प्रतिनिधी/ पुणे
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण केरळात दाखल झाला. भारतीय हवामान विभागाने देवभूमी केरळमध्ये गुरुवारी म्हणजे आज ३ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. केरळमधील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सूनच्या आगमनाने पावसाचा जोर अधिक वाढला आहे. केरळात मान्सून आज दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मात्र तो १० जूनपर्यंत दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पहिल्याच टप्यात मान्सूनने वेगाने आगेकुच केली होती. मात्र नैऋत्य मोसमी वार्याचा वेग मंदावल्याने केरळातील आगमन तीन दिवसांनी लांबले. केरळात मान्सून 31 मे ऐवजी 3 जूनला दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार पुढील वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 21 मे रोजी मान्सून अंदमान बेटांवर दाखल झाला होता. सुमारे आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणार्या वार्यांचे प्रवाह सक्रीय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत आहेत. पावसाचे प्रमाणही वाढले आहे.
वर्ष केरळात मॉन्सून दाखल होण्याची
तारीख: हवामान खात्याचा अंदाज
२०१६- ८ जून – ७ जून
२०१७- ३० मे – 30 मे
२०१८- २९ मे २९ मे
२०१९- ८ जून- ६ जून
२०२० – ५ जून – १ जून
२०२१ – 31 मे – ३ जून
देशात यंदा १०१ टक्के पाऊस
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मान्सून हंगामात (जून ते सप्टेबर) सर्वसाधारण म्हणजेच 101 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात 106 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार, २०२१ मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते) सप्टेंबर) सरासरीच्या १०१% पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.