भारत जगातील अग्रगण्य दूध उत्पादक देश आहे आणि जागतिक बाजारपेठेतील दुधाच्या उत्पादनात 20 टक्के वाटा हा भारताचा आहे. त्यामुळे हा टक्का अजून वाढण्यासाठी दूध उत्पादकता वाढविणे, यासंबाधित पुरवठा करणारे आणि संघटित दूध प्रक्रिया क्षेत्रात अधिकाधिक लोकांचा प्रवेश करणे अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देऊन सरकारने दुधाच्या उत्पादनास चालना देण्यासाठी कार्यक्रम सुरु केले आहे. भारतातील दुध प्रक्रिया उद्योग आर्थिक वर्ष 2018 ते आर्थिक वर्ष 2023 या कालावधीत सुमारे 18 टक्के वार्षिक वाढ दराने वाढेल आणि ही वाढ आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2458.7 अब्ज रुपयांवर जाईल, अशी अपेक्षा आहे. भारतासह अजून एक देश ब्राझील दुग्धोत्पादन क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन करत आहे, आणि या त्याच्या उलाढालीत भारतीय योगदान फार मोठे आहे. ब्राझीलमध्ये जगातील दुधाच्या उत्पादनात सरासरी 7 टक्क्यांची वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण देशांच्या यादीत ब्राझील पाचव्या स्थानावर आहे.
दुग्ध व्यवसायाच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा 20 टक्के आहे. हाच दुग्धव्यवसाय शेतीच्या संकटाच्या काळात शेतकर्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन ठरतो. 2012 मध्ये भारतातील जनावरांची एकूण लोकसंख्या 192.41 दशलक्ष होती, याआधीच्या पशुगणनेच्या तुलनेत यात 0.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील एकूण पशुधनापैकी सुमारे 36 टक्के पशुधनाचा वाटा हा आपल्या देशाचा आहे. याआधी झालेल्या पशुगणनेच्या तुलनेत मादी जनावरांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली आहे, तर नर जनावरांची संख्या 30.2 टक्क्यांनी घटली आहे.
कृष्णाचे ब्राझीलच्या दुध क्रांतीत योगदान
ब्राझीलमध्ये जगातील दुधाच्या उत्पादनात झालेली वाढ लक्षणीय असली तरी, ब्राझीलच्या दुध क्रांतीत भारताचे योगदान महत्वाचे आहे. ब्राझिलियन डेअरी उद्योगाचे नशिब बदलण्यात गुजरातच्या भावनगरचे महाराज कृष्णाकुमारसिंहजी भावसिंहजी यांचे मोलाचे योगदान आहे. अठराव्या शतकात, महाराजांनी ब्राझिलियन यशस्वी उद्योजक सेल्सो गार्सिया सिडला ङ्गगीरफ जातीच्या पशुधनाची जोडी भेट दिली. खालच्या बाजूने वळणदार शिंगे आणि लालसर-पांढर्या रंगाची गीर ही जात भारतात प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू देवतांपैकी एक नंदी आहे म्हणून त्यावेळी पवित्र व समृद्धीचे प्रतिक म्हणून मकृष्णाफ नावाच्या नंदीला (बैलाला) भेट म्हणून ब्राझीलला देण्यात आले.
1960 मध्ये जेव्हा कृष्णाला ब्राझीलमध्ये आणले गेले तेव्हा त्याने अनुवांशिक क्रांती सुरू केली त्यानंतर ब्राझीलमध्ये मगीरफ सर्वात महत्वाच्या जातींपैकी एक बनली आणि त्याद्वारा येथील संमिश्र जातीची उत्पत्ती केली. एका अंदाजानुसार ब्राझिलियन मगीरफ जनावरांपैकी 80 टक्के जनावरे मकृष्णाफ बैलापासून जीन घेऊन निर्माण झाली आहेत. ज्याला आता मगायरफ म्हणून संबोधले जाते. त्यानंतर मगीरफ हायब्रीड मगीरोलँडोफ तयार करण्यासाठी हॉल्टिन नावाच्या डच जातीसोबत क्रॉसब्रीड केला. ही जात ब्राझीलमध्ये वेगाने वाढली आणि देशाच्या सुमारे 80 टक्के दुध उत्पादनात याच जातीने हातभार लावला. ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाने 1989 मध्ये याची अधिकृतपणे नोंदणी केली आहे.
ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुधाचे योगदान
ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुधाचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे आणि दुधाच्या वाढीत गीर गायीचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील गीरच्या भूमिकेच्या अनुषंगाने, ब्राझीलच्या नाण्यांवर आणि पोस्ट तिकीटावर गीर गायीचे चित्र मुद्रित करण्यात आलेले आहे. कृष्णा कुमारसिंहजी भावसिंहजी यांनी ब्राझीलच्या दुग्धउ द्योगात केलेल्या योगदानामुळे संसद भवनाजवळ या दिवंगत राज्यकर्त्याचा पुतळा उभारला आहे. कालांतराने ही जाती आता संपूर्ण अमेरिकन खंडात पसरली आहे. गीर गाय भारतातल्या मूळ गायींच्या प्रमुख मझेबूफ वंशापैकी / जातींपैकी एक आहे. आंध्र प्रदेशमधील आणखी एक जातीच्या मओंगोलफ मुळे मझेबूफ जातीचे उत्पादन होऊ लागले हीच ब्राझीलमध्ये मनेलोरफ म्हणून ओळखली जाते. गोवंशांच्या जीनोमिक्ससाठी भारत आणि ब्राझीलमधील परस्पर सहयोग करार आहे. तेलंगणा सरकारने भारतीय गुरांच्या दुधाचे उत्पादन सुधारण्याच्या उद्देशाने स्वत:च्या झेबूचे प्रोटो-प्रकार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझील अजूनही आपल्या गुरांच्या जातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ताजी भ्रूण आयात करत असतो.
एका गीरचे दिवसाला 40 लिटर दूध
ब्राझीलमध्ये श्वेत क्रांती घडविणारी गीरगाय बर्याचवर्षांपासून एक सर्वोच्च उत्पादन देणारी जात बनली आहे आणि अत्यंत हवामान आणि उष्णकटिबंधीय आजारांमध्ये टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे दक्षिण अमेरिकन देशांमध्येती एक लोकप्रिय गाय ठरली आहे. ब्राझीलमध्ये आता गीर जनावरांची सुमारे 40 लाख संख्या आहे. याठिकाणी चांगली देखभाल करणारी गीर गाय दिवसाला सरासरी 30 ते 40 लिटर दूध देण्यास सक्षम आहे आणि हे अगदी 60 ते 70 लिटरपर्यंत जाऊ शकते. गीर गायींचा हा एका जागतिक विक्रमच आहे. गीर गायींच्या याच दुग्धोपादन क्षमतेमुळे या देशात खर्या अर्थाने दुध क्रांती झाली.
गोकुळ ग्राम योजना
झेबू कॅटल जीनोमिक्स अँड असिस्टिडरीप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजीजच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी 2016 मध्ये भारत आणि ब्राझील यांनी पशुसंवर्धन विभाग, दुग्धशाळा व मत्स्यसंवर्धन विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यानुसार ब्राझील सरकारने गोपाळ ग्राम योजनेचा एक भाग म्हणून निझामाबाद येथे इंडो-ब्राझील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कॅटल अँड शिप ब्रीडिंग, (संशोधन आणि विकास सुविधा) स्थापनेवर सहमती दर्शविली आहे. याठिकाणी अधिकृतरीत्या तांत्रिक कौशल्य बाबतीत पशुपालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. मगोकुळ ग्रामफ योजना मूळ गुरांच्या जातींचे संवर्धन आणि विकास यासाठी कार्य करते.
2018 मध्ये, देशी जातीच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम रेतन म्हणून गोठविलेल्या गीर बैल वीर्याच्या एक लाख डोससाठी ब्राझीलबरोबर भारताने सामंजस्य करार केला. परंतु भारतातील गोपालक ब्राझीलकडून गीर जातीच्या गायीचे उत्पादन करण्यासाठी दहा लाख वीर्य डोसच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत, कारण त्यांना असे वाटते की यामुळे देशातील मूळ जातीच्या शुद्धतेवर परिणाम होईल आणि गोपालक शेतकर्यांवर त्याचा वाईट परिणाम होईल.