सध्या शेती हा जगातील नफा मिळवून देणारा व्यवसाय बनला आहे, तरीही जगभरात अन्नाच्या कमतरतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, 2050 पर्यंत ती 9.7 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जागतिक अन्न-धान्य सुरक्षा आणि गरजेइतक्या उत्पादनाचे आव्हान कृषी उद्योगासमोर उभे आहे. ते पेलण्यासाठी शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ॲग्रीटेक म्हणजेच कृषी तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस सध्या आले आहेत.
संस्कृती विद्यापीठाचे कुलगुरू सचिन गुप्ता यांच्या मते, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सतत वाढत्या लोकसंख्येच्या मागणीसाठी सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. भारत आणि जगभरात कृषी क्षेत्राची भरभराट होण्यासाठीही त्याचा हातभार लागत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. कृषी क्षेत्रात कार्यरत जागतिक मनुष्यबळापैकी 27% पेक्षा अधिक लोक भारतातील कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2021 पर्यंत भारतात सुमारे 152 दशलक्ष लोक कृषी क्षेत्रात कार्यरत होते.
ॲग्रीटेक म्हणजे काय
सोप्या भाषेत सांगायचे तर, ॲग्रीटेक ही कृषी प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादन सुधारण्यासाठी विकसित केलेल्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची शाखा आहे. ॲग्रीटेकमध्ये विविध ऍप्लिकेशन्ससह एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या अनेक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. कमी खर्च, कमी श्रम आणि कमी वेळात अन्न-धान्य उत्पादन वाढवण्याच्या दिशेनेच हे सारे कार्य करतात.
ॲग्रीटेक मार्केट आणि मागणी
जागतिक ऍग्रीटेक मार्केट 12.1% च्या कंपाउंड ऐनुअल ग्रोथ रेट (सीएजीआर) म्हणजेच वार्षिक चक्रवाढ दराने वाढत आहे. 2019 मध्ये जवळपास 17,500 दशलक्ष डॉलर्सवरून ऍग्रीटेक मार्केट 2027 पर्यंत 41,000 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे होईल, असा अंदाज आहे. देशातील ऍग्रीटेक उद्योगातही लक्षणीय वाढ होत आहे. 1000 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्ससह, आर्थिक वर्ष 2020 मध्ये 2.4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असलेले ऍग्रीटेक मार्केट 2025 पर्यंत तब्बल दहापट होऊन 24 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
अनेक स्टार्ट-अप्स, भरपूर नवीन नोकऱ्या
अनेक उद्योजक, अभियंते, उद्यम भांडवलदारांना अनेक वर्षांपासून अॅग्री टेक क्षेत्रात रस आहे. भारतातही 2017-2020 दरम्यान ॲग्रीटेक उद्योगातील गुंतवणूक 91 दशलक्ष डॉलर्सवरून 2020 मध्ये जवळपास 330 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची, लोकांची मोठी मागणी आहे. अनेक स्टार्ट-अप्ससह भरपूर नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. ॲग्रीटेक कंपन्या शेतकरी आणि तंत्रज्ञान यांच्यातील दरी कमी करत आहेत. त्यासाठी वैविध्यपूर्ण करिअर पर्यायही या क्षेत्रात उपलब्ध होत आहेत.
नवनवीन शोध, तंत्रज्ञानाने शेती प्रगत करणारे करिअर
सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीमधील करिअर हा प्रत्येक गोष्टीचा गाभा बनला आहे. आता नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानाने शेतीही प्रगत होत आहे. भारतासारख्या कृषी-आधारित देशांनाही अॅग्रीटेकमध्ये प्रचंड क्षमता दिसत आहे. नवकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असलेल्या आणि त्यांचा अवलंब करण्यात सक्षम असलेल्या कुशल तरुणांसाठी उत्तम करिअरच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. ॲग्रीटेक क्षेत्रातील करिअर भविष्यात खूप मागणीत राहील.
ॲग्रीटेक क्षेत्रात अशा असतील संभाव्य नोकरीच्या संधी
1. अन्न शास्त्रज्ञ
गरज व पोषण मूल्यानुसार नवनवे अन्नधान्य शोधण्यासाठी, अन्नातील पौष्टिक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी, प्रक्रिया केलेले अन्न निरोगी आणि सुरक्षित बनवण्याचे मार्ग शोधण्यासाठी अन्न शास्त्रज्ञ कार्य करतात. सोप्या भाषेत अन्न उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच वैज्ञानिक तत्त्वे आणि तंत्रज्ञानाच्या वापराच्या मदतीने नवे अन्न-धान्य, पदार्थ हे शास्त्रज्ञ तयार करतात.
2. जलशास्त्रज्ञ/ जलवैज्ञानिक
जलशास्त्रज्ञ मुख्यत्वे पृष्ठभागावरील पाण्यामध्ये गुंतलेले असतात. ते भौतिक गुणधर्म, वितरण, पृष्ठभागावरील पाण्याचे अभिसरण तसेच भूगर्भातील पाण्याचे संशोधन करतात आणि जगभरात स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा करतात. जलशास्त्रज्ञ म्हणजे हायड्रोलॉजिस्टच्या कामात पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे, देखील समाविष्ट आहे.
3. ड्रोन टेक्नॉलॉजिस्ट
रोबोटिक्स, सेन्सर्स, एरियल इमेजेसच्या वापरामुळे कार्यक्षमता वाढवणे सोपे झाले आहे. ड्रोन तंत्रज्ञ शेतकऱ्यांना पीक नुकसान कमी करण्याचे आणि उत्पादन वाढवण्याचे मार्ग उपलब्ध करून देतात.
4. कृषीशास्त्रज्ञ
कृषीशास्त्रज्ञ हेच शेतीला तंत्रज्ञानाशी जोडतात. कृषीशास्त्रज्ञांना पीक डॉक्टर असेही म्हणतात. ते माती नियंत्रण, पीक उत्पादन आणि माती व्यवस्थापन वाढविण्यासाठी व्यावहारिक आणि वैज्ञानिक उपाय प्रदान करण्याच्या दिशेने कार्य करतात. ते वनस्पतींचे पोषण वाढवण्यासाठी आणि मातीचे आरोग्य निश्चित करण्यासाठी प्रयोग करतात.
5. कृषी संवादक
प्रत्येक उद्योगाला नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण आणि बरेच काही करण्यासाठी संवादक किंवा वकिली करणारे संभाषणकर्ते आवश्यक असतात. कंटेंट रायटिंग, जनसंपर्क विकसित करण्यासाठी, सामायिक करण्यासाठी कृषी संभाषणकर्ते, संवादक हे विज्ञान संप्रेषक असतात जे प्रामुख्याने कृषी आणि बिगर कृषी भागधारकांशी शेतीशी संबंधित विषयांवर सहज संवाद साधू शकतात. माहितीचा असा सेतू निर्माण करून त्याजोगे ते कृषी तंत्रज्ञानाचा जागर घडवतात.
Jay Javan jay kisan
Nice information …where do I get to know about job vacancy in above mentioned areas to convey agricos n job seekers