नवी दिल्ली : ॲग्री इन्फ्रा फंडने (आयएएफ) शेती ड्रोन (किसान ड्रोन) क्षेत्रातील अव्वल कंपनी गरूड ड्रोनसाठी प्रथमच ड्रोन कर्ज मंजूर केले आहे. गरूड ड्रोन निर्मिती करणाऱ्या चेन्नईस्थित गरुड एरोस्पेस कंपनीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची गुंतवणूक आहे. गरूड ड्रोनसाठी कर्ज मंजुरीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ गरूड ड्रोन कर्ज याविषयी …ऍग्री ड्रोन Agri Drone Agricultural Drone
एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून सक्षम करण्यासाठी हा राष्ट्रीय कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजेच ॲग्री इन्फ्रा फंड स्थापन झाला आहे. ॲग्री इन्फ्रा फंडने 10,000 कोटींहून अधिक कर्जे वितरित केली आहेत. या सरकारी वित्त पुरवठादार निधीने एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गरुड एरोस्पेस शेती ड्रोन खरेदीसाठी 9.37 लाख कर्ज
गरूड ड्रोनसाठी ॲग्री इन्फ्रा फंडने मंजूर केलेले पाहिले कर्ज हे 9.37 लाख कर्ज रुपयांचे आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कार्यक्रमात हे कर्ज वितरण करण्यात आले. ड्रोन खरेदी आणि वापरासाठी शेतकऱ्याला ॲग्री इन्फ्रा फंडकडून कर्ज मंजूर केले गेले. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्याला 9.37 लाख कर्ज वितरण केले जे सेवा प्रदाता गरुड एरोस्पेसला पेमेंटपोटी देण्यात आले2024 पर्यंत एक लाख किसान ड्रोन
गरुड एरोस्पेससाठी मंजूर झालेले आयएएफ कर्ज आणि कर्ज कार्यक्रमासाठी किसान ड्रोनची निवड हे कंपनीच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे प्रमाणीकरण आहे, असे गरुड एरोस्पेसचे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही आधीच 2,500 ड्रोन प्री-बुक केले आहेत आणि 2024 पर्यंत एक लाख किसान ड्रोन तयार करण्याच्या मार्गावर आहोत.”
गरुड एरोस्पेस कंपनीत धोनीची भागीदारी
एमएस धोनी या क्रिकेटपटूने ड्रोन सेवा देणाऱ्या गरुड एरोस्पेस कंपनीत अघोषित गुंतवणूक केली आहे. व्यवसायाला परवडणारे ड्रोन-आधारित उपाय ही कंपनी ऑफर करते. याशिवाय, मॅपिंग, औद्योगिक वापर, कृषी फवारणी आणि संरक्षण यासह विविध प्रकल्पांवर काम केले जाते. स्टार्ट-अप असलेली गरुड एरोस्पेस कंपनी आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीडको) यांनी संरक्षण क्षेत्रासाठी सुविधा स्थापन करण्यासाठीही सामंजस्य करार केला आहे.शेती ड्रोन इकोसिस्टमसाठी उपयुक्त
गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश शेती ड्रोन हे इकोसिस्टमसाठी एक “प्रगतीशील वाटचाल” मानतात. कारण, कृषी पायाभूत सुविधांच्या इकोसिस्टमवर कर्ज देण्यावर नेहमी लक्ष केंद्रित करण्यात, ॲग्री ड्रोन कधीही विचारात घेतले गेले नाहीत. ते म्हणाले, “नवनवीन प्रमाणित किसान ड्रोनसाठी कर्ज मंजुरी मिळविणे हे आमचे ध्येय आहे.”
दररोज 25 एकर क्षेत्रफळ फवारणीसाठी अचूक
दिल्लीतील या कार्यक्रमात 25 लाभार्थ्यांना एकत्रित किसान ड्रोन कर्ज वाटप करण्यात आले. या 25 लाभार्थ्यांपैकी एक असलेल्या ड्रोन सेवा पुरवठादार राम कुमार यांनी सांगितले, “किसान ड्रोन दररोज 25 एकर क्षेत्रफळ फवारणीसाठी अचूकपणे काम करतात. कीटकनाशकांचा वापर 70% वाचवतात, पाण्याचा वापर 80% वाचवतात. शेतकऱ्यांना ड्रोन सेवा पुरवून मी महिन्याला एक लाख कमाई करत आहे.”
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
फलटणचा उच्चशिक्षित तरुण करतोय आधुनिक हायड्रोपोनिक शेती!
अमेरिकी क्विनोआसारखेच सुपरफूड; पारंपरिक इथिओपियन टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर
Comments 6