• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नैरो विषाणू महाराष्ट्राच्या सीमेवर

कॉगो फिव्हरचा जनावरांसह मानवासही संसर्गाचा धोका

Team Agroworld by Team Agroworld
November 6, 2020
in हॅपनिंग, तांत्रिक
0
नैरो विषाणू महाराष्ट्राच्या सीमेवर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सध्या माणसांवर कोरोना विषाणूजन्य रोगाने हल्ला केलेला असताना नैरो या विषाणूमुळे होणारा कॉगो फिव्हर हा आजार आता राज्याच्या सीमेवर आला आहे. क्रिमिन कॉगो हेमोरेजिक फिव्हर हा जनावरांमधील रोग नैरो या विषाणूमुळे होत असून जनावरांवर आढळणारा गोचीड हा या विषाणूचा मुख्य वाहक आहे. एक जनावरांपासून दुसऱ्या जनावरांपर्यंत गोचीदाद्वारे याचे संक्रमण होत असून त्यांच्या संपर्कात आलेल्या मानवांना देखील याचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
महाराष्ट्र राज्याशेजारील गुजरातमध्ये या आजाराने पशुधन संक्रमित झाले असून त्याअनुषंगाने राज्यातील पशुपालकांना गुजरात राज्यातून पशुधन खरेदी करतांना खबरदारी घेण्याचे आवाहन राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. गुजरातमधील बोताड व कच्छ जिल्ह्यात क्रिमिन कॉगो हेमोरेजिक फिव्हर हा जनावरांमधील रोग नैरो या विषाणूमुळे जनावरे बाधित झाले असून त्यांचा प्रादुर्भाव हा इतरही समूहात होण्याची शक्यता आहे.

क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर(CCHF)हा विषाणूजन्‍य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्‍वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत.

  • या आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण ४० टक्‍के पर्यत आहे.
  • या विषाणूचा प्रसार हा गोचिड व पाळीव प्राण्‍याच्‍या संपर्कामध्‍ये आल्‍यावर होतो
  • भारतामध्‍ये या आजाराचा पहिला रुग्‍ण जानेवारी २०११ मध्ये गुजरात येथे आढळून आलेला आहे.
  • या आजारासाठी कुठलीही लस मानवासाठी तसेच प्राण्‍यासाठी उपलब्‍ध नाही.
  • हा विषाणू हा जंगली तसेच पाळीव प्राणी उदा. गाय,म्‍हैस,शेळी इ. प्राण्यांच्या शरीरात राहतो.
  • प्राण्‍यांना या रोगाची लागण ही दुषित गोचिड चावल्‍यानंतर होते हा विषाणू या प्राण्‍यांच्‍या रक्‍तामध्‍ये साधारणतः आठवडाभर राहतो अशारितीने गोचिड – प्राणी – गोचिड हे जीवनचक्र चालू राहते

प्रसार

या विषाणूचा मानवामध्‍ये प्रसार हा दुषित गोचिड चावल्‍यानंतर किंवा दुषित प्राण्‍याच्‍या रक्‍ताशी संसर्ग झाल्यानंतर होतो. जोखमीचे व्यवसाय –

  • कत्‍तलखान्यातील व्यक्ती
  • पशुपालन व्‍यवसाय
  • शेती
  • पशुवैदयकिय क्षेत्र

मनुष्‍य ते मनुष्‍य अशी या रोगाची लागण जवळचा सहवास उदा. रक्‍तसंसर्ग, स्‍त्राव संपर्क किंवा शरीर दुषित रुग्‍णाच्‍या संपर्कामध्‍ये आल्यानंतर होते. रुग्‍णालयामध्‍ये पुरेशी काळजी न घेतल्‍यामुळे तसेच निर्जंतूक उपकरणाचा वापर न केलेमुळे या रोगाची लागण होण्‍याची सर्वाधिक शक्‍यता राहते. या रोगाचा पारेषण कालावधी हा १ ते ३ दिवस आहे व जास्‍तीत जास्‍त ९ दिवस दिसून येतो.

लक्षणे
या रोगाच्‍या प्रमुख लक्षणामध्‍ये ताप, अंगदुखी,गुंगी, मानदुखी व मानेचा ताठरपणा, पाठदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी किंवा डोळयांना प्रकाश न सोसणे ही आढळून येतात तसेच उलटी मळमळ, जुलाब, पोटदुखी व घसादुखीही आढळून येते. काही वेळा सतत झोप लागणे, नैराश्‍य, यकृताला सूज, अंगावरती तसेच तोंडामध्‍ये व घशामध्‍ये पुरळ दिसून येतात.काही रुग्‍णांमध्‍ये काविळीची लक्ष्‍णे दिसून येतात.

रोगाचेनिदान

या विषाणूची तपासणी प्रयोगशाळेत एलायझा व पी सी आर व्‍दारे केली जाते.

औषधोपचारः- रिबाव्‍हायरीन (Ribavirin) हे औषध या रोगावर वापरले जाते.

प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजना

1.       संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरावेत.

2.       फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत त्‍यामुळे गोचिड बसलेनंतर लगेच दिसून येईल.

3.       किटकनाशकभारित कपडे वापरावेत तसेच गोचिड प्रतिबंधक क्रिमचा शरीरावर वापर करावा.

4.       शरीराची तसेच कपडयांची गोचिडीसाठी सतत तपासणी करावी जर गोचिड आढळली तर ती त्‍वरीत सुरक्षितपणे काढून टाकावी.

5.       प्राण्‍यांच्‍या अंगावरील गोचिडींचा नायनाट करावा तसेच ज्‍या भागामध्‍ये गोचिडींचा प्रादुर्भाव आहे तेथे जाणे टाळावे.

6.       ग्लोव्‍हज व इतर सुरक्षित साधनसामुग्रीव्‍दारे जनावरांशी संपर्क करावा.

7.       कत्‍तलखान्‍यामध्‍ये पुरेशी काळजी घेणेत यावी.

8.       कत्‍तलखान्‍यामध्‍ये जनावरे आणण्‍यापुर्वी २ आठवडे योग्‍य त्‍या किटकनाशकाची मात्रा देऊन गोचिडींचा नायनाट करावा.

9.       ज्‍या लोकांना या रोगाची लागण झाली आहे अशा रुग्‍णांशी संपर्क करु नये.

10.   वारंवार हात धुवावेत.

या क्षेत्रामध्‍ये काम करणा-या लोकांनी या रोगाची लागण होऊ नये म्‍हणून वरील सर्व खबरदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे.

 

सौजन्य:- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई

 

पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील गोचीड व इतरही कीटकांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना कराव्यात. संसर्गित पशूची देखभाल करतांना त्यांच्या कोणत्याही द्रवयुक्त घटकाच्या सान्निध्यात येऊ नये. त्यासाठी हातमोजे वापरावेत, चेहरा कापडाने झाकून मगच अश्या जनावराच्या संपर्कात जावे. सध्या राज्यात या आजाराचा धोका नसला तरी योग्य खबरदारी घेणे महत्वाचे आहे. शक्यतो हाताने गोचीड काढणे टाळावे त्यासाठी पशुवैद्यकीय सल्ला घेऊन औषधी फवारावी. सर्वाना याचा धोका नसला तरी कत्तलखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

डॉ.श्वेता मोरखडे
पशुपोषण आहारशास्र विभाग
स्ना.प.प.संस्था अकोला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कॉगो फिव्हरक्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवरगोचिडनैरो विषाणूपशुधनमहाराष्ट्र शासनसार्वजनिक आरोग्य विभाग
Previous Post

किफायतशीर बटाटा शेती

Next Post

शेतकरी हिताचा वसा व वारसा जपणारे- प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील व निखील चौधरी

Next Post
शेतकरी हिताचा वसा व वारसा जपणारे- प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील व निखील चौधरी

शेतकरी हिताचा वसा व वारसा जपणारे- प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील व निखील चौधरी

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish