दूधदूभत्याच्या व्यवसायासाठी चार्याचे उत्पादन करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.
- एका गुणवत्तेचा चारा वर्षभरा मिळावा लागतो.
- चार्याची पिके अधिक उत्पादन देणारी असावीत.
- सर्व क्षेत्रासाठी सिंचन व्यवस्था असावी.
- खते तयार करण्याची व देण्याची व्यवस्था असावी.
वर्षभर चारा मिळविण्यासाठी एका मागून एक तीन किंवा चार पिके घेता येतात. वेगवेगळ्या जातींच्या वाढीचा काळ वेगवेगळा असतो. त्याचा उपयोग करून वर्षभर चारा मिळण्याची व्यवस्था करण्यात येते. एका पिकाचा आयुष्यक्रम पूर्ण होण्याआधी दुसरे पीक त्यामध्ये लावले जाते. त्याचप्रमाणे एका मागून एक फेरपालट करून चार्याची पिके घेता येतात. ज्वारी, बाजरी, मका, गिनी गवत, पॅराघास , र्होडस् गवत, लसूणघास,बरसीम, गवार, मटकी, चवळी, मोहरी इ. अधिक उत्पादन देणारी पिके लावता येतात. चार्याचे उत्पादन वाढविण्यासाठी भरघोस उत्पादन देणार्या बियाणांचे उत्पादन वाढविणे जरुरीचे आहे. पुष्कळशा नव्या चांगल्या जाती मुळांचे किंवा खोडांचे फुटवे लावून विकसित केल्या आहेत. त्यामुळे त्यांची बी तयार करण्याची क्षमता अत्यल्प असते. शिवाय गवतांना फुले येऊ न देता ती वारंवार कापली जातात. त्यामुळे फुले येऊन बी धरण्याच्या प्रकीयेवर नियंत्रण पडते. ज्या विशिष्ट भागात विशिष्ट गवते व द्विदल वनस्पती आढळतात तेथेच त्यांची बियाणे मिळविण्यासाठी लागवड केली तर चांगले. विकसित केलेल्या नवीन प्रजातींचे बी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणेही गरजेचे आहे. लागवडीची चार्याची गवते व शिंबी वनस्पती आणि कुरणातील वन्य गवते व शिंबी वनस्पती यांचे बियाणे उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित योजना आखून प्रयत्न केले पाहिजेत. शेतकर्यांना चार्यांच्या बियाणांचे उत्पादन करणे हे एक नवे क्षेत्र खुले आहे. पुष्कळ ठिकाणी शेतजमीन खारी, चोपण असते किंवा पाणथळ, दलदलीची, आम्लधर्मी किवा अल्कधर्मी असते. अशा ठिकाणी चार्यासाठी विशिष्ट गवते व शिंबी वनस्पती लावता येतील.
सोडिअम क्षार असलेली खारी जमीन – बरसीम, मेथी, शेवरी,नेपियर, हायब्रीड बाजरी, मकचारी
खारी जमीन – ज्वारी, नेपियर, हायब्रीड बाजरी, लसूणघास, शेवरी, पॅरागवत, ओट
आम्लधर्मी जमीन – चवळी, दीनानाथ गवत, मका, नेपियर- हायब्रीड बाजरी, गिनी गवत
चुना असलेली जमीन – ज्वारी, बाजरी, शेवरी, नेपियर-हायब्रीड बाजरी.
आम्लधर्मी जमिनीत चुना घातला असता तिची उत्पादन क्षमता वाढते.