24 ते 48 तासात मुसळधार पाऊसाचा कुलाबा वेध शाळेचा अंदाज
टीम अॅग्रोवर्ल्ड(मुंबई) : मागील 8 दिवसापासून राज्यात दडी मारलेला पाऊस आजपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने पुन्हा सक्रिय होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे, तर कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी मॉन्सूनच्या सरी बरसल्याच नाहीत. अनेक ठिकाणी पेरणी झाली असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले असतांना हा पावसाचा अंदाज दिलासा देणारा आहे.

26 ते 27 जूनला मुसळधार पाऊस
उत्तर अरबी समुद्रात जमिनीपासून 2.1 किमी उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार झाल्याने आज मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्यात वारे व मेघगर्जना, विजांसह पाऊस पडणार आहे. दरम्यान देशाच्या राजधानी सह इतर राज्यात मॉन्सून पोहचला असून तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 ते 48 तासात मान्सून राज्यात बहुतेक ठिकाणी हजेरी लावेल
Thank you Team agroworld आपण दीलेल्या पाऊसाच्या अंदाजामुळे शेतक-यांत आंनद आणी समाधान वाटले .
Thanks for good information
shyamborse115@gmail.com and. Maroti Madhi mali wadha