मान्सूनची चाहूल, 16 मे रोजी पोहोचणार अंदमानात
मूंबई : अर्धा मे महिना होत असल्याने मान्सूनचीही चाहूल लागली आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून पाऊस सरासरीइतका कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात प्रवेश करु शकतो, असा अंदाज आहे.
यंदा चार दिवस आधीच दाखल
सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनच्या वेळापत्रकात बदल पाहायला मिळतो. दरवर्षी २० मे रोजी अंदमानात धडकणारा मान्सून यंदा चार दिवस आधीच येणाची शक्यता आहे. १६ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंकेकडे रवाना होऊन तो आठवडाभरानंतर केरळमध्ये दाखल होईल.
राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. १५ मे पर्यंत राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम आहे. १३ ते १५ मे या कालावधी मध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह व मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकासान झाले आहे. १५ मेपर्यंत विविध भागांत मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात तुफान वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
स्कायमेटचा अंदाज
या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल. ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून उशिरा येऊ शकतो. उत्तर आणि पश्चिम भारतातही १५ जुलैऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल. राजधानी दिल्लीमध्ये यंदा २३ जून ऐवजी २७ जूनला मान्सूनची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये ‘डस्ट स्टोर्म’ वादळ येऊ शकते
आयएमडीने अलर्ट जारी केला
आयएमडीने हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय सब-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू काश्मीर, लडाख, राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राजस्थान तसेच गुजरातमधील लोकांना वादळाचा सामना करावा लागू शकतो. आहे, तर लोकांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.
‘डस्ट स्टोर्म’ कोरड्या हवामान आणि अर्ध-रखरखीत प्रदेशात होणारी हवामान आपत्ती आहे ज्यात कोरड्या पृष्ठभागावरुन जोरदार वारा सुटल्याने वाळू आणि घाण वाहते तेव्हा धुळीची वादळे उद्भवतात, ही प्रक्रियेत मातीला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नैसर्गिकरित्या नेले जाते. शहरी भागात ‘डस्ट स्टोर्म’ हा शब्द वापरला जातो.