• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – ३२ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 17, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सूर्य वर आला, तरी पन्हाळगडावर विरळ धुकं रेंगाळत होतं. थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांतली थंडी जाणवत होती. बाजीप्रभू आणि किल्लेदार त्र्यंबक भास्कर भवानीचं दर्शन घेऊन देवळाबाहेर पडत असता समोरून येणाऱ्या यशवंताकडं त्यांचं लक्ष गेलं. राजांनी मिरजेला वेढा दिला होता. राजांच्या संगती यशवंत गेला असता, तो एकटाच परत आलेला पाहून बाजी विचारात पडले.
यशवंतनं मांड-चोळणा घातला होता. पायी जाडजूड वहाण होती. कमरेला तलवार आणि पाठीला कासवाची ढाल लटकली होती. त्याच्या हातात उंचपुरा भाला होता.


बाजींच्या जवळ येताच यशवंतनंं डाव्या हाती भाला तोलून बाजींना मुजरा केला.
यशवंताच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून बाजींची अर्धी चिंता दूर झाली.
‘चला, यशवंतराव.’ बाजी म्हणाले.
तिघे मिळून सदरेवर आले. बाजींनी विचारलं,
‘राजे कोल्हापूरला आले?’
‘जी, माहीत नाही.’
‘मग अजून मिरजेचा वेढा चालू आहे?’
‘ठाऊक नाही.’
‘ठाऊक नाही?’ बाजींच्या कपाळावर आठ्या पडल्या, ‘अरे, पण तू राजांच्याबरोबर होतास ना?’
‘जी!’ यशवंत लाजला.
‘मग तू आलास कुठून?’
‘भोरला गेलो व्हतो, जी!’
‘भोर!’
‘व्हय! राजांनी सांगितलं. पाडव्याचा सण आला; घरला जाऊन ये.’
बाजी समाधान पावले.
‘तरीच अंगावर मासं चढलंय. गुणाजीराव, सखू- सारे बरे आहेत ना?’
‘व्हय, जी! राजं कुठं हाईत?’
‘मिरजेला वेढा दिला आहे. त्यात राजे अजून गुंतले आहेत. पण राजांनी तुला सणासाठी पाठवलं होतं ना?’
‘जी!’
‘मग सण करायच्या आधीच आलास? अजून पाडव्याला तर चार दिवस आहेत.’
‘खरं सांगू?’ यशवंत म्हणाला, ‘गमंना झालं, राजं डोळ्यासमोरून हालंनात.’
‘तेच, बाबा, तेच! चांगलं गुंतवलंय् या राजानं. बघ ना! आम्हीसुद्धा सणावारी घरदार सोडून गडावर राहिलो.’
इकडं तिकडं पाहत यशवंतानं विचारलं,
‘आनि थोरलं मालक?’
‘दादाची समजूत काढून त्यांना गावी पाठवलं. अरे, घरचे देवधर्म पाहायला नकोत? मोहनगडावर गेला होतास?’
‘जी! येताना गेलो व्हतो. गड नामी सजलाय्. साऱ्या बुरूजांवर तोफा चढल्यात.’
बाजींना ते ऐकून समाधान वाटलं.

पन्हाळगडावर येणाऱ्या पाडव्याची तयारी सुरू झाली. सोमेश्वराचं देऊळ पांढऱ्याखड चुन्यानं रंगवलं गेलं. गडाच्या साऱ्या तळ्यांची साफसफाई झाली. गडाचं प्रत्येक घरटं सारवलं गेलं. गडावरची उत्साही मुलं हलगीच्या तालावर लेझिम खेळत होती. गडाचं वातावरण प्रसन्न बनलं होत.

पाडवा दोन दिवासावर आला आणि राजे गडावर येत असल्याची आनंदाची बातमी थडकली. अंबरखान्यानजीकचा राजांचा वाडा बाजींच्या देखरेखीखाली सजवला गेला, सदर-इ-महाल राजांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. पाडव्याच्या पहाटेपासून गडावरच्या बुरूजांवर भगवे झेंडे फडकू लागले. घराघरांवर गुढ्या-तोरणं चढली. सणासुदीचे कपडे घालून सारे राजांची प्रतीक्षा करीत होते.
एक स्वार दौडत गडावर आला आणि राजे गडावर येत असल्याची वर्दी त्यानं दिली. बाजीप्रभू, गंगाधरपंत, किल्लेदार त्र्यंबक भास्कर, यशवंत ही मंडळी चार दरवाज्याकडं धावली. दरवाज्याशी जाताच बाजींनी आज्ञा दिली,
‘दरवाजा उघडा.’


दरवाज्याचे आडणे ओढले गेले. साखळ्या काढल्या आणि गडाचा भव्य खिळेबंद दरवाजा करकरत उघडला. राजांचं पथक येताना दिसत होतं. पथक वळणावर दिसेनासं झालं, तरी टापांचा आवाज कानांवर येत होता. राजे येणार हे समजताच सारे दरवाज्याशी गोळा झाले होते. लेझिमीची तरुण मंडळी आपल्या लेझिमी खळखळत आली.
राजे दरवाज्यापाशी आले. ते पायउतार होताच बाजींनी पुढं जाऊन मुजरा केला. साऱ्यांच्या मुजऱ्यांचा स्वीकार करून राजे म्हणाले,

‘करवीर जगदंबेचं दर्शन घेऊन यायला थोडा उशीर झाला.’
राजांनी दरवाज्यात पाऊल टाकलं आणि नगारखान्याचा नगारा वाजू लागला. शिंगांचे आवाज उठले. पाच सुवासिनींनी राजांना ओवाळलं आणि करडीच्या तालावर लेझिमींचा नाद खळखळू लागला.
राजे बाजींना म्हणाले,
‘बाजी, आम्ही विजयी होऊन आलो नाही. ही लेझिम कशाला?’
बाजी म्हणाले,
‘गुढी पाडव्याच्या दिवशी राजा गडावर आला. त्यापेक्षा मोठा सण कोणता?’
‘ठीक! तुमची इच्छा! चला.’
राजांचं लक्ष यशवंतकडं गेलं. त्यांनी त्याला जवळ बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालत असता राजांनी विचारलं,
‘केव्हा आलास?’
‘दोन दीस झालं.’
‘घरचे ठिक आहेत ना?’
‘जी!’
‘आणि आमची सखू?’
‘आपली आठवण काढीत व्हती.’ नकळत यशवंत बोलून गेला; आणि क्षणात आपली चूक लक्षात येऊन तो लाजला.
राजे हसले,
‘यशवंत! पोरीनं आठवण काढायची नाही, तर कुणी? आम्हालाही तिची आठवण येते.’
राजे वाजत-गाजत सर्वांच्यासह सोमेश्वराच्या देवळापाशी आले. राजांनी बाजींच्याकडं पाहिलं. बाजींनी सांगितलं,
‘राजे! आज सोमेश्वराची पूजा आपल्या हातून व्हावी, असं सर्वांना वाटतं.’
राजे सोमेश्वराच्या तळ्याच्या पायऱ्या उतरले. तलावाच्या निळ्याभोर पाण्यानं त्यांनी हातपाय धुतले. सोमेश्वर मंदिरात जाऊन देवावर बेल वाहिले. पूजा आटोपून राजे जेव्हा बाहेर आले, तेव्हा देवळाच्या कट्टयावर राजांची बैठक मांडली होती. देवळासमोर दाटीवाटीनं सारे उभे होते. देवालयाचे उपाध्याय दुसऱ्या कट्टयावर विराजमान झाले. त्यांनी नवीन वर्षाची कुंडली मांडली.
नवीन वर्षाचं नाव होतं शर्वरी नाम संवस्तर!
पर्जन्ययोग सफल होईल…. दाणापाणी उदंड राहील….
काही ठिकाणी अवर्षणाचे योग आहेत…. पण त्याची झळ फारशी लागणार नाही…. मृग नक्षत्र बेताचे…. इतर उदंड…. शेवटची नक्षत्रे पिकांची हानी करतील…. रोगराई बेताची…. पण प्राणनाश अधिक संभवतो…. वर्षफल सामान्य असले, तरी परमेश्वरकृपेने संकटे नाहीशी होतील….


राजे भाकीत ऐकत होते, भाकीत संपल्यानंतर राजे अंबरखान्याच्या शेजारी असलेल्या वाड्यात गेले.
दोनप्रहर टळत असता बाजी वाड्यात आले. त्यांना पाहताच राजांनी विचारलं,
‘काय, बाजी! काय काम काढलंत?’
‘आज पाडवा! तेव्हा साऱ्यांनी खेळ मांडला आहे. आपण यावं, अशी इच्छा आहे.’
‘कसला खेळ?’
‘आपण यावं आणि पाहावं!’ बाजी म्हणाले.
बाजींचा चेहरा पडलेला पाहताच राजे म्हणाले,
‘बाजी, आम्ही तुम्हांला वडिलकीचा मान दिला आहे. तुमची आज्ञा आम्ही कशी डावलणार? आम्ही येतो.’
अंबरखान्याच्या गंगा-जमुना कोठारांसमोरच्या माळावर मैदान तयार केलं होतं. राजांचं खास आसन तयार करण्यात आलं होतं. राजे स्थानापन्न होताच राजांनी आज्ञा दिली,
‘बाजी, खेळाला सुरुवात करा.’
सुरुवातीला लाठी, बोथाटीचे खेळ झाले. त्यानंतर तलवारबहाद्दर उतरले. राजे कौतुकानं ते पाहत होते. उत्तेजन देत होते. बाजींनी सांगितलं,
‘महाराज, आपला यशवंता चांगला धारकरी आहे.’
‘अस्सं?’ म्हणत राजांची नजर यशवंताकडं वळली, ‘यशवंता! मग मागं का? उतर.’
यशवंतानं मुजरा केला. काही वेळानं तो ढाल-तलवार घेऊन रिंगणात उतरला. बाजी म्हणाले,
‘दोघं.’
दुसऱ्या बाजूनं दोन तलवारबहाद्दर रिंगणात आले. यशवंतावर दोघं चालून गेले. कलगीचा ताल घुमत होता. यशवंत आपल्या दोन प्रतिस्पर्ध्यांचे वार चुकवत, ढालीवर झेलत, हरणाच्या पावलांनी रिंगण खेळत होता. त्याच्या हाताची सफाई, पायांच कसब पाहून राजांच्या मुखावर कौतुक उमटलं होतं.
जेव्हा तलवारीचा खेळ संपला, तेव्हा तिघां वीरांनी राजांच्याजवळ येऊन मुजरा केला. यशवंतच्या पाठीवर थाप मारीत राजे म्हणाले,
‘सुरेख! यशवंता, छान खेळलास.’
त्यानंतर रिंगणात पट्टाईत उतरले. त्यांचा खेळ पाहत असता, राजांनी बाजींच्याकडं पाहिलं आणि ते म्हणाले,
‘बाजी! रिंगणात उतरायचं?’
‘जी! आपण?’ बाजींनी आश्चर्यानं विचारलं.
‘काय बिघडलं? बघू दोन हात करून.’
बाजींना काय बोलावं, हे सुचेना.
राजे उठून उभे राहिले. बघणाऱ्या जमावाला वाटलं की, राजे आता जाणार. पण काही अवधीतच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत. राजांनी मागवलेला पट्टा हातात चढवला होता. ते बाजींना म्हणाले,
‘चला, बाजी!’
बाजींनी पट्टा चढवला. रिंगणातले खेळकरी बाजूला सरले. मावळ्यांच्या डोळ्यांत कौतुक मावत नव्हतं. राजांनी बैठक घेऊन सलामीचा हात केला. बाजींनी सलामी दिली. बाजी धिप्पाड देहाचे, उंचपुरे होते. राजे त्यामानानं किरकोळ भासत होते.
‘चला, बाजी!’ राजे गर्जले.
हलगीवाल्याला कुणीतरी डिवचलं आणि तो भानावर आला. हलगी वाजू लागली. अंदाज घेत दोन्ही वीर, एकमेकांवरून नजर न काढता पट्टा परजून रिंगणात फिरत होते आणि एका क्षणी भाड झाली. चक्राकार पट्टयाचं हात फिरवीत दोन्ही वीर मैदानात उसळत होते. पावलांच्या दाबानं धुरळा उडत होता. राजांचं ते कसब पाहून साऱ्या मावळ्यांना धन्यता वाटत होती. नाना तऱ्हेचे हात बाजी करीत होते. आणि शिवाजी राजे ते लीलया त्याच मोहऱ्यांनी परतवत होते. शेवटी बाजींनी पट्टा खाली ठेवला. राजांनी बाजींना मिठी मारली. राजे आपल्या दुशेल्यानं घाम टिपत म्हणाले,
‘बाजी! रोहिड्यावर आम्ही तुमच्यासमोर पट्टा घेऊन आलो नाही, हे आमचं नशीब!’
‘त्याची आठवण आता कशाला? पण, राजे! आपला हात सफाईचा आहे. त्या हाताला आडवं जाणं येवढं सोपं नाही.’
‘चला, बाजी! खेळ खूप झाला.’
साऱ्या मावळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. राजवाड्याकडं जाणाऱ्या राजे, बाजींच्याकडं सारे पाहत होते.
🚩क्रमशः🚩
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: किल्लेदार त्र्यंबक भास्करगंगाधरपंतजगदंबपन्हाळगडबाजीबाजीप्रभूभवानीयशवंतराजेरोहिडा
Previous Post

कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी- कोथिंबीर

Next Post

केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देणार; जाणून घ्या… काय आहे योजना….

Next Post
केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देणार; जाणून घ्या… काय आहे योजना….

केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देणार; जाणून घ्या... काय आहे योजना....

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish