• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बांबूची जिल्ह्यात दहा हजार एकरावर लागवड झाल्यानंतर पहिली बांबू रिफायनरी जळगावात सुरु करणार.. कार्बन क्रेडिट म्हणूनही मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये – खासदार उन्मेष पाटील… ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावला 23 जानेवारी (रविवारी) बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन 🎋

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2022
in हॅपनिंग
0
बांबूची जिल्ह्यात दहा हजार एकरावर लागवड झाल्यानंतर पहिली बांबू रिफायनरी जळगावात सुरु करणार.. कार्बन क्रेडिट म्हणूनही मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये – खासदार उन्मेष पाटील… ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावला 23 जानेवारी (रविवारी) बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन 🎋
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव ः देशातील पहिली बांबू रिफायनरी तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून आसाम राज्यातील नुमालीगड येथे सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर बांबूचा वाढता उपयोग व महत्व लक्षात घेता आपल्याकडेही येत्या दोन वर्षांत किमान दहा हजार एकरावर बांबूची लागवड झाल्यानंतर राज्यातील पहिली बांबू रिफायनरी जळगाव जिल्ह्यात सुरु करण्याचा मानस आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. कमी मजूर, कमी श्रम, कमी पाण्यात शाश्वत उत्पादनाची हमी देणारे पीक म्हणून बांबूकडे पाहिले जात असल्याचे खा. पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…

ॲग्रोवर्ल्डतर्फे २३ जानेवारीला रविवारी जळगावात बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर खासदार उन्मेष पाटील यांच्याशी ॲग्रोवर्ल्डने संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, कोनबँकेचे अध्यक्ष संजय करपे यांच्यासह खासदार पाटीलही या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

बांबू शेती बदलवणार शेतकऱ्यांचे अर्थकारण : पाशा पटेल… ; जळगावात 23 जानेवारीला (रविवारी) अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित बांबू कार्यशाळेचा लाभ घेण्याचे पाशा पटेल यांचे आवाहन..

बांबूपासून इथेनॉलची रिकव्हरी ट्रायलही पूर्ण
खासदार पाटील यांनी सांगितले, की शेती निसर्गावर अवलंबून असल्याने वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याचदा शेती परवडतेच असे नाही. त्यामुळे आता शाश्वत उत्पादनासाठी बांबूंच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. साधारणतः वर्षभरात नुमानीगड येथे इंग्लंड, नेदरलँड आणि भारत सरकार यांच्यातर्फे आसाम बायो रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड हा सुमारे तीन हजार कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. या ठिकाणी कोणत्या बांबूला इथेनॉलची किती रिकव्हरी मिळते, याची ट्रायल घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पासारखा महाराष्ट्रातील पहिला बांबू रिफायनरी प्रकल्प जळगाव जिल्ह्यात सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आपल्या भागात साधारणतः येत्या दोन वर्षात सुमारे दहा हजार एकरावर बांबूची लागवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यादृष्टीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पर्यायी मार्केट उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनही प्रयत्नशील आहे.

कोळश्याऐवजी पर्याय म्हणून बांबू वापरण्याचा अध्यादेश तसेच टेंडरही निघाले..
आपल्या देशातील कंपन्यांमध्ये कोळशावर चालणाऱ्या ज्या बॉयलर आहेत, त्यात पाच टक्के शेतातील बायोमासचा वापर करावा, असा अध्यादेशच केंद्र सरकारने नुकताच काढला आहे. याशिवाय राज्य शासनाने देखील कोळशाऐवजी बांबूचा दहा टक्के वापर करण्यासंदर्भातील तर टेंडरच काढले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बांबूतज्ज्ञ संजीव करपे, माजी आमदार पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आतापर्यंत तीन कार्यशाळा झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्बन क्रेडीट ट्रेडिंगद्वारेही मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये..
खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले, तुळशीनंतर बांबू हे असे एकमेव पीक आहे, जे प्रचंड आक्सिजन देते आणि कार्बन खाते. सध्या ग्लोबल वार्मिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने बांबू लागवडीनंतर शेतकऱ्यांचाही यात सहभाग वाढणार आहे. त्यामुळे उत्पादनाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना काही देता येईल का, यादृष्टीने आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती देखील शासनाने नियुक्त केली आहे. कार्बन क्रेडीट ट्रेडिंग करून शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतील, या उद्देशाने बांबू उत्पादकांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार देण्याचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच निर्णय होऊन बांबू उत्पादक शेतकऱ्यांना निश्‍चितपणे काही ना काही लाभ मिळवून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: BambooBamboo FarmingBamboo workshopइथेनॉलउन्मेष पाटीलकार्बन क्रेडीट ट्रेडिंगग्लोबल वार्मिंगपाशा पटेलबांबू रिफायनरीसंजय करपे
Previous Post

जीआर (GR) निघाला.. राज्यातील तुषार व ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार इतके कोटींचे अनुदान…

Next Post

कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

Next Post
कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन... जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.