मुंबई (प्रतिनिधी) :-भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले की मान्सून येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील बराच भाग व्यापेल. परभणीत 2 तासात विक्रमी 190 मिमी इतका पाऊस पडला. परिणामी, परभणी गुरुवारी देशातील सर्वात आर्द्र ठिकाण बनले आणि एका महिन्यात जूनचा मासिक पावसाचा कोटा ओलांडला. शतकापूर्वी परभणीत जून 1914 मध्ये परभणीत 24 तासांत 401.3 मिमी इतका विक्रमी पाऊस पडला होता.
14 जूनला “ऑरेंज अलर्ट”..
आयएमडी मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसालीकर यांनी सांगितले की, मान्सून येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील बर्याच भागात पावसाच्या वाढीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परीसरासाठी 14 जूनला “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र हरणाई, सोलापूर, रामगुंडम (तेलंगणा) आणि जगदलपूर (छत्तीसगड) दिशेने सरकत आहे.
2 ते 3 दिवसात मुसळधार..
दक्षिण-पश्चिम मान्सूनने गुरुवारी मध्य अरबी समुद्र, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापर्यंत मजल मारली. आयएमडीच्या अधिका-याने सांगितले की, “कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेने सरकल्यामुळे मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम किनारपट्टीवर पुढील 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी शुक्रवारी (आज) सायंकाळी 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीस संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीपेक्षा जास्त ओलसरपणा आला असला तरी एकंदर पावसाळ्याचा हंगाम सामान्य राहण्याची शक्यता आहे. आयएमडीने हंगामी पाऊस लाँग पीरियड एव्हरेजच्या (एलपीए) 100% राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर खासगी हवामान कंपनीने मान्सून सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 102% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.