मुंबई /पुणे : बाप्पा पावला, गणेश विसर्जनाला दिवसा झाले मोकळे आकाश; पण म्हणून पाऊस गेलेला नाही. महाराष्ट्रावरील आभाळमाया कायम असून पुढेही पाऊस राहणारच आहे. 9 सप्टेंबरची ताजी स्थिती आणि पुढील 4 दिवसांचे हवामान पाहा आणि समजून घ्या.
हवामान खात्याने यापूर्वीच्या अंदाजात 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाची तीव्रता वाढेल असा इशारा दिला होता. मात्र, आधीच्या 2 दिवसांच्या तुलनेत 8 सप्टेंबर रोजी मुंबई, वगळता मध्य व उर्वरित महाराष्ट्रात नाशिकसारख्या एखादा अपवाद वगळता फारसा मुसळधार अनुभव आला नाही. 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी तर मुंबईसह राज्यात आकाश मोकळेच आहे. पाऊस मुंबईतून कोकण, कर्नाटक, केरळ असा दक्षिणेकडील किनारपट्टी भागात सरकला आहे. ओडिशा व पूर्वेकडील राज्यातही तुफानी पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
दिवसा का झाले मोकळे आकाश?
पावसाच्या राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत, भारतीय हवामान विभाग (आयएमडी पुणे)चे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी माहिती दिली. 9 सप्टेंबर,सकाळच्या नवीनतम उपग्रह निरीक्षणावरून पश्चिम किनार्यावर फारसे ढग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण, मुंबई-पुण्यासह, मध्य आणि अंतर्गत महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश असले तरी पाऊस नाही. अर्थात ही दिवसाची स्थिती आहे. तापमान व आर्द्रता यानुसार त्यात बदल होऊ शकतो. पावसाचा केंद्रबिंदू दक्षिणेकडे सरकल्याने महाराष्ट्राच्या आकाशात दिवसा काळया ढगांची निर्मिती दिसून आली नसावी, असेही मानले जाते.
तुम्हाला या बातम्याही वाचायला नक्की आवडेल
👇👇
1. पाऊस दाटलेला; जोरदार पावलांनी; IMD Alert : आणखी 3-4 दिवस राज्यभर मुसळधार2. Cloud Burst : जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे झालाय ढगफुटीसदृश्य पाऊस ? एका मिनिटात 2 इंच मुसळधार!
रडारवर मुंबई, ठाण्यात ढगांची गर्दी नाही
9 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 च्या रडार निरीक्षणातच असे दिसून आले होते, की मुंबई व ठाण्यात तसेच आजूबाजूच्या परिसरातील आकाश स्वच्छ होते. कोणतेही मोठे ढग एकत्रित कुठे जमलेले नव्हते. काही ठिकाणी हलक्या सरी वगळता सायंकाळपर्यंत राज्यात तशी पावसाची विश्रांतीच राहिली.
मुंबई, ठाण्याला आदल्या दिवशी मात्र झोडपले
मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसराला काल म्हणजेच गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी मात्र पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. रात्री पावसाचा जोर जास्त राहिला. पालघर, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, महानगर क्षेत्रातील उपनगरात तसेच लगतच्या नाशिकमधील काही भागात पावसाने धुमशान माजविले होते. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अपवाद वगळता काल फारसा पाऊस झाला नाही. पुण्यातही काही ठिकाणी तुरळक तुरळक सरीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिला.
राज्यात काही ठिकाणी गुरुवारी जोरदार धुमशान
गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात तर पावसाचा जोर जास्त होता. मध्य महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात जेऊर येथे 120 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यात लोणावळा येथे 100 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. नगर आणि सातारा जिल्ह्यांलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले.
ओडिशा, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार
पूर्वमध्य बंगाल आणि लगतच्या पश्चिम मध्य उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ओडिशा आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहू शकतो. महाराष्ट्रातही पाऊस तडाखा देण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत वायव्य भारतातील मैदानी भागात मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
Comments 4