• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 16 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 1, 2021
in इतर
1
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तात्याबा, गुणाजी, विठोजींच त्रिकूट चांगलंच जमलं होतं. बाजींच्या बरोबर तिघं गडावर फिरत होते. कुबडी घेतलेला गुणाजी मनाशी गडाच्या उभारणीची स्वप्नं रंगवत होता.
संध्याकाळी घरी परतल्यावर जुन्या आठवणींची उजळणी करीत तिघे म्हातारे बसत. तिघांत एक चिलीम फिरू लागे. इंगळ पुरवायला सखूची धावपळ चाले.
गडावर बेलदार, पाथरवाट काम करू लागले. कातळातून भरभक्कम दगड काढले जात होते. लोहारशाळेत निखारा फुलत होता. त्यातून पहारी, कुऱ्हाडी, कोयते, कुदळी आकार घेत होत्या. गडावर भल्यामोठ्या दोन चुन्याच्या घाण्या दिवसभर फेर धरून चालत होत्या. निघालेल्या दगडांनी देवीचं देऊळ सजलं. तटाची पडझड दुरूस्त होऊ लागली. गड आकाराला येत होता.
बाजींनी मोठा बेत आखला होता. गडाचे तट, बुरूज दुरूस्त करून गडाच्या सर्व माच्या सुरक्षित करायच्या होत्या. त्याखेरीज कोठार-घर, किल्लेदाराचा वाडा, शिबंदीचं निवासस्थान, पागेची जागा बांधावयाची होती. ते काम प्रचंड होतं, पण त्यामागं बाजींची हिंमत तेवढीच मोठी होती.
जासलोड गडाचं काम चालू असतानाच गडाच्या चौफेर दिशेनं तटापर्यंत वाढलेलं रान तोडलं जात होतं. यशवंताची रानतोडणीवर नेमणूक केली होती.
गडाच्या खाली परिसरातल्या गावांत बाजींनी दवंडी पिटवली होती,
‘ज्यांना लाकूड-फाटा हवा, त्यांनी रान तोडावं. लाकूड-फाटा घरी घेऊन जावा.’
पहाटेपासून दहा गावची माणसं, बायका, पोरं कोयते-कुऱ्हाडी घेऊन रानात घुमत होती. झाडं तोडली जात होती. त्या रानाच्या आश्रयानं राहिलेली भेकरं, चितळं तोडप्यांना सापडत होती. गडासकट साऱ्या कामकऱ्यांना रोज भरपूर शिकार मिळत होती.
यशवंत दररोज भल्या पहाटे गड उतरत असे. गडाच्या उतरणीवर झाडझुडूप, बुंधा राहत नाही, हे पाहत फिरत असे. मध्यान्ह झाली की, सखू यशवंताचं जेवण घेऊन गडाखाली येत असे. तिच्या काखेतली कळशी आणि डोईवरची शिदोरी बघितली की, यशवंताच्या जिवाला उधाण येई. गडावरच्या, गडाखालच्या बातम्या ऐकत यशवंत भाकरी खाई. पालेभाजी, नाचण्याची भाकरी खाऊन कंटाळलेला यशवंत जाणाऱ्या सखूला म्हणाला,
‘रातीच्या जेवनाला काय तरी वशाट कर!’
‘ते काय सांगायला हवं! रोज शिकार येतीया गडावर. सारी कटाळली, पन तुमास कसा कटाळा न्हाई, म्हणते मी!’
यशवंत हसला. तो म्हणाला,
‘वाघाची जात हाय, नव्हं!’
सखू काही बोलली नाही. ती मोठ्यानं हसली. तिनं सांगितलं,
‘लवकर गडावर या.’
सखू गडाकडं जात होती. यशवंत समाधानानं तिच्याकडं पाहत होता.

दोनप्रहरची वेळ टळत आली होती. जासलोड गडाच्या उतरंडीवर दहा गावची माणसं रान तोडत होती. त्या तोडणीच्या आवाजानं सारं रान जागं होत होतं. ते सारं निरखीत यशवंत फिरत होता. आपली फिरती करून झाडाच्या एका सावलीत तो विसावा घेत असता, रानात एकच हाकाटी उठली. यशवंत उभा राहिला. ज्या बाजूनं आवाज येत होता, त्या बाजूला तो धावला.
वाटेत एकजण धावत येत असलेला यशवंताला भेटला. यशवंतानं त्याला थांबवून विचारलं.
‘काय झालं?’
आपल्या पाठीमागं बोट दाखवत तो इसम म्हणाला,
‘वाघरू!’
यशवंत पुढं झाला. साऱ्या माणसांची पांगापांग झाली होती. बसल्या ठिकाणी भाला विसरल्याची जाणीव यशवंतला झाली. त्यानं तो विचार क्षणात झटकून टाकला. पळत येणाऱ्या एका माणसाच्या हातून त्यानं कोयता घेतला आणि तो पुढं झाला.
काही धीरकरी माणसं रानात उभी होती.
यशवंतानं विचारलं,
‘कुठं हाय वाघरु?’
त्या माणसांनी करवंदीच्या जाळीकडं बोट दाखवलं. त्यांतला एक म्हणाला,
‘जनावर भारी हाय ss’
‘असू दे ss’ म्हणत यशवंतानं डाव्या हातात विळा धरला. पायाखाली पडलेल्या एका झाडाचं मजबूत लाकूड हातात धरलं आणि तो करवंदीच्या जाळीकडं सरकू लागला.
चारी बाजूंनी वेढलेल्या माणसांच्या आवाजानं बिथरलेला वाघ जाळीतून पाहत होता. जाळीकडं येणाऱ्या यशवंतावर त्याची नजर खिळली होती. संताप व भीतीनं त्याचं सारं अंग फुललं होतं.
यशवंतला त्याचं गुरगुरणं ऐकू येत होतं. मोजकी पावलं टाकीत, अंदाज घेत यशवंत पुढं जात होता.
बाजूची माणसं श्वास रोखून यशवंताकडं पाहत होती.
यशवंतानं काही पावलं टाकली आणि त्याची नजर वाघाच्या नजरेला भिडली. सुवर्णकांती असलेला तो बिबट्या संतप्त नजरेनं यशवंताकडं पाहत होता. त्याच्या अंगावरचे काळे ठिपके, संतापानं वासलेला जबडा यशवंताच्या डोळ्यांत भरत होता. बिबट्यानं आपलं अंग बसल्या जागी चोरलं आणि त्याच वेळी त्याच्या झेपेची जाणीव यशवंतला झाली.
एखादा पाण्याचा झोत उसळावा, तसा बिबट्या जाळीबाहेर आला. सावध असलेल्या यशवंतानं सर्व बळ खर्चून हातातलं लाकूड वाघाच्या तोंडावर फेकलं. खट् असा आवाज झाला आणि वाघाचं धूड बाजूला कलंडलं. क्षणाचाही अवधी न घेता यशवंतानं वाघावर कोयत्याचे वार घालायला सुरूवात केली.


वाघाची घरघर चालू असतानाच माणसं धावून आली. दगडा-धोंड्यांनी वाघ ठेचला गेला आणि साऱ्या रानात एकच जल्लोश उसळला.
मेलेला वाघ आणि यशवंता यांना साऱ्यांनी खांद्यावर घेतलं. यशवंताचा विरोध न मानता यशवंताला गडावर नेण्यात येत होतं. ‘हरsहरsमहादेवs शिवाजी महाराज की जय’ यांनी सारं वातावरण दुमदुमत होतं.
तोडकऱ्यांची मिरवणूक गडावर आली. गडाच्या चौकात वाघाचं धूड टाकण्यात आलं. तो कोलाहल ऐकून बाजी-फुलाजी चौकात आले होते. त्यांना सारे यशवंतचा पराक्रम सांगत होते. उसंत मिळताच यशवंत म्हणाला,
‘साधं वाघरु व्हतं. उगंच या मानसांनी….’
‘साधा असला, तरी तो वाघ होता!’ बाजी त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत कौतुकानं म्हणाले, ‘पण वाघाच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत तुझी होती.’
बाजींनी आपल्या हातातलं कडं उतरलं आणि ते कडं यशवंतच्या हाती चढवत ते म्हणाले,
‘यशवंतराव, आजपासून तुम्ही कड्याचे मानकरी झालात.’
यशवंत विठोजीच्या घरापाशी आला, तेव्हा दाराशी सखू आरती घेऊन उभी होती. सखूनं यशवंतला ओवाळलं. घरात सोप्यात जात असता बाजींनी सांगितलं,
‘वाघाच्या मिशा जाळून टाका आणि त्याची नखं काढून घ्या. मिशा विषारी असतात.’
यशवंतला त्या गोंधळात काही कळत नव्हतं. तो बाजूला होताच सखूनं धीर करून विचारलं,
‘कुठं लागलं तर न्हाई?’
त्या वाक्यानं यशवंत प्रथमच भानावर आला. त्यानं आपल्या हातापायांकडं लक्ष दिलं आणि हसून तो म्हणाला,
‘काय बी न्हाई! फुकट वाघरु मेलं!’
सखू हसली.
ते हसणं पाहत असता यशवंतला प्रथमच आपल्या पराक्रमाची जाणीव झाली.

बाजींच्या अविश्रांत देखरेखीखाली तीन वर्षांत जासलोड गड पुरा झाला. दाट रानानं पसरलेल्या मुलखात ताशीव कड्यांनी गड आकाशात चढला होता. गडाला भक्कम तटाचा कमरबंध बांधला होता. गडावर देवीचं देऊळ, किल्लेदाराचा वाडा, सदर, पागा इमारती पुऱ्या झाल्या. गडाच्या प्रवेशद्वाराला भव्य कमान उभी होती. त्या कमानीवरच्या नगारखान्यावर भगवा ध्वज फडकत होता.
गडाचं काम पुरं होताच बाजींनी तात्याबांना सांगितलं,
‘तात्याबा! तुम्ही व यशवंता राजगडावर जा. राजांना गडाचं काम पुरं झाल्याचं कळवा. गड-पाहणी करायला राजांना आमंत्रण द्या.’
दुसरे दिवशी तात्याबा, यशवंता राजगडाकडं रवाना झाले.
शिवाजी राजे येणार, या वार्तेनं गडावर उत्साह पसरला होता. गडाची साफसफाई चालू झाली. विठोजीच्या वाड्याच्या भिंती सारवल्या गेल्या. सखूनं हुरमंजीनं, चुन्यानं त्या भिंतीवर मखर, मोर चितारले. हाताचे ठसे उठवले.
राजे केव्हा येणार, इकडं गडाची नजर लागून राहिली.

सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अश्वदळआबाजीकृष्णाजींगडघोरपडेजगदंबजगदाळेजय भवानीतानाजीपट्टाफुलाजींभैरुमोरेयशवंतविठोजीशिवाजी राजेसावंतहर हर महादेव
Previous Post

ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ

Next Post

कोरोना नंतरची शेतीव्यवस्था…!

Next Post
कोरोना नंतरची शेतीव्यवस्था…!

कोरोना नंतरची शेतीव्यवस्था...!

Comments 1

  1. Bipin T. Garbhe says:
    5 years ago

    पावनखिंडच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे पराक्रमी शिलेदार यांचा जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर मांडणा-या ॲग्रोवर्ल्ड मासिकाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.