प्रतिनिधी/पुणे
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक निकाल आज जाहीर झालेत. विविध ठिकाणी संमिश्र निकाल पहावयास मिळत आहेत. संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत देखील मोठी चुरस होती. १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळवत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने १३ जगावर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
आधीच एक जागा बिनविरोध असलेल्या अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटात लढत होती. यामध्ये १७ पैकी १४ जागा विजयसिंह मोहिते पाटील गटाला मिळाल्या तर तीन जागांवर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने विजय संपादन केला आहे.
अकलूजची माहिती
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. अकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते.
इतिहास
अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते. अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे.येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे.या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरु करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता .या बाजारामध्ये जातिवंत घोडे पर राज्यातून विक्रीसाठी येतात .ग्रीन फिंगर इंग्लिश मेडियम स्कूल प्रसिद्ध आहे .कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरते अकलूज पासून जवळच वेळापूर येथे खूप मोठा बाल आनंद मेळावा भरला होता . सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर या ठिकाणी आहे .एस. एन.डी. टी. विद्यापीठाचे गृह विज्ञान कॉलेज येथे आहे .महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे आहे .शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे आहे . अकलूज हे आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात.अकलूज गावाजवळ व परिसरात २० कि .मी .अंतरामध्ये ०४ साखर कारखाने आहेत. त्यामुळे माळशिरस तालुका हा प्रगतीशील तालुका म्हणून ओळखला जातो. एस .एन .डी .टी विद्यापीठाचे महिला बी. एड. कॉलेज आहे