मुंबई : राज्यातील 5 जिल्ह्यांतील 9 तालुक्यांमधील सुमारे 114 गावांतील पाणीपातळी चिंताजनक खालावलेल्या पातळीवर आहे. त्यात खानदेशातील नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यात 26 गावांमधील भूजल पातळी धोकेदायक खोलीच्या स्तरावर पोहोचली आहे. यंदा अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याचे कारण सरकारी यंत्रणा सांगत असल्या तरी भरमसाठ, धोरणहीन आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे ही वेळ ओढवल्याचा पर्यावरण तज्ञांचा दावा आहे. राज्यातील पाणी पातळी खालावलेल्या या 114 गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचा अनुमान भूजल सर्वेक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात टँकरने पाणी पुरवावे लागले होते. याशिवाय अजूनही या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.
शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र
फलटणखालोखाल नंदुरबार राज्यात सर्वात भीषण; “शिरपूर पॅटर्न”चे झाले काय?
खालावलेल्या पाणी पातळीच्या गंभीर स्थितीबाबत सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 4 तालुके आणि 31 गावे आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव 5, बारामती 16, शिरूर 8 आणि वेल्हे तालुक्यातील 2 गावात भूजल पातळी खालावली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण या एकाच तालुक्यातील 56 गावांत भूजल पातळी खालावलेली आहे. त्या अर्थाने हा तालुका राज्यात सर्वात भीषण स्थितीत आहे. त्या खालोखाल नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार या एकाच तालुक्यात 19 गावे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 5 तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 2 गावातील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे राज्यभर बोलबाला झालेला “शिरपूर पॅटर्न” सध्या थंडावला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भूजल पातळीत 2 ते 3 मीटरने घट
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी एका जलवर्षातून चार वेळा (माहे ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे) पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरीमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे माहे सप्टेंबर अखेर राज्यात पर्जन्यमान व माहे ऑक्टोबर मधील भूजल पातळी यांच्या नोंदी घेऊन सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली बाड अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्य अनुमान काढले जाते. भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यांतील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यांतील 109 गावांचा समावेश आहे.
जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी उपयुक्त आराखडा
माहे सप्टेंबर अखेर झालेले पर्जन्यमान व निरिक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यासाआधारे संभाव्य पाणी टंचाई गावाची संख्या अनुमानित केली जाते व ऑक्टोबर अखेर जिल्हा स्तरावर तयार झालेल्या टंचाई आराखडयानुसारच जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या अंमलबजावणीची कामे केली जातात. जानेवारी, मार्च आणि मे अखेरील भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे टंचाई परिस्थितीचा केवळ अंदाज घेतला जातो, मात्र या आधारे नव्याने संभाव्य पाणी टंचाई भासणारी गावे अनुमानित अथवा घोषित केली जात नाहीत.
मार्च 2022 मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास
ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत जलधारातून विविध कामासाठी मुख्यत्वे सिंचनाकरिता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल याबाबतची माहिती मार्च 2022 मध्ये निरिक्षण विहिरीमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरुन कळून येते. मार्च 2022 अखेर निरिक्षण विहिरीमधील भूजल पातळीच्या घेतलेल्या नोंदीची तुलना मागील पाच वर्षाच्या जानेवारीमधील भूजल पातळीच्या सरासरांशी केली असता, राज्यातील एकूण निरिक्षण विहिरीपैकी 2,978 विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ तर 720 निरिक्षण विहिरीमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. यापैकी 18 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट, 33 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर एवढी घट. 119 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटर एव्हढी घट तर 550 निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 मीटर एव्हढी घट आढळून आली आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती
माहे मार्च 2022 अखेरील निरिक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे उपरोक्त पैकी अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या 6 जिल्हयातील 9 तालुक्यातील निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीमध्ये 1 मीटर पेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे या 9 तालुक्यांतील साधारणत: 114 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती असण्याचे अनुमान आहे. यामध्ये भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर घट असलेल्या 2 तालुक्यातील 5 गावांचा आणि 1 ते 2 मीटर घट असलेल्या 9 तालुक्यातील 109 गावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस
गेल्या वर्षी माहे सप्टेंबर 2021 अखेर 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला होता व 85 तालुक्यामध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. पर्जन्यमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम माहे सप्टेंबर 2021 अखेर 3,660 निरिक्षण विहिरीद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे राज्यातील 268 गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत 1 मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खालावलेली आढळलो. त्यापैकी 17 गावामधील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट, 38 गावांमधील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर एवढी घट व 213 गावांमधील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटर एवढी घट आढळली.
The Department of Groundwater Survey and Development recently concluded that the ground water level in about 114 villages has dropped
Comments 1