प्रतिनिधी/जळगांव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अॅग्रोवर्ल्ड व कृषी विभाग (जळगाव) यांनी संयुक्तपणे राबविलेल्या थेट शेतमाल विक्री या उपक्रमाची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे व जळगांव जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविलेले असे संयुक्त उपक्रम हे राज्यात इतर ठिकाणी राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी कोकणातील शेतमाल जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याने त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
लॉकडाऊनमुळे सर्वच शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात पडून होता.. बाजार समित्या बंद, बेभरवशाची वाहतूक परिणामी डोळ्यांसमोर तो शेतमाल खराब होत होता.. भयंकर विदारक चित्र होतं.. एकीकडे शेतमाल खराब होत असतांना शहरात मात्र ग्राहकांना शेतमालाचा तुटवडा होता. अशा स्थितीत जळगावचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पुढाकार घेतला व “थेट शेतकरी ते ग्राहक” उपक्रम राबविण्यासाठी पावले उचलली. SDAO संभाजी ठाकूर व आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार यांच्यासह झालेल्या बैठकीत ही जबाबदारी अॅग्रोवर्ल्डवर पडली आणि बघता बघता या उपक्रमाने हळूहळू आकार घ्यायला सुरुवात केली.
जळगाव येथे शासकीय विश्रामगृहात कृषी मंत्री दादाजी भुसे व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव शहरात राबवलेल्या थेट शेतमाल विक्री उपक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळी अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, SDAO संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, धुळे SDAO विवेक सोनवणे, नगरसेवक अमर जैन, आत्माचे उपसंचालक संजय पवारआदीची उपस्थिती होती. कृषिमंत्री श्री. भुसे यांनी काही महत्वाच्या सूचनाही दिल्या.
लक्षवेधी उलाढाल
अॅग्रोवर्ल्डने Work From Home च्या माध्यमातून सव्वा महिन्यात 5500 डझन अस्सल व दर्जेदार देवगड हापूसची तर तीन दिवसात घोटी येथील शेतकऱ्यांचा 10 हजार 500 kg इंद्रायणी तांदूळ, 1000 kg सेलम हळद, 1000 kg उन्हाळी बाजरी, तासगावच्या 450 kg बेदाण्याची विक्री करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Online Advance Payment तसेच विक्री वाटप ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व सॅनटराईजचा वापर करण्यात येऊन योग्य ती खबरदारी घेत हा सर्व उपक्रम राबविण्यात आला. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी एका ग्राहकास देवगड आंब्याची पेटी तसेच तांदूळ देण्यात आला.
(संपर्क – 9130091621 /22 /23 / 24 / 25)