• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

देवगडच्या नावाखाली सध्या ग्राहकांच्या माथी कर्नाटकी हापूस; समजून घ्या फरक..

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक, हॅपनिंग
0
देवगडच्या नावाखाली सध्या ग्राहकांच्या माथी कर्नाटकी हापूस;  समजून घ्या फरक..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अॅग्रोवर्ल्ड तर्फे जनहितार्थ…

देवगडच्या हापूस आंब्याच्या नावाखाली अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते. शिवाय बऱ्याचदा आंबे लवकर पिकून विकले जावेत यासाठी कॅल्शिअम कार्बाइडचा वापर केला जातो जो आरोग्यास अतिशय घातक (ऍसिडिटी, कॅन्सरसारखे धोके होऊ शकतात) आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी देवगडचा हापूस आणि कर्नाटक हापूस यातील फरक समजून घेऊ…

  • देवगड किंवा रत्नागिरीचा (कोकण) हापूस गडद केशरी रंगाचा असतो तर कर्नाटकचा आंबा हा पिवळ्या रंगाचा असतो.
  • कोकणचा हापूस अत्यंत गोड आणि कर्नाटकचा हापूस चवीला कमी गोड असतो.
  • कोकणच्या हापूसची साल पातळ असते व कर्नाटक हापूसची साल जाड असते.
  • अनेक जण देवगड रत्नागिरी नावाखाली कर्नाटक हापूस विकतात यामुळे महाराष्ट्रातील कोकणच्या हापुसला भाव मिळत नाही व ग्राहकांची ही फसवणूक होते.

आंबा विकत घेणाऱ्या ग्राहकांनीही आरोग्याचा विचार करता पाडाला आलेला आंबा (हिरवट) विकत घेतल्यास तो नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी 4/7 दिवस लागतात. परंतु, ७५% पेक्षा जास्त वेळेला तो आंबा पूर्ण पिकायच्या आधीच खाल्ला जातो.

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी

  • आंबा आतून केशरी तेव्हाच होतो जेव्हा तो जून झाल्यावर (जून महिना नव्हे) उतरवलेला /काढलेला असतो आणि बाहेरील सालाला सुरकुत्या पडेस्तोवर कापायची वाट पाहिली पाहिजे.
    साल सुरकूतणे म्हणजे आंब्यातील पिकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची ग्वाही असते. आंब्यातील आर्द्रता कमी झाल्याने फ्रूकटोज (फळातील नैसर्गिक साखर) saturate (संतृप्त) होते. फळ आकसून त्याचे आकारमान काहीशा प्रमाणात लहान होते. त्या मानाने संतृप्त साखरेचे प्रमाण तेच राहिल्याने तृप्त करणारी गोडी निर्माण होते.
  • जातिवंत हापूस आंब्याची पहिली विश्वसनीय ओळख म्हणजे 5-10 फुटांवरूनही येणारा त्याचा दरवळ.. दुसरी ओळख म्हणजे त्याच्या देठाजवळून वाहिलेला एखाद दुसरा चिकाचा ओघळ असतो. हा चीक (sap) म्हणजे काही हानिकारक घटक नसून आंब्यातील उष्णता वाहक एंझाईम आहे जे जून आंब्याला पिकण्यास मदतच करते. ही निसर्गाचीच अद्वितीय योजना आहे. स्वच्छ, डागरहित, गुळगुळीत हिरवे किंवा स्प्रे ने रंगवल्यासारखे पिवळे फळ हवं असलेल्या अविचारी आणि अतिरेकी सौन्दर्य प्रियतेमुळे (म्हणजे फळांचे cosmatic appeal वाढल्याने) हा दाखलाही आता दुरापास्त झाला आहे. त्यामुळेही फळाच्या गोडीचे आणि नैसर्गिक रंगाचेही नुकसानच होते.
  • तिसरी महत्वाची बाब म्हणजे पाडाला आलेला कोकणी आंबा हा गडद हिरव्या रंगाचा असतो. (अनेकांना गैरसमजातून तो कैरी वाटू शकतो) या गडद हिरव्या रंगाचे पोपटी आणि लालसर रंगात झालेलं रूपांतर. या स्थितीतला आंबा विकत आणून घरी पेंढ्यात आढी लावून ठेवून 5/7 दिवस वाट पहायची तयारी ठेवली तर निराशा न होण्याची खात्री अधिक!

पण, एव्हsssढं सगळं कोणीही ग्राहकांना समजावून सांगत नाही. कारण, त्यांचा शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त आंबे विकण्याकडेच जास्त कल असतो.
त्यासाठी unseasonal, unnatural आणि premature उत्पादन ग्राहकाच्या माथी मारली जातात. मग ते चवीला अगोड आणि रंगाला फिकट असली तरी बेहत्तर..!
पण आपण संयम ठेवू या.. अस्सल हापूस व तोही आरोग्यास हानीकारक नसलेलाच खाऊ या..
आता कुठे अस्सल कोकणच्या हापूसचा हंगाम सुरू झालाय.. ही गोडी, अवीट चव अजून सव्वा ते दीड महिना अनुभवू या..

जळगावात कृषी विभाग व अॅग्रोवर्ल्ड मार्फत सोशल डिस्टसिंगचे पालन करुन देवगड हापूस चे वितरण सुरु
“ना नफा ना तोटा” तत्वानुसार अस्सल देवगडचा हापूस कृषी विभाग, आत्मा व अॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात उपलब्ध करण्यात आला. कोरोनामुळे अॅग्रोवर्ल्डने सोशल मीडियाच्या माध्यमातून आगाऊ नोंदणी केली. त्यानुसार नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना गुरुवार (ता. 16 एप्रिल) रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील पटांगणात एकाच ठिकाणी आंबा वितरीत केला गेला.


आलेल्या सर्व ग्राहकांसाठी एक एक मीटरच्या अंतरावर खुर्च्यावर सोशल डिस्टसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केली गेली होती. प्रत्येक ग्राहकाला दिलेल्या टोकन नंबरप्रमाणे वाटप झाले. त्यामुळे गर्दी न होता अवघ्या दीड तासात सर्व पेट्या वितरित झाल्या. शेतकरी व ग्राहक यांच्यात कृषी विभाग व अॅग्रोवर्ल्ड या दोन्ही माध्यमांनी दुवा म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जळगांवकरांनी अजून नवीन मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

अधिक माहिती व Booking साठी “अॅग्रोवर्ल्ड” फक्त जळगाव शहरात उपलब्ध – 9130091621 / 22

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

शासन आजपासून कापूस खरेदी सुरू करणार

Next Post

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा पर्जन्यछायेत पुढील २४ तासात राज्यासह देशातील इतर भागात पावसाची शक्यता

Next Post
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा पर्जन्यछायेत पुढील २४ तासात राज्यासह देशातील इतर भागात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा पर्जन्यछायेत पुढील २४ तासात राज्यासह देशातील इतर भागात पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.