शेती समृध्दीचा नवा पर्याय…
जळगाव लोकसभेचे लोकप्रिय
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून
महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन (महा फेड FPO ) तसेच अॅग्रोवर्ल्ड जळगाव
याच्या विद्यमाने जिल्हास्तरीय “बांबू लागवड” कार्यशाळा
आयोजीत केली आहे. या कार्यशाळेत बांबू लागवडीसाठी झटणारे राज्यातील आघाडीचे मार्गदर्शक माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष
मा. श्री. पाशाजी पटेल मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी कोकण बांबु विकास केंद्र अर्थात कोणबॅक संचालक मा. श्री. संजय करपे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
जिल्हास्तरीय बांबू लागवड कार्यशाळेचे उद्घाटन
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य
मा. खा. श्री. उन्मेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
शेती समृद्धीचा नवा पर्याय म्हणुन बांबू लागवडीसाठी उत्सुक शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेस उपस्थीत रहावे, ही विनंती आहे.
दिनांक, वेळ व ठिकाण..
दिनांक – रविवार ३१ ऑक्टोंबर २०२१
वेळ – ११ ते २ वाजेपर्यंत
(१०.३० ते ११ नोंदणी आवश्यक)
ठिकाण – जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
(कार्यशाळा निःशुल्क असली तरी नोंदणी आवश्यक असल्याने इच्छुक प्रशिक्षणार्थीनी स. १०.३० वाजता उपस्थित रहावे)