राज्याच्या संरक्षणार्थ बांधलेली वास्तुशास्त्रदृष्ट्या जगातील सर्वांत लांब भिंत. हिची सुरुवात पिवळ्या समुद्रातील सामुद्रधुनीपासून होते व ती मध्य आशियापर्यंत जाऊन भिडते. तुर्की व मंगोल टोळ्यांचे अकस्मात हल्ले चीनवर होत. शिर ह्वांग टी या राजाने ही भिंत इ. स. पू. २१४ मध्ये बांधली. यापूर्वी ठिकठिकाणी बुरूज उभारण्यात आले होते. ही लष्करी ठाणी होती, या राजाने हे बुरूज जोडणारी कायमची भिंत बांधविली. तिचा उद्देश उत्तरेकडील रानटी टोळ्यांपासून राज्याचा बचाव व्हावा हा होता. सु. २,२५३ किमी. लांबीची ही भिंत बाहेर विटा अथवा ग्रॅनाईट दगड व आत माती या पद्धतीने बांधली असून तिची उंची सु. ६–९ मी. आहे. प्रत्येकी सु. ३१ मी. अंतरावर टेहेळणी करता एक स्वतंत्र बुरूज असून भिंतीवर ४·६० मी. रुंदीचा रस्ता आहे. निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली ही भिंत. जगातील एक आश्चर्य मानली जाते.
चीनच्या भिंतीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक ही भिंत बघायला येत असतात. मात्र या भिंतीमागील काही सत्य आपल्याला आश्चर्यचकित करतील
चीनची भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. ही भिंत ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळखली जाते तर कुणी याला चीनची महान भिंत असंही संबोधतात. जगातील आश्चर्यांमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश आहे. तर युनेस्कोनंही या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. भिंतीचं निर्मिती कार्य ज्या ऐतिहासिक कारणांमुळे सुरू केलं गेलं होतं, ते आता संबंधित नाहीत, पण तरीही पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात ही भिंत प्रसिद्ध आहे.
खरंतर, चीनच्या या भिंतीची निर्मिती कुणी एका सम्राटानं केली नाही. तर अनेक लहान-लहान प्रदेशांच्या राजांनी मिळून ही भिंत बनवली. याची संकल्पना मात्र चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांची असल्याचं सांगितलं जातं.
‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही एक भिंत नाहीय, तर ही अनेक लहान-लहान भाग मिळून तयार झालीय आणि यात अनेक ठिकाणी रिकामी जागा सुद्धा आहे. सांगितलं जातंय की, या भिंतीची निर्मिती करताना विटा जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता अशी ही एक मान्आयता आहे. बाणांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत तयार केली गेली होती.
सुरक्षेच्या दृष्टीनं निर्माण केली गेलेली ही भिंत खूप लांब आहे. मात्र याच्या लांबीबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जातात. एका पुरातत्व सर्वेक्षणानुसार भिंतीची लांबी जवळपास ८,८५१ किलोमीटर आहे. तर आणखी एका सर्वेक्षणानुसार विविध राजांनी बनवलेली ही भिंत सर्व भागांना जोडून २,२५३ किलोमीटरची असल्याचं सांगितलं गेलंय. तर भिंतीची रूंदी इतकी आहे की एकावेळी ५ घोडेस्वार किंवा १० सैनिक इथं फेऱ्या मारू शकतात.
चीनचे तत्कालीन राजा आणि सम्राटांनी या भिंतीची निर्मिती परदेशी हल्ल्यांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी केली होती. मात्र त्यानुसार ती भिंत ठरली नाही. कारण ही भिंत पुढे जावून अभेद्य राहिली नाही.
चीनची भिंत जगभरात मनुष्याद्वारे बनवली गेलेली सर्वात लांब रचना आहे. युनेस्कोनं १९८७मध्ये जागतिक वारशांच्या सूचीमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश केला. असं म्हटलं जातं की, अवकाशातूनही चीनची भिंत दिसते.
किलेनुमा निर्मित या भिंतीवरून दुरूनच शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी मिनार बनवले गेलेत. १९७० साली पर्यटकांसाठी ही भिंत खुली करण्यात आली. दरवर्षी इथं जवळपास एक कोटी पर्यटक भेट देतात अशी माहिती आहे.
चीनच्या भिंतीबाबत असंही सांगितलं जातं की, जे कामगार या भिंतीचे बांधकाम करत असताना काम करत नसतं त्यांना तिथे पुरलं जात असे. सांगितलं जातं की, या भिंतीच्या निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू झाला होता आणि म्हणून याला जगातील सर्वात मोठी स्मशानभूमीही म्हटलं जातं.
सौजन्य :- समाज माध्यम / इंटरनेट