• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कॅपॅसीटर… कृषीपंपाच्या भारनियंत्रणाचा जीवरक्षक… शेतकर्‍यांना वापर करण्याचे आवाहन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 17, 2021
in तांत्रिक
0
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषीपंपांसाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनाश्यक गोष्टीमध्ये होऊ लागला. त्यामुळे साहजिकचच वीज यंत्रणेवर कमालीचा भार वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण अशा अडीच कोटी वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणार्‍या महावितरण कंपनीने तारेवरची कसरत करीत औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती ग्राहकांसह सर्व कृषीपंप वीजग्राहकांना वीज पुरवठा करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. सिंगल फेज यंत्रणा राबवत गावासाठी आणि शेतीसाठी स्वतंत्र फीडर (वीज वाहिन्या) निर्माण करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली आहे. असे असले तरीही कृषीपंप धारकांकडून पुरेसी काळजी घेतली जात नसल्याने रोहित्र नादुरूस्त होऊन वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर वीज पुरवठा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. मागील काही वर्षाचा आढावा घेतल्यास महावितरणने रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण बरेचसे आटोक्यात आणले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक कटाक्ष टाकला असता, कृषीपंप जळण्याचे अथवा रोहित्र जळाल्याने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत होण्यास कृषीपंपांना लावलेले टोस्वीच तसेच कॅपॅसिटर न लावणे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅपॅसीटर वापराचे फायदे
कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसीटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषीपंपास कॅपॅसीटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत यासाखरे फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषीपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार 30 टक्क्यांनी कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकर्‍यांना योग्य दाबाचा, अखंडीत व सुरळीत वीजपुरवठा मिळतो. या सर्वांचा लाभ शेतकर्‍यांना होणार असल्यामुळे त्यांन कॅपॅसीटरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रत्येक कृषीपंपास क्षमतेनुसार कॅपॅसीटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसीटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडीत वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, बहुतांश ग्राहकांनी कृषीपंपास कॅपॅसीटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसीटर बसविले नाहीत, त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसीटर बंद असल्यास किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कॅपॅसीटर बसवून घेतल्यामुळे संबधित रोहित्रावरील भार 30 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल.

आयएसआय मार्कचे हवेत कॅपॅसीटर
कॅपॅसीटर बसविताना ते आय. एस. आय. मार्कचे व नामांकीत कंपनीचेच बसवून घ्यावेत. जसे की, एल अ‍ॅन्ड टी, क्रॉम्पटन ग्रीव्हज, सुबोधन तसेच कॅपको यासारख्या कंपनीचे कॅपॅसीटर बसवावे. वीज भाराच्या क्षमतेनुसार कॅपॅसीटर वापर करावा. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज भार कमी करता येऊ शकतो. शिवाय मोटर पंप जळण्याचे प्रमाण कमी होते, पंपाला लागणारी वीज (करंट) कमी लागते व पुरेसे व्होलटेज मिळते. रोहित्रावरील 30 टक्के भार कमी झाल्यामुळे त्यावर अधिक भार देता येऊ शकतो व त्यामुळे जास्त कृषीपंप चालवणे सहज शक्य होते. तसेच वितरण हानी कमी होऊन वीज बील कमी होण्यास मदत मिळते.

ऑटोस्विचचा वापर टाळा
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषीपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने अनेकांनी कृषी पंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषीपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी, रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. राज्यात सुमारे 41 लाख कृषीपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जाते. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषी पंपांना ऑटोस्विच लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषीपंप आपोआप चालू होतात. परिणामी, रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्‍यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी कृषीपंपांना ऑटोस्विच लावू नये. कृषीपंपासाठी कॅपॅसीटर हा एखाद्या देवदूतासारखे काम करतो तर ऑटोस्वीच हे मारक ठरू शकते. त्यामुळे कृषीपंपधारकांनी त्यांच्या वीजपंपावर असलेले ऑटोस्वीच तत्काळ काढून टाकावे. गरजेप्रमाणे कृषीपंप स्वतः चालू व बंद करावा. ऑटोस्वीच काढणे काही कारणास्त्व शक्य नसल्यास, अधिभारीत रोहित्रावरील कृषीपंपधारकांनी एकाच वेळी वीजपुरवठा सुरू करू नये. आपापसांत ठरवून टप्प्याटप्प्यांनी कृषीपंप सुरू करावे. त्याचबरोबर मंजूर असलेल्या भार क्षमतेपेक्षा संलग्न वीज भार जास्त असेल तर अधिकृतरित्या वीजभार मंजूर करून घ्यावा जेणे करून कृषीपंपधारक वापरत असलेल्या क्षमतेच्या एच.पी.च्या अनुशंगाने महावितरणला रोहित्राची क्षमता वाढवण्यास किंवा नवीन रोहित्र मंजुर करण्यास व बसविण्यास मदत होईल.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आयएसआय मार्कएच.पीएल अ‍ॅन्ड टीकृषीपंपकॅपकोकॅपॅसीटरक्रॉम्पटन ग्रीव्हजमहावितरणसुबोधन
Previous Post

भारतीय शेतीचे बदलते स्वरूप शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा वेध

Next Post

वैशाली पाटील यांच्याकडील खपली गव्हाला मागणी…शरीरासाठी आरोग्यदायी…खपली गहू व बियाणे उपलब्ध…

Next Post
वैशाली पाटील यांच्याकडील खपली गव्हाला मागणी…शरीरासाठी आरोग्यदायी…खपली गहू व बियाणे उपलब्ध…

वैशाली पाटील यांच्याकडील खपली गव्हाला मागणी...शरीरासाठी आरोग्यदायी...खपली गहू व बियाणे उपलब्ध...

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.