आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात. पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे. प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत . फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल. कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात. एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्रामीण भागात होतात. यात बहुतेकजण शेतीवर काम करणारे सापडतात आणि 10 वर्षे ते 50 वर्षे वयाच्या व्यक्तींना, विशेषतः पुरुषांना बहुतेक सर्पदंश होतात असे आढळून आले आहे.
सर्पदंशाचा मुख्य कालावधी
सुमारे 80 टक्के सर्पदंश मे (वैशाख) ते सप्टेंबर (आश्विन) या पाच महिन्यांच्या काळात होतात. कारण उष्णता आणि पावसाचे पाणी यांमुळे सापाला बिळाबाहेर पडावे लागते. विशेष म्हणजे 70 टक्के सर्पदंश पायावर (मांडीपासून खाली) होतात. एकूण सर्पदंशापैकी निम्मे पावलावरच होतात. या आकडेवारीवरून असे दिसते, की ग्रामीण भागात, शेतीवर काम करणा-या माणसांना, विशेषकरून पावसाळयात सर्पदंश होतात. तसेच ते बहुधा पावलावर आणि थोडया प्रमाणात हातावर, विशेषतः हाताच्या पंज्यावर होतात. यावरून काय काळजी घ्यायची ते कळते. तरीही एकूण सर्पदंशापैकी सुमारे 80 टक्के घटना ह्या ‘बिनविषारी’ असतात आणि 20टक्केच विषारी दंश असतात. काही लोक केवळ भीतीने दगावल्याची उदाहरणे आहेत. मात्र वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर विषारी सर्पदंश झालेल्यांपैकी 90 टक्के व्यक्ती वाचू शकतात.
सर्पविषाची लक्षणे व चिन्हे
साप चावल्यावर घाबरणार नाही असा माणूस विरळा. काही लोक तर केवळ भीतीपोटी दगावल्याची उदाहरणे आहेत.
चावणारा साप बिनविषारी असेल तर दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. कारण विषारी सापांचे विषारी दात हे इतर सापांच्या दातांपेक्षा लांब व तीक्ष्ण असतात. त्यामुळे विषारी दातांच्याच एक-दोन खुणा होतात.
शास्त्रीय प्रथमोपचार
योग्य व तत्पर प्रथमोपचारानेच बहुतेक रुग्ण वाचू शकतात. कोणतेही तंत्रमंत्र किंवा नवस केल्याने सर्प विष उतरत नाही. असे सांगणारे नव्वद टक्के लोक हे तो साप मुळात विषारी नसल्यानेच वाचतात. मात्र केवळ भीतीनेही जीव जाऊ शकतो.
- संबंधित व्यक्तीला आणि कुटुंबातल्या लोकांना धीर दिला पाहिजे. बहुतेक साप बिनविषारी असतात हे त्यांना सांगून धीर द्या.
- साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही.
- बिनविषारी साप असेल तर फक्त जखम धुऊन जंतुनाशक औषध लावले तरी पुरते. मात्र रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्यक असते.
- संपूर्ण हात किंवा पाय लवचीक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. सर्व विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो.
- नंतर त्या हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.
- साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यावे. झापड येत नाही ना किंवा कुठून रक्त वाहत नाही ना याकडे लक्ष ठेवावे.
साप मारलेला असेल तर बरोबर घेऊन जावा. यामुळे निदान करायला मदत होईल. आपल्या भागातील कोणत्या दवाखान्यात सर्पदंशाचा उपचार मिळतो हे आपल्याला माहीत हवे.
संदर्भ : आरोग्यविद्या
उपयोगी माहिती
आपण दिलेल्या प्रथमोपचार बद्दल धन्यवाद
Very nice and useful information .
thank you very much agroword
Nice sir ji ???? ???????? ????