लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम, व्हर्च्यूअल ऑफीस या संकल्पना प्रकर्षाने चर्चेला आल्या, अनेक क्षेत्रात त्या रुजल्या. याच काळात माध्यम क्षेत्रात देखील याचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला. ‘टीम अॅग्रोवर्ल्ड’ हे आधुनिक तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत अग्रेसर आहे. कोणत्याही ठिकाणारून अगदी शेताच्या बांधावरून, प्रवासात, पर्यटनात सुद्धा आमची संपादकीय टीम गेल्या पाच वर्षांपासून काम करते.
अगदी पहिल्या अंकापासून सर्व संपादकीय कामकाज इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही आॅनलाईन करत आहोत. आमचे प्रतिनिधी चिंतामण पाटील, आनंद ढोणे, अमोल शिंदे हे निष्ठावंत शेतकरी… स्टोरी कव्हर केल्यानंतर ते थेट शेतातून लिखाण करून पाठवतात. संपादकीय संस्काराची जबाबदारी माझी… कधी घरुन (कायगाव, औरंगाबाद) तर कधी शेतात बसून आणि कोणत्याही ठिकाणाहून पार पाडतो. अंकाचे लेआऊट, डिझाईन पुण्यात होतं, तर अंकाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेऊन त्याला मूर्तरूप देण्याचं कौशल्य संपादक शैलेंद्र चव्हाण सरांचं… आणि ते जळगावला असतात. आज जळगावात ‘अॅग्रोवर्ल्ड’ने आपलं प्रशस्त कार्यालय थाटलं आहे, पण यातून केवळ कार्पोरेट संदर्भातील कामकाज चालते. या कार्यालयातून केवळ संपादकीय विभागाशी समन्वय साधण्याचं काम उपसंपादक प्रवीण देवरे करतात. प्रगत राष्ट्रापैकी अमेरिकेतून हितर कोव्हर या पत्रकार भगिनींनी तर विकसनशील देशापैकी मोहंमद नासीर यांनी अफगानिस्तानातून ‘ अॅग्रोवर्ल्ड’साठी लिखाण केलं आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आमचे जेष्ठ सहकारी (दोघे वयाची पन्नाशी ओलांडलेले) दीपक देशपांडे काका, पंडीत सत्वधर सर देखील टेक्नोसॅव्ही आहेत. कोरोना काळात कॉस्ट कटिंगच्या नावावर अनेक मोठ्या माध्यम संस्थांनी कर्मचार्यांना बेरोजगार केले. अशा काळात ‘अॅग्रोवर्ल्ड’नेे वंदना कोर्टीकर, दत्ता इंगोले, चैताली नानोटे, दीपक खेडेकर, सचिन कवडे, भूषण वडनेरे या काही नवीन तरुण सहकार्यांना सोबत घेतले आहे.
‘ अॅग्रोवर्ल्ड’ कंन्टेट आणि क्वाॅलिटीच्या बाबतीत देखील कृषी माध्यमात अग्रेसर आहेच. काळानुरूप एका बदलासह ‘टीम अॅग्रोवर्ल्ड’ लवकरच नव्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे…
– राहुल कुलकर्णी,
उपसंपादक,
अ
ॅग्रोवर्ल्ड, महाराष्ट्र
