जळगाव – आपल्या घरातील तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आदी धान्याला कीड, धनोर, सोनकिडे लागत आहेत काय..?? काळजी करू नका.. अॅग्रोवर्ल्ड आपल्याला अत्यल्प खर्चिक व घरगुती उपाय सुचवत आहे.. त्याची अंमलबजावणी करा किडींपासून आपल्या घरातील धान्य सुरक्षित ठेवा.. विशेष म्हणजे यात बोरिक पावडर तसेच इंजेक्शन अशा शरीरास घातक, विषारी, केमिकलयुक्त उपायांचीही गरज नाही..
जळगावात अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद उपलब्ध…
अस्सल व भेसळमुक्त खा.. शुद्ध खा.. आनंदी रहा.. 🌱
किडींपासून धान्य सुरक्षित राहण्याचे उपाय आपण अनेकदा घरात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आदी विविध प्रकारांच्या डाळी भरून ठेवत असतो. मात्र कालांतराने या धान्याला कीड, सोनकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी ते वापरात आणताना प्रत्येक वेळी हे धान्य किंवा डाळी गाळण, चाळण, निवड करण्यात वेळ जातो. शिवाय, हे अत्यंत जिकरीचे काम असते. यावर उपाय म्हणून अनेक जण बोरिक पावडर धान्याला लावतात तसेच मेडिकलवर मिळणारे इंजेक्शन धान्यात फोडून टाकतात. परंतु, हा अत्यंत जहाल व घातक उपाय आहे.
नाशिकमध्ये अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद उपलब्ध…
हा घरगुती उपाय वापरा..
पारंपरिक काळापासून आपल्या घरातील आजी पणजी यांनी योजलेले उपाय अंमलात आणल्यास आपल्याला अतिशय कमी खर्चात व शाश्वत मार्ग सापडेल. धान्याच्या कोठी किंवा डबे असल्यास या प्रत्येक मोठ्या कोठीमध्ये पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग व पाच ते सहा लाल कोळी मिरची मिसळून ही कोठी बंद करावी. छोटे डबे असल्यास हेच प्रमाण काळी मिरी, लवंग, लाल कोरडी मिरची प्रत्येकी दोन ते तीन घेणे. मात्र गरजेपुरता धान्य काढल्यानंतर पुन्हा ती कोठी किंवा डबा लगेच बंद करण्यास विसरू नए. असे केल्याने किडी, धनोर सोंडकिडे यांच्यापासून आपले धान्य सुरक्षित राहील. शिवाय हा नैसर्गिक उपाय असल्याने बोरिक पावडर किंवा इंजेक्शन याच्या तुलनेत अल्प खर्चिक व सुरक्षितही आहे एकदा हा उपाय नक्कीच करून पहा धन्यवाद
ही व अशा प्रकारची माहिती मिळण्यासाठी…
अॅग्रोवर्ल्ड ही संस्था गेल्या सात वर्षांपासून कृषी विस्तार क्षेत्रात कार्यरत आहे. महिन्यातून किमान तीन ते पाच वेळा आपल्याला घरात कामात येतील, उपयोगी ठरतील असे उपाय सुचविण्याचा अॅग्रोवर्ल्डचा प्रयत्न असेल. याशिवाय जगात काही रोचक, रंजक, ऐतिहासिक, रहस्यमय घटना घडामोडीदेखील आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यांना या गोष्टींची आवड असेल त्यांनी अॅग्रोवर्ल्डचा ग्रुप जॉईन केल्यास ही माहिती आपल्याला मोफत व नियमितपणे मिळू शकेल.
कोळी मिरची ऐवजी साधी लाल मिरची चालेल का?
कोळी मिरची काय प्रकार आहे माहीत नाही