी विभागाच्या पथकांनी व्यापक दौरे केले पाहिजेत आणि आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे, यावर भर देण्यास मान यांनी सांगितले आहे.
बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक
मानसात शेतकऱ्याचे दीड एकर पीक उद्ध्वस्त
भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस सरूप सिंह सिद्धू यांनी पंजाब सरकारला गुलाबी बोंडअळी हल्ल्याची माहिती दिली. पंजाब सरकारला सतर्क करण्यात आले आहे. शासनाने प्रयत्न न केल्यास कपाशीचे पीक उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती सिद्धू यांनी व्यक्त केली.
भटिंडालगत ज्या माळवा प्रांतात गेल्या वर्षी पीक नष्ट झाले होते, त्या भागातच आता सुरवंटाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. कापूस पिकावर गुलाबी अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले आहेत. या भागातील एका शेतकऱ्याच्या दीड एकर शेतातील पिकांची प्रादुर्भावामुळे नासाडी केली आहे. यंदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर झाला आहे. सध्या फुलांमध्ये सुरवंटांचा थवा आढळून येत असला तरी येत्या काही दिवसांत तो वाढू शकतो, अशी भीती आहे.
नेदरलँड्समध्ये सुरू होतेय जगातील पहिले इन्सेक्ट स्कूल
पिकाच्या काड्या जाळण्याच्या सूचना
प्रादुर्भाव टाळून पीक वाचवायचे असेल तर पाच दिवसांत जुन्या छाट्यांना आग लावून नष्ट करा, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. कृषी तज्ज्ञ डॉ.बलजितसिंग ब्रार यांनी सांगितले की, गुलाबी अळी फांद्यांच्या जुन्या कोंबांमध्ये वाढून नवीन कापूस पिकाचा नाश करते.
चार लाखांच्या तुलनेत 2.31 लाख हेक्टरमध्येच पेरणी
पंजाब राज्यात यंदा चार लाख हेक्टरवर कापूस पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते, मात्र केवळ 2.31 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात 3.03 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली होती. गुलाबी बोंडअळीची भीती हे एकरी उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड टाळली.
Pink Bollworm Attack: Punjab CM Asks Agriculture Department To Take Steps For Checking Damage
Comments 2