मध्य महाराष्ट्र व कोकणात ऑरेंज अलर्ट जारी
टीम अॅग्रोवर्ल्ड(पुणे) : राज्यात काल विवीध भागात मान्सूनच्या सरी कोसळल्या. त्यात कोकणात व तळकोकणात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हळूहळू मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करीत असून पुढील दोन दिवस (दि.13 व14 जून )मध्य महाराष्ट्र व कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता पाहता नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहे.
कोणत्या भागात आहे ऑरेंज अलर्ट?
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील 8 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. आज व उद्या (दि 13 व 14 रोजी ) जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा या विभागांना दिला असून 14 जूननंतर उर्वरित महाराष्ट्रात मान्सून जोरदार मार्गक्रमण करेल व अधीक सक्रिय होईल त्याचबरोबर
येत्या 24 तासात विदर्भ व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने आजपर्यंत जोरदार मार्गक्रमण केले असून ओरिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस योग्य वातावरण राज्यात तयार झाले आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
ऑरेंज अलर्ट क्षेत्रातील भागात वीजपुरवठा खंडित होणे,वाहतूक ठप्प होणे अश्या प्रकारच्या विपत्तीचा सामना या काळात करावा लागतो .गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना व अपेक्षा शासनाला असते . ऑरेंज अलर्ट मध्ये रेड अलर्टच्या तुलनेत नुकसान होण्याची शक्यता कमी असली तरी नुकसान पातळी ही नागरिकांच्या सातर्कतेवर अवलंबून असते.