सिमला : येथील सेंट्रल बटाटा रिसर्च सेंटर (सीपीआरआय) यांनी अवघ्या 90 दिवसात तयार होणारे बटाटा वाण विकसित केले आहे. या आधी बटाटा पिकासाठी साधारणतः 100 ते 120 दिवस लागायचे. उत्पादन कालावधी घातल्याने आता गहू-तांदूळ हंगामादरम्यान नव्या वाणाच्या बटाट्याचे तिसरे अतिरिक्त पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. गंगा खोरे तसेच देशातील मैदानी भागात जास्त तापमान असल्याने या जाती कमी वेळेत तयार होतील.
नेदरलँड्समध्ये सुरू होतेय जगातील पहिले इन्सेक्ट स्कूल
कुफरी सूर्या, कुफरी ख्याती आणि कुफरी सुख्याती या बटाट्याच्या तीन नव्याने विकसित जाती आहेत, ज्या उष्ण पट्ट्यात 90 दिवसांत वाढू शकतात. त्यामुळे गंगा नदीला लागून असलेल्या खोऱ्यात तसेच देशातील मैदानी भागातील शेतकरी आता गहू आणि भात कापणीच्या कालावधी दरम्यान बटाटे पिकवून एक अतिरिक्त पीक उत्पादन घेऊ शकतील.
हेक्टरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन
या वाणांमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकेल. सध्या गहू आणि धान कापणीच्या कालावधीत शेतकरी कोणतेही पीक घेत नाहीत. साधारणपणे डोंगराळ भागात बटाट्याचे पीक 100 ते 120 दिवसांत तयार होते. सीपीआरआयच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने आता शेतकरी नव्या तीन जातींमधून कमी वेळात बटाट्याचे उत्पादन घेऊ शकणार आहेत. बटाट्याच्या या जातींच्या बियाण्याने शेतकरी तुलनेने कमी कालावधीत पीक तयार करून नफा मिळवू शकतात.
याआधी कुफरी पुखराज वाणाचा प्रयत्न फसला
संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.विनय भारद्वाज यांनी सांगितले की, या जातींपूर्वी कुफरी पुखराज बटाट्याचे बियाणे कमी कालावधीत तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले होते. या वाणाचा बटाटाही कमी वेळेत तयार झाला, पण त्याचा साठवण कालावधी कमी होता. बटाट्याच्या पातळ त्वचेमुळे साठवण्यात समस्या येत होती.
देशातील बटाट्याची गरज पूर्ण करणे शक्य
गंगा नदीला लागून असलेल्या खोऱ्यात तसेच देशाच्या उष्ण पट्ट्यातील मैदानी भागातील शेतकरी गहू आणि धान या दरम्यानच्या काळात तिसरे पीक म्हणून आता बटाटे घेऊ शकतात, असे सीपीआरआयचे संचालक एनके पांडे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होणार असून देशाची बटाट्याची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. देशातील 70 टक्के बटाट्याचे उत्पादन मैदानी भागात होते.
Farmers will be able to grow potatoes between wheat, paddy harvest period, CPRI Shimla invented three varieties
Comments 2