• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जमीन खरेदी विक्री तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्हा दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या या तीन सूचना..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 29, 2021
in हॅपनिंग
1
जमीन खरेदी विक्री तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्हा दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या या तीन सूचना..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारकडून शेतीच्या खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. याबाबत सरकारकडून परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. यामुळे शेतजमीन खरेदी किंवा विक्री करायचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. काय आहेत हे नियम माहिती करून घेऊ या…

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. मागील काही वर्षांत जमिनीचे दर आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. लोक जमिनीचे प्लॉटिंग करून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत.

२० गुंठ्यांच्या आतील खरेदी- विक्री बंद
राज्य सरकारने आदेश देऊनही खरेदी- विक्री केली जाते
परंतु, महसूल अधिनियमांच्या तरतुदीनुसार २० गुंठ्यांच्या आतील खरेदी- विक्री बंद आहे. तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे २० गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन खरेदी विक्री करता येत नाही. हा नियम असतानाही २० गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचे खरेदी – विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त नोंदणीही होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य सरकारने या बाबतीत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक आदेश जारी केला. त्यात राज्यातील सर्व जिल्हा दुय्यम निबंधकांना तीन सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा दुय्यम निबंधकांना तीन सूचना
सूचना क्रमांक १
समजा तुमच्या नावावर एक एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील तुम्ही १० गुंठे किंवा त्याही पेक्षा कमी जमीन विकत असाल तर त्याची आता खरेदी आणि विक्री होणार नाही. त्याचा दस्त नोंद होणार नाही. यामुळे तुमच्या नावावर ती होणार नाही. पण तुम्ही तो प्लॉट ले आऊट करून यात एक दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी आणि प्राधिकरण विभागाची मंजुरी घेतल्यास हे प्लॉट विक्री करण्यास तुम्हाला परवानगी आहे. हा प्लॉट कलेक्टरांकडून एनए केला असेल तर तुम्ही एक दोन गुंठ्यांचा प्लॉट विकू शकता.

सूचना क्रमांक २
तुम्ही यापूर्वी २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन खरेदी केली असेल आणि व्यवहारासाठी सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली नसेल तर ती घेणे आवश्यक आहे.

आपल्याकडे जमिनीचे तीन प्रकार पडतात यामध्ये वरकस जमीन, जिरायत जमीन आणि बागायत जमीन असे प्रकार पडतात, यामध्ये वरकस जमिनीला २० गुंठ्यांच्यावर खरेदी करण्यास परवानगी आहे. कोरडवाहू किंवा जिरायत जमीन पावसाच्या पाण्यावर शेती होत असणारी जमीन. याप्रकारच्या जमिनीचे क्षेत्र १५ गुंठे ठरवण्यात आले आहे. बागायत जमीन क्षेत्र २० गुंठे, तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १० गुंठे निश्चित करण्यात आले आहे.

सूचना क्रमांक ३
एखादा वेगळा किंवा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित करण्यात आलेल्या असतात. किंवा त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल, अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पण, जर अशा तुकड्याचं विभाजन करणार असाल तर मात्र त्याला वरील अटी व शर्ती लागू राहतील. त्यामुळे तुम्ही जर शेतजमीन खरेदी करणार असाल, तर हे नवे बदल लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Arable landBuy & sellCollectorHorticulture landMaharashtra Governmentखरेदी विक्रीजिरायत जमीनजिल्हाधिकारीबागायत जमीनमहाराष्ट्र सरकारवरकस जमीनशेती
Previous Post

हमीभाव संदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी… कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपीचीच होतेय चर्चा… शेतकर्‍यांना निर्णयाबाबत उत्सुकता

Next Post

ग्रेपनेट अंतर्गत द्राक्षांची निर्यात… 45 हजार 393 द्राक्ष उत्पादकांनी केली नोंदणी – फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते

Next Post

ग्रेपनेट अंतर्गत द्राक्षांची निर्यात... 45 हजार 393 द्राक्ष उत्पादकांनी केली नोंदणी - फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते

Comments 1

  1. लक्ष्मण विठ्ठल पाष्टे says:
    5 years ago

    नमस्कार
    शेतजमीन एन.ए न करताच कलेक्टर नी ४ गुंठे शेतजमीन ची खरेदी करण्यासाठी परमीशन दिली आहे.त्यासाठी ५ वर्षांत एन.ए करण्याच्या अटीवर असा शेरा आहे. यासाठी कलेक्टर नी कोणत्या कायद्याच्या आधार घेतला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish