जळगाव – राज्यभरात वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. लोणी, दूध भुकटीसह दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. याला महिनाही पूर्ण झाला नसाताना आता म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…
खालील व्हिडिओ पहा..
गोकूळ आणि वारणाकडून अंमलबजावणी..
राज्यातील सहकारी आणि खासगी क्षेत्रातील डेअरींनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणीला सुरवात देखील झाली आहे. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून खरेदी दरात वाढ केली आहे.
तीन रुपयांनी वाढ..
31 मार्चपर्यंत म्हशीचे दूध 61 रुपये लिटर होते ते आता 1 एप्रिलपासून 64 रुपये लिटर झाले आहे. अनेक दिवसांपासून म्हशीच्या दूध दरात वाढीची मागणी होती. त्याला अनुसरून तीन रुपयांनी झालेली वाढ ही म्हशीच्या दूध उत्पादकांना दिलासा देणारी आहे. दूध खरेदी आणि विक्री दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
खरेदीदारांना झळ नाही..
खरेदीदारांना झळ बसू नये म्हणून विक्री दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे दुधाचे उत्पादन कमी झाल्यामुळे ही दूध दर वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.