जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कंबोडियातील सिमरिप शहरातील मीकांग नदी किना-यावर वसले आहे. त्याचा विस्तार तब्बल 406 एकरवर पसरलेला आहे. मंदिर बांधण्यासाठी पन्नास कोटी दगडांचा वापर करण्यात आला. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन आहे…
भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशातील अंकोर येथे अंकोरवट मंदिर आहे. भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे. सरकार दरवर्षी करते करोडो रूपये खर्च…
अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर मध्ययुगात ‘व्रह विष्णुलोक’ (गृह विष्णुलोक) म्हणून ओळखले जाई. सुमारे इ.स. ८८९च्या काळात ख्मेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने येथे यशोधरापुर नावाची आपली राजधानी स्थापन केली.
या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच अंगकोर म्हटले जाऊ लागले. त्यानंतर आलेल्या सर्व राजांनी आपापल्या परीने नगराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारचे बांधकाम केले.
अंकोरवाट मंदिराची स्थापना
याच घराण्यातील एक राजा सूर्यवर्मन द्वितीय ( इ.स. १११३- इ.स. ११४५) यांनी अंकोरवाट मंदिराची स्थापना केली. त्यांनी मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंना एक विशाल खंदक बनवले. ज्याची रुंदी ७०० फूट आहे. दूरवरून बघितल्यावर हे खंदक एखाद्या तलावाप्रमाणे दिसते.
खंदक पार करण्यासाठी मंदिराच्या पश्चिमेला एक पूल बनवला. मंदिराचे बांधकाम सुमारे ३७ वर्षे हे अखंडित सुरु राहिले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा ( इ.स. ११८१- इ.स. १२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले. परंतु या वेळेपर्यंत कंबोडिया देशामध्ये बौद्धधर्माचा वाढीस लागला होता आणि त्यामुळेच मंदिराच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या बांधकामामध्ये बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव देखील आढळतो. सोबतच मंदिराच्या अनेक भागांत भगवान बुद्धांच्या मूर्ती देखील आढळतात. याच कारणामुळे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येतात.
मेरू पर्वत व क्षीरसागराची प्रतिकृती
स्थापत्त्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुस्थितीत असणारे अंगकोर वाट ही एकमेव वास्तू आहे. या मंदिराचे बांधकाम हिंदू पुराणातील क्षीरसागराच्या मंथनाचा प्रसंग दर्शविण्यासाठी केले गेले आहे. मंदिराची मुख्य इमारत मेरू पर्वताची प्रतिकृती मानली जाते तर सभोवतीचा पाण्याचा खंदक क्षीरसागर मानला जातो.
भिंतींवर अमृत मंथनाची दृश्य
ह्या मंदिराच्या भिंतींवर भारताची झलक दिसते. मंदिराच्या भिंतींवर खूपच सुंदर प्रकारे अप्सरांची चित्रे कोरली आहेत. राक्षस आणि देवांच्या मध्ये झालेले अमृत मंथनाची दृश्य ही दाखवले गेले आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पूर्ण जगातून लोक इकडे येतात.
भव्य मंदिराची वास्तुरचना
हे मंदिर 406 एकर इतक्या प्रचंड क्षेत्रावर असून एका उंच व्यासपीठावर आहे. त्याचे तीन विभाग आहेत. प्रत्येक विभागात 8 घुमट आहेत. यामध्ये सुंदर शिल्पे आहेत आणि वरच्या भागात जाण्यासाठी जिने आहेत. मुख्य मंदिर तिसऱ्या विभागाच्या विस्तीर्ण गच्चीवर आहे. त्याची शिखर 213 फूट उंच आहे. मंदिराभोवती दगडी भिंत आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे सुमारे दोन तृतीयांश मैल आणि उत्तर ते दक्षिण अर्धा मैल आहे. या भिंतीनंतर सुमारे 700 फूट रुंद खंदक आहे, ज्यावर 36 फूट रुंद पूल आहे. या पुलावरून पक्का रस्ता मंदिराच्या पहिल्या विभागाच्या प्रवेशद्वाराकडे जातो. हे मंदिर बराच काळ निनावी राहिले. १९ व्या शतकाच्या मध्यात हेन्री महोत या फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञामुळे अंगकोर वाट मंदिर पुन्हा अस्तित्वात आले.
– वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत स्थान असलेले हे मंदिर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
-कंबोडिया सरकार हे मंदिर चांगल्या स्थितीत राहावे म्हणून दरवर्षी करोडो रूपये खर्च करते.
– एवढेच नव्हे तर, कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजात चिन्हात मंदिराला दाखवले गेले आहे.
– भारतीयांसह जगभरातील दरवर्षी लाखो पर्यंटक त्याला भेट देतात.
कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर मंदिराची आकृती
परदेशात कंबोडिया देशाची ओळख अंगकोरवाट मंदिरावरूनच होते. या ऐतिहासिक वास्तूबद्दल कंबोडिया देशात किती आदर आहे, याचा अंदाज या गोष्टीवरूनच येतो की त्यांच्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची आकृती निर्माण केलेली आहे.
आख्यायिका…
असे सांगितले जाते की, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी-देवतांशी जवळीक साधून अमर होऊ इच्छित होते. यासाठी या राजाने एक विशिष्ठ पूजास्थळ तयार केले होते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवाची पूजा केली जात होती. आज हेच मंदिर अंगकोर वट नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा आढळून येतात. मंदिरात सीताहरण, हनुमानाचा अशोक वाटिका प्रवेश, अंगद प्रसंग, राम-रावण युद्ध इ. कथांचे कोरीव काम आहे. हे मंदिर देवाधी देव विष्णूंना अर्पित केले आहे, परंतु पहिल्यांदा हे मंदिर शंकरदेवांसाठी बनवले गेले होते.
कंबोडियाला कसे जायचे..? ✈️
कंबोडियाला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथून उड्डाणे उपलब्ध आहेत. व्हिसाबद्दल बोलायचे तर, ऑन अरायव्हल व्हिसा येथे उपलब्ध होईल. याशिवाय ई-व्हिसा देखील घेता येतो. कंबोडियामधील नोम पेन्ह आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताकडून उड्डाणे येतात. विमानतळापासून अंगकोर वाटपर्यंत बस आणि कॅब उपलब्ध आहेत.
Khupch Shan maheti Dele
Dhnevad