• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नांदेडची केळी पोहोचली थेट ईराणमध्ये…; चार एकरातून 7 लाखांचे निव्वळ उत्पन्न; जाणून घ्या दर्जेदार केळीचे व्यवस्थापन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2021
in यशोगाथा
0
नांदेडची केळी पोहोचली थेट ईराणमध्ये…; चार एकरातून 7 लाखांचे निव्वळ उत्पन्न; जाणून घ्या दर्जेदार केळीचे व्यवस्थापन..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नांदेड (सचिन कावडे) –

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी राज्यासह देशभरात चांगले नावलौकिक मिळवीत असून येथील केळी जगभरातील कानाकोपर्‍यात पोहचली आहे. तालुक्यातील पार्डी मक्ता या गावातील वसंत पंडितराव देशमुख यांची 50 टन केळी यंदा थेट ईराणमध्ये पोहचली असून या केळीच्या विक्रीतून त्यांना सद्यस्थितीत 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर उर्वरित 50 टन केळी पुढील महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. पारंपरीक पिकांसोबत शेतात नव-नवीन प्रयोग करण्यावर 36 वर्षीय वसंतराव भर देतात. यामुळे प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

 

अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता हे गाव नागपूर-तुळजापूर राज्य मार्गावर असून नांदेड शहरापासून 20 किलो मीटर अंतरावर वसलेले अंत्यत शांतप्रिय गाव. 3 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीत मुख्यत्वे तीन नगदी पीकं घेतली जातात. यामध्ये केळी, ऊस व हळद या पिकांचा समावेश आहे. वसंतराव 3 ते 4 वर्षांचे असतांनाच त्यांचे वडील पंडितराव देशमुख यांचे दु:खद निधन झाले. लहानपणापासून वसंतरावांना शेतीची आवड असल्याने आजोबा व काकांसोबत शेतातील कामे करण्यात त्यांचे मन रमू लागले होते. दरम्यान, सन 1998 मध्ये दहावी पास झाल्यानंतर वसंतरावांनी पूर्णवेळ शेतीच करण्याचा निश्चय करून स्वतःला शेती कामात झोकून दिले. इतर शेतकर्‍यांनप्रमाणे वसंतरावही पारंपरिक पिके घेतात. परंतु मुळात प्रयोगशील असलेले वसंतराव पारंपारिक पिकांसोबत शेतात नव-नवीन प्रयोग करीत असतात. या प्रयोगातून मिळणार्‍या यशातूनच आज वसंतराव जिल्हाभरात उद्योजक शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहेत.

 

चार एकरात केळीची लागवड

वसंतराव देशमुख यांना वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. पारंपरिक पिकांसोबत शेतीत नेहमीच हवामानबदलाप्रमाणे वेगवेगळी पिके ते घेत असतात. 8 एकर शेतीपैकी त्यांनी 4 एकर शेतीमध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजी 5 हजार खोड (बेन्याची) लागवड केली. परभणी येथील कृषी विद्यापीठातून 2019 मध्ये केळीचे एक रोप 14 रुपये दराने असे 2 हजार रोपे आणण्यात आली होती. यामधूनच 5 हजार दर्जेदार खोडाचा (बेणे) घरगुती उपयोग लागवडीसाठी करण्यात आला.

 

मशागत व खत मात्रा

संपूर्ण 4 एकर शेतामध्ये सेकंड (बेण्याची) लागवड करण्या अगोदर जमिनीत एकवेळेस शेणखत तर दुसर्‍यांदा बरु (ढेंचा) 50 किलो जमिनीत टाकून अशी दोनवेळा मशागत करण्यात आली. यानंतर बीजप्रक्रिया करुन 5 हजार बेण्याची लागवड करण्यात आली. लागवडीच्या आठ दिवसानंतर केळीच्या पिकांच्या मुळामध्ये वाढ व्हावी, यासाठी पंधरा दिवसात दोनवेळा आळवणी (ड्रिचिंग) करण्यात येते. यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर खताची मात्रा दिली. नंतर 45 दिवसानंतर आणखी एकवेळा खताची मात्रा दिली. वसंतराव पाणी ड्रीप पद्धतीने केळी पिकांना पाणी देतात. त्यामुळे इतरही विद्राव्य खते सोडणे सोयीस्कर होते.

 

 केळीचे 50 टन उत्पादन

केळी लागवडी केल्यानंतर साधारण 11 महिन्यापासून केळी काढणीस सुरुवात होते. जुलै महिन्यात काढण्यात आलेल्या 50 टन केळीची विक्री अर्धापूर येथील स्थानिक व्यापारी असलेले बड्डे मिया फ्रुट कंपनीला करण्यात आली. या फ्रुट कंपनीमार्फत सदर 50 टन केळीची निर्यात ईराणला करण्यात आली. वसंतराव देशमुख यांच्या 1 टन केळीला 14 हजार रुपयांचा दर मिळून 50 टन केळाच्या विक्रीतून जवळपास 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 

वर्षाकाठी 100 टन उत्पादन

वसंतराव यांना जुलै महिन्यात झालेल्या 50 टन केळीच्या विक्रीतून 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर अजून शिल्लक असलेली 50 टन केळी पुढील महिन्यात काढण्यात येईल. या दरम्यान केळीचा दर कमी झाल्यास जवळपास 3 लाख रुपयांचे तरी उत्पन्न मिळेल. म्हणजेच वर्षाकाठी 100 टन केळीच्या विक्रीतून 10 लाख रुपयांचे उत्पन्न होते.

 

केळीला परराज्यांतून मोठी मागणी

अर्धापूर तालुक्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरवर्षी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येथील केळी गुणवत्तापूर्ण असल्याने परराज्यांसह विदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची केळी तेलंगणा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थान व जम्मू काश्मीरसह आदी राज्यांत निर्यात करण्यात येते.

 

7 ते 8 लाखांचा निव्वळ नफा

शेतीमध्ये 4 एकर वर्षाकाठी 100 टन केळीचे उत्पादन होऊन जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच वर्षाकाठी बेण, खत-औषधी, शेतीची मशागत, लेबर मजूरी असा एकूण अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च होतो. 10 लाख उत्पन्नातून तीन लाख खर्च काढल्यास जवळपास 7 ते 8 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मागीलवर्षी 1 क्विंटल केळीला 400 ते 500 रुपये दर मिळाल्याने शेतकर्‍यांचा लागवडीचा खर्चही निघाला नव्हता. यावर्षी मात्र केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

 

सव्वादोन एकरमध्ये 90 क्विंटल हळद

वसंतराव देशमुख यांनी आपल्या 8 एकरपैकी 4 एकरमध्ये केळीची लागवड केली होती. तर 1 जून 2020 रोजी सव्वादोन एकरमध्ये 20 क्विंटल हळदीची लागवड करण्यात आली होती. 7 ते 8 महिन्यानंतर हळदीचे पीक काढणीस येते. एप्रिल 2021 मध्ये सव्वादोन एकरात 90 क्विंटल हळदीचे उत्पादन झाले आहे. एका क्विंटल 8 ते 9 हजार रुपये भाव मिळेल या अपेक्षेने वसंतराव यांनी हळदीची साठवणूक करुन ठेवली असून ऑगस्ट नंतर चांगला भाव मिळाल्यास विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

गावरान कोंबडीचे पोल्ट्री फार्म

मागील काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून वसंतरावांनी गतवर्षी 100 गावरान कोंबड्याचे पोल्ट्री फार्म 20 बाय 40 च्या जागेत सुरु केले. या कोंबडीपासून मिळणार्‍या अंड्यातून दिवसाला 600 रुपये मिळतात. शेतीकामात वसंतराव यांना त्यांच्या आजीबाई, पत्नी ज्योत्स्ना देशमुख यांचीही चांगलीच मदत होते.

 

बदलत्या हवामानानुसार शेतीत बदल आवश्यक

आगामी वर्षभरात बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करणार असून त्या पद्धतीने माझे काम सुरू झाले आहे. शेतकर्‍यांनी बदलत्या हवामान पद्धतीचा अभ्यास करून शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करण्यावर भर दिला पाहिजे. शेती व्यवसायात कधी उत्पन्न जास्त तर कधी नुकसानही होते. नुकसान झाल्यामुळे कोणताही टोकाचा चुकीचा निर्णय न घेता शेतकर्‍यांनी स्वतःवर संयम ठेऊन शेती कामात सातत्य ठेवले पाहिजे. नव्या पिढीला शेतीची आवड असल्यास त्यांनी पारंपरिक पिकांसोबतच शेतीला जोडव्यवसाय केला पाहिजे.

– वसंत पंडितराव देशमुख, मो. 9923070356

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 100 टन50 टनकेळीजोडव्यवसायनफापोल्ट्री फार्मबंदिस्तशेतीत बदलहळदहवामान
Previous Post

ई – पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात* *महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन* *राज्यातील तहसीलदार,तालुका कृषि अधिकारी,तलाठी ,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत बैठक

Next Post

रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन; 40 लाखांची उलाढाल असलेला देशी गोवंश पालनातील दीपस्तंभ- इंडिजिनस फार्म; पदवीधारक असूनही नोकरीच्या मागे न धावत खैरनार बंधूंचा गोवंश संवर्धनात आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर

Next Post
रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन; 40 लाखांची उलाढाल असलेला देशी गोवंश पालनातील दीपस्तंभ- इंडिजिनस फार्म; पदवीधारक असूनही नोकरीच्या मागे न धावत खैरनार बंधूंचा गोवंश संवर्धनात आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर

रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन; 40 लाखांची उलाढाल असलेला देशी गोवंश पालनातील दीपस्तंभ- इंडिजिनस फार्म; पदवीधारक असूनही नोकरीच्या मागे न धावत खैरनार बंधूंचा गोवंश संवर्धनात आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish