जिल्हाधिकाऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांची यादी सादर करून शासनाकडे तक्रार करण्याच्या सूचना…
मुंबई (प्रतिनिधी) – सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत अशा बँकांची जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे यादी सादर करून तक्रार द्यावी. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विरोधी पक्षही आक्रमक
शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भाजपकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून खतं उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरु. तसेच जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे नगरचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिला आहे.















माझे अकाउंट आय सी आय सी आय बँक चे आहे तरी मला अजुन पिक कर्ज सुट आले नाही