• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीएम किसान योजना : फक्त वर्षाला सहा हजार रुपयेच एव्हढेच नाही, आणखी 2 महत्त्वाचे फायदे! जाणून घ्या सर्व Farmer Benefits …

31 जुलैपर्यंत ई-केवायसी करून घ्या; शेतकरी असण्याचे फायदे कायम ठेवा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2022
in इतर, शासकीय योजना
3
पीएम किसान योजना : फक्त वर्षाला सहा हजार रुपयेच एव्हढेच नाही, आणखी 2 महत्त्वाचे फायदे! जाणून घ्या सर्व Farmer Benefits …
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यापूर्वी, या योजनेद्वारे मिळणारे आणखी दोन महत्त्वाचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना असलेल्या पीएम किसान योजनेत काही कारणाने तुम्ही अजून सामील झाला नसाल तर लगेच अर्ज करा. कारण याद्वारे तुम्हाला शेतीसाठी वर्षाला सहा हजार रुपये तर मिळतीलच, पण इतर काही महत्त्वाचे फायदेही मिळू शकतात.

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

ऑगस्टमध्ये 12वा हप्ता येण्याची शक्यता

पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. 11 कोटी शेतकर्‍यांसाठी सरकार एकाच वेळी 22,000 कोटी रुपये जारी करेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून, तुम्ही आधीच नोंदणीकृत नसल्यास, लवकरात लवकर नोंदणी करा आणि जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करा. अन्यथा, केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 हप्त्यांमध्ये 2 लाख कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. पीएम किसान योजनेच्या सदस्यांना इतर कोणते फायदे मिळू शकतात, ते समजून घेऊ.

पीएम किसान योजना : शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळते

जर तुम्ही शेती करत असाल आणि तुमचे नाव या योजनेत मंजूर झाले, तर तुम्हाला सरकारने अधिकृतपणे शेतकरी म्हणून मान्यता दिली आहे, असे समजावे. या योजनेत सरकार शेतजमीन, आधार, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आदींची पडताळणी करते, त्यानंतर लाभ मिळतो. या आधारावर इतर कृषी योजनांसाठीही तुमची ओळख शेतकरी म्हणून निश्चित केली जाते.

असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय..

किसान क्रेडिट कार्ड मिळवणे होईल सोपे

पीएम किसान सन्मान निधी योजना ही किसान क्रेडिट कार्ड योजनेशी म्हणजेच केसीसीशी जोडली गेली आहे. केसीसी बनवण्याच्या कामाला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. मोदी सरकारने विशेष मोहीम राबवून 2 कोटी 51 लाख किसान क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. ज्यांची एकत्रित क्रेडिट मर्यादा 2.64 लाख कोटी रुपये इतकी आहे.

सध्या पीएम किसान योजनेचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवणे सोपे होणार आहे. कारण त्याचे जमिनीचे रेकॉर्ड, आधार आणि बँक खाते यापूर्वीच पडताळलेले आहे. एवढेच नाही तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर केसीसीचा फॉर्मही अपलोड करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजावर उपलब्ध आहे.

ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी फक्त भारताची नंबर एक फॅशन ब्रँड वेबसाईट ॲजिओची (AJIO) ऑफर एकावर तीन फ्री!! Buy 1 Get 3 Free

ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी फक्त भारताची नंबर एक फॅशन ब्रँड वेबसाईट ॲजिओची (AJIO) ऑफर एकावर तीन फ्री!! Buy 1 Get 3 Free

पीएम किसान मानधन योजना

जर तुम्ही शेती करत असाल आणि पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतील, तर या पैशातून शेतकरी पेन्शन योजनेचा प्रीमियम थेट कापला जाऊ शकतो. तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे गुंतवण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी आधार कार्डाशिवाय इतर कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण नोंद भारत सरकारकडे आधीच खातरजमा केली गेली आहे. तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतूनच मानधन योजनेचा प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकता. सध्या देशात आतापर्यंत सुमारे 23 लाख शेतकरी किसान पेन्शन योजनेत नोंदणीकृत झालेले आहेत.

पीएम किसान योजना
पीएम किसान योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी हेल्पलाईन नंबर

पीएम किसान योजना लाभ घेण्यासाठी ही खातरजमा अवश्य करून घ्या

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी यापुढे सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय, सरकारने ई-केवायसी करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत दिली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते जोडलेले बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी असण्याचे फायदे जारी राहू शकतील. तसे केले नाही तर इथून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास नक्कीच अडचण निर्माण होऊ शकते.

तुम्हाला या खालील बातम्याही वाचायला नक्कीच आवडेल; सबंधित लिंकवर क्लिक करा … 👇👇

  1. आयआयटीयन इंजिनियर तरुणाने अमेरिकेतील इंटेल कंपनीतील लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून गावात येऊन उभा केला 44 कोटींचा डेअरी उद्योग; कसे ते जाणून घ्या ..
  2. Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
  3. आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती
  4. हर्बल फार्मिंग : कलियुगातील ‘संजीवनी’ असलेल्या ‘नोनी’ फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल दुप्पट नफा

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आधारई-केवायसीकागदपत्रकिसान क्रेडिट कार्डकृषी योजनाकेसीसीनोंदणीकृतपीएम किसानपीएम किसान सन्मान निधी योजनामोबाईल क्रमांकमोहीम
Previous Post

आपल्या गावातच राहून सुरू करा शेतीशी संबंधित व्यवसाय आणि कमवा महिन्याला किमान 60 हजार रुपये; केंद्र सरकारचे 3.75 लाखांचे अनुदान

Next Post

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत मात्र 31 टक्के तूट!

Next Post
राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत मात्र 31 टक्के तूट!

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत मात्र 31 टक्के तूट!

Comments 3

  1. Pingback: राज्यात पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबणार; सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद; सांगलीत
  2. Pingback: वयोवृद्ध शेतकऱ्यांना शेतीचे काम सोडण्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही ऑफ
  3. Pingback: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट! - Agro World

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.