• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील अनेक भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव ; असे कराल व्यवस्थापन

शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह टाळावा.

Team Agroworld by Team Agroworld
October 28, 2020
in तांत्रिक
0
राज्यातील अनेक भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव ; असे कराल व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतात २००२-०३ मध्ये बोंडअळीस प्रतिकारक असणाऱ्या बीटी कापसाला व्यापारी तत्त्वावर संमती मिळाली. या संकरित वाणांची लागवड सुमारे ९५ टक्क्यापर्यंत पोचली. त्यामुळे कपाशीला अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या तीन प्रकारच्या बोंडअळ्यांपासून संरक्षण मिळू लागले.  या कपाशीवरही बोंडअळीचा (मुख्यतः गुलाबी बोंडअळी) प्रादुर्भाव दिसू लागला. गतवर्षी महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत बीटी कपाशी पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. मागील दोन वर्षांत अमेरिकन बोंडअळी ‘बोलगार्ड २’ मध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.


यामुळे वाढला बोंडअळीचा प्रभाव
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना व रात्रीचे तापमान ११ ते १४.५ से. असतांना सामान्यत: गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व दिवसाचे सरासरी तापमान ३५ से असल्याने ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या आळीस अटकाव झाला होता, किंतु आता वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कशी ओळखावी बोंडअळी ?
* अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
* अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्र झालेल्या अड्यांतून सफेद रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते.
* पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते,
* अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान असते.
* कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात.
* पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात व पाठीमागील पंख
* पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहते.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते. हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव झालेली फुले म्हणजेच ‘डोमकळी’सारखी दिसतात. परिपूर्ण बोंडामध्ये लहानसे छिद्र दिसून येते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ९० दिवसांनी येतो. मात्र, ऑगस्ट महिन्यात (पेरणीनंतर ६० दिवसांनी) गैरबीटीमध्ये काही प्रमाणात दिसून येतो.
उपाययोजना

* कापूस पिकात किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1,500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

* गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के+सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1+ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50+सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

* डिसेंबर 2020 नंतर कापूस पिक पुर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन किडीचे जीवनच्रक खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय  आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

स्रोत: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन  


शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह टाळावा.
यावर्षी पाऊसमान अतिशय चांगला झाला असला, तरी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने कापसाच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. जवळपास दोन वेचण्या या पावसामुळे खराब झाल्या असून, आता जरी कापूस चांगल्या स्थितीत दिसत असला (हिरवी कैरी व बोंडे) तरी त्यामध्ये नक्कीच बोंडअळीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह न करता वेचणीनंतर लवकर कापसाचे पिक नष्ट करून त्याऐवजी रब्बीच्या इतर पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून उत्पन्नही मिळेल व पुढील वर्षीच्या हंगामासाठी बोंडअळीची साखळी देखील नष्ट होईल

संजीव पाटील,
कापूस पैदासकार , मा. फुले राहुरी कृषी विद्यापीठ  

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: • क्लोरोपायरीफॉसअॅग्रोकापूस पैदासकारकृषी विभागगुलाबी बोंडअळीफरदडबीटीबोंडअळीमहाराष्ट्र शासनमा. फुले राहुरी कृषी विद्यापीठ
Previous Post

रेशीम उद्योगामूळे मिळाली शेती अर्थकारणाला चालना

Next Post

अ‍ॅग्रोवर्ल्डची जळगावात शनिवारी (ता. 31) पुन्हा प्रात्यक्षिकासह मधमाशीपालन कार्यशाळा…!

Next Post
अ‍ॅग्रोवर्ल्डची जळगावात शनिवारी (ता. 31) पुन्हा प्रात्यक्षिकासह मधमाशीपालन कार्यशाळा…!

अ‍ॅग्रोवर्ल्डची जळगावात शनिवारी (ता. 31) पुन्हा प्रात्यक्षिकासह मधमाशीपालन कार्यशाळा...!

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.