मुंबई : राज्यभरात पावसाचे जबरदस्त धुमशान सुरू आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ आधीच जारी करण्यात आला असून या विभागात सर्वच नद्या-नाले धोक्याची पातळी ओलांडून तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. रस्ते वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी “रेड ॲलर्ट” आहे. सातारा जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 व 9 जुलै दरम्यान “रेड ॲलर्ट” लागू आहे. हवामान विभागाने (आयएमडी) उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठीही “ऑरेंज ॲलर्ट” जारी केला आहे.
पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहू लागलीय
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी बुधवारी रात्रीपर्यंत धोक्याच्या धोक्यापासून फक्त सात फूट कमी असल्याने नव्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 17 तुकड्यांपैकी महाराष्ट्रातील ज्या भागात मुसळधार ते अतिवृष्टी झाली आहे, त्यामध्ये दोन पथके पूरप्रवण शिरोळ तहसील आणि कोल्हापूर शहरात तैनात आहेत. 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या पुरामुळे त्रस्त झालेल्या या जिल्ह्यात कोणत्याही पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.
वीजेपासून राहा सावध.. “दामिनी अॅप” करील मदत..!
नाशिकच्या घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या तीन दिवसात, कोकण आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रासह, नाशिक परिसर आणि इतर सर्व ॲलर्ट क्षेत्रांमध्ये घाट भागातील निर्जन ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. पुण्यासाठी 8 जुलैला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील तेलंगणा राज्यातही येत्या काही दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात, तेलंगणात चांगला पाऊस झाला आहे. तेलंगणाच्या दक्षिण भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसासह पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस पडेल.
विदर्भात आगामी पाच दिवस पावसाचे
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आगामी पाच दिवस विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून विदर्भासह महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचे नागपूर हवामान विभागाने म्हटले आहे.
गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार!
कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद
कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, कोकणात काही भागांत चोवीस तासांत 300 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकण विभागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक पाऊस लांजा येथे 823 मिलीमीटर नोंदला गेला. पालघर (शेती) केंद्रावर या सहा दिवसांमध्ये 658 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे गेल्या चोवीस तासांत तब्बल 340 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तळा, माणगाव, वैभववाडी, मालवण, संगमेश्वर आदी ठिकाणी 210 ते 240 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. वेंगुर्ला, कल्याण, महाड, पालघर, अंबरनाथ, सावंतवाडी, ठाणे, उल्हासनगर, पनवेल आदी भागांत 150 मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. उरण, दापोली, डहाणू, पेण, पाली आदी ठिकाणी 120 ते 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईतील सांताक्रुझ केंद्रावर 153 मिलिमिटर पाऊस नोंदविला गेला. कोल्हापूर येथील गगनबावडा येथे चोवीस तासांत 250 मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर, राधानगरी आदी भागांत 100 ते 140 मिलिमिटर पावसाची नोंद झाली.
कर्नाटक, छत्तीसगडमध्येही जोरदार पावसाचा अंदाज
आयएमडीने दक्षिण विभागाअंतर्गत कर्नाटक, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात आज मुसळधार पाऊस; 8 तारखेला विदर्भ; आज-उद्या छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 5 दिवसांत कोकण आणि गोव्यात विखुरलेला मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि कोस्टल कर्नाटकात पृथक अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
धो-धो पाऊस कोसळतोय कशामुळे?
हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत आहे. अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
Comments 1