टीम अॅग्रोवर्ल्ड (मुंबई) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्यात हजेरी लावल्याने कोकणातील काही जिह्यात धो-धो कोसळल्यानंतर आता मान्सूनने मुंबई व गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. त्यामुळे रविवारी पुणे, मुंबई व उपनगरात मान्सूनच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील दक्षिण व पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम व उत्तर भागात मान्सूनचा जोर जास्त राहील.
मान्सूनने शनिवारी कोकणातून मराठवाडा, नगर, विदर्भातील गोंदिया व नाशिकच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. शनिवारी सिंधुदुर्ग व जिह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 255 मिमी पावसाची नोंद झाली.
गोदावरी पात्रात पूरस्थिती
खान्देशातील जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 80 ते 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता..
त्र्यंबकेश्वर व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे गोदा पात्रात पूरस्थिती तयार झाली, त्यामुळे नांदूरमधमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिकमध्ये कोसळल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे आता उत्तर महाराष्ट्रमध्ये 24 तासात प्रवेश करतील. त्यामुळे खान्देशातील जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 80 ते 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
14 ते 15 जोरदार पाऊस
मध्य महाराष्ट्रात हवेचा दाब कमी झाल्याने विदर्भ, मराठवाडा, कोकण, कोल्हापूर घाट, पालघर, मुंबई उपनगर व पुणे परिसरात 14 ते 15 जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात मान्सून राज्यात बहुतेक ठिकाणी हजेरी लावेल. कोल्हापूर जिल्ह्यातील 14 जून व पूणे जिह्यात 16 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, झारखंड, बिहार, गुजरातमध्ये मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार होऊन जोरदारपणे पाऊस कोसळेल.
8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने खालील 8 जिह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर,सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सातारा.