पुणे/मुंबई : पुन्हा एकदा पाऊस आला मोठा अशी स्थिती आहे. आणखी 4 दिवस मान्सून पाऊस सक्रीय राहणार आहे. IMD Rain Alert आणि Weather Warning नुसार कोकण व मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो. कुठल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे ते ॲग्रोवर्ल्ड वेदर बुलेटिनमधून जाणून घ्या …
पाऊस आला मोठा : असा राहील राज्यातील पाऊस; पुढील 4 दिवसांचा हवामानाचा अंदाज व इशारा
गुरुवार, दिनांक 15 सप्टेंबर
- कोकण गोवा : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
शुक्रवार, दिनांक 16 सप्टेंबर
- कोकण गोवा : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
शनिवार, दिनांक 17 सप्टेंबर
- कोकण गोवा : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
रविवार, दिनांक 18 सप्टेंबर
- कोकण गोवा : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
- विदर्भ : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
IMD Rain Alert : मान्सून पाऊस सक्रीय राहणार
राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई आणि परिसरासाठी गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबईमध्ये गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ॲग्रोवर्ल्डला माहिती दिली. त्यानुसार, पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील. विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो.
👆 ताजी उपग्रह स्थिती : गुजरातलगत उत्तर महाराष्ट्रात ढगांची गर्दी
Weather Warning : ॲग्रोवर्ल्ड वेदर बुलेटिन
- बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस अन धुक्याची चादर.
- जिल्ह्यात धुके व ढगाळ वातावरण असल्याने तूर व हरभरा पिकावर शेंगा व घाटे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसाठी ठरतोय आपत्ती, शेतात पाणी साचल्याने कडधान्य पिकांचे मोठं नुकसान.
- मुंबई, ठाणे, कोकणासह साताऱ्यात जोरदार पाऊस; घाटमाथ्यावरही झाला मुसळधार.
- इरई धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोंडपिंपरी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
- पोडसा, तोहोगावाला बेटाचे स्वरूप आले असून पोडसा गावातील नागरिक बोटीने प्रवास करून जात आहेत.
- विदर्भात पाऊस आणि पूराचा तडाखा बसला आहे. वर्धा धरणाचे पाणी जादा प्रमाणात सोडल्याने या हंगामात तिसरी वेळ वणी-वरोरा रोड बंद करण्यात आला..
- पुण्यात दिवसभर ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. पावसाचा जोर मात्र ओसरलेला दिसला.
- कोयना धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत.
- सातारा तालुक्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही काल रात्रीपासून वेण्णा आणि उरमोडी नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
- गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले आहे.