पुणे (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021 आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही.
या योजनेत पिकनिहाय सहभागाची अंतिम मुदत, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर, सासवड या तालुक्यात आंबा पिकासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार एवढी आहे. शेतकऱ्यांनी 15 हजार 400 रुपये एवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली, खेड या तालुक्यात डाळिंब पिकासाठी 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत असून विमा संरक्षित रक्कम रुपये 1 लाख 30 हजार आहे. शेतकऱ्यांनी रुपये 9 हजार 750 विमा हप्ता भरावयाचा आहे.
दौंड आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर तालुक्यात द्राक्ष पिकासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम रुपये 3 लाख 20 हजार आहे. शेतकऱ्यांनी रक्कम रुपये 16 हजार विमा हप्ता भरावयाचा आहे.
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली, शिरुर या तालुक्यात केळी पिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम रुपये 1 लाख 40 हजार आहे. शेतकऱ्यांनी रुपये 7 हजार विमा हप्ता भरावयाचा आहे.
इंदापुर तालुक्यात मोसंबी पिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम रुपये 80 हजार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रुक्कम रुपये 4 हजार आहे.
शिरुर तालुक्यात संत्रा पिकासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम रुपये 80 हजार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रुक्कम रुपये 4 हजार आहे.
आंबेगाव, जुन्नर, इंदापूर या तालुक्यात पपई पिकासाठी अंतिम मुदत 31 नोव्हेंबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 1 हजार 750 रूपये आहे.
केळी पिका विमा संदर्भातील माहिती कळवा विनोद पाटील 9657196567