• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2021
in हॅपनिंग
5
काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि “गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’ असे करण्यात आले आहे. प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत. या योजनेमुळे पिकांची काढणीपश्चात वाहतूक सोईस्कर होऊन दरवर्षी हजारो कोटींच्या शेतमालाची नासाडीही वाचेल.

राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीकं घेण्यात मोठा अडसर होतो. शिवाय पिकांची काढणीपश्चात वाहतूक सोईस्कर होऊन दरवर्षी हजारो कोटींच्या शेमालाची नासाडीही वाचेल. हा उद्देशही डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. तसेच या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोहयो अंतर्गत मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे. या योजनेमुळे सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत.

बारमाही रस्ता उपलब्ध होणार
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा असतो. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता असणे खूपच आवश्यक असते. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते निर्माण केले तरी देखील जास्त पावसामुळे हे रस्ते वाहून जातात परिणामी केलेल्या रस्त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. याच बाबीचे महत्व अधोरेखित करून शासनाच्या वतीने पालकमंत्री शेत/पाणंद योजना राबविण्यात येत होती त्याच योजनेचे नाव बदलून आता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे ठेवण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत रस्त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे
एका गावावरून दुसऱ्या गावी जाणारे रस्ते.
शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग.
इतर ग्रामीण रस्ते.
अस्तित्वातील शेत किंवा पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करणे.
बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते अस्तित्वात आहेत परंतु त्या रस्त्यांची अवस्था अगदी बिकट झलेली आहे. तर अशा रस्त्यांचे मजबुतीकरण मातोश्री शेत रस्ता योजना मधून केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळू शकतो आणि शेतातील माल बाजारात आणण्यासाठी जी समस्या येत आहे ती सुटू शकते.

शेतावर जाण्याचे पायवाट व गाडीमार्ग
शेतामध्ये जाण्यासाठी पायमार्ग व गाडीमार्ग रस्ते नकाशावर दर्शविलेले नसतात. जर कधी शेतात जाण्यासाठी गाडीमार्ग किंवा पायवाट देखील आपण त्याला म्हणू शकतो. अशा रस्त्याचा वाद निर्माण झाला तर या रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत. तर अशा रस्त्यांचे काम देखील मातोश्री शेत रस्ते योजना मधून केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे शेत रस्ते तयार करण्यात येणार.

रोजगार हमी योजनेतून हे सर्व कामे केली जाणार आहेत. या योजनेची अमलबजावणी करत असताना अकुशल कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० ठेवण्यासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून कुशल निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेत रस्ता आहे किंवा पाणंद रस्ता आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे रस्ते तयार करण्यात यावेत असा स्पष्ठ उल्लेख या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे.

योजनेची कामे खालील यंत्रणे मार्फत राबविली जातील
मातोश्री शेत रस्ते योजना जरी राबविली जाणार आहे तरी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल कि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक्या कोणत्या विभागाला संपर्क साधावा किंवा कोणता विभाग या योजनेची अमलबजावणी करेल. तर खालीलप्रमाणे विभागाप्रमाणे या योजनेची अमलबजावणी केली जाईल.
ग्रामपंचायत.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग / उपविभाग.
सार्वजनिक बांधकाम विभाग / उपविभाग.
वनविभाग.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आणि ग्रामपंचातची जबाबदारी…
शेतकऱ्याने जर मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली तर अशा शेत किंवा पाणंद रस्त्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतवर असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेवून शेतकऱ्यांना समजावून सांगणे व संबधित रस्त्याचे अतिक्रमण दूर करणे. जर गाव पातळीवर प्रकरण मिटत नसेल तर अशी प्रकरणे तालुकास्तरीय समितीकडे सादर करावीत आणि त्या समितीच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अतिक्रमणग्राम समृद्धीजिल्हा परिषद बांधकाम विभागपायवाटबारमाहीमनरेगामहाराष्ट्रमातोश्रीशेत पाणंदसार्वजनिक बांधकाम विभाग
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्डचा दिवाळी अंक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक… जानेवारीत होणारे अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनही सर्वोत्कृष्ठच ठरणार… पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

Next Post

भारतीय शेतीचे बदलते स्वरूप शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा वेध

Next Post
भारतीय शेतीचे बदलते स्वरूप  शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा वेध

भारतीय शेतीचे बदलते स्वरूप शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा वेध

Comments 5

  1. Chetan says:
    4 years ago

    रोड बनवन आहे

  2. सचिन मदनलाल कांकरिया says:
    4 years ago

    फार चांगला निर्णय आहे साहेबांचा🙏
    माझे एक खेड्यात कारखाना आहे तो रस्त्या अभावी बन्द पडला आहे
    ह्या निर्णया मुळे मला याचा फायदा होईल का?

  3. Satish dehade says:
    4 years ago

    This news is fraud or real

  4. N T MAHAJAN says:
    4 years ago

    Matoshri gram sadak Yojana in Maharashtra will be really the boon for all the farmers .In Dhule district ,Shindkheda Taluka the Grampanchayat of Pashte will able to solve the problem of panand rasta from the pond nearby the way joined Mahlsar phata to Kamkheda village ,Adjucent the panand rasta is waiting for repair . This repaired will be boon to all farmers in Mudavad shivar.Also maximum revenue is paid by these farmers who had there fields.

  5. शशिकांत दत्तात्रय शिराळकर says:
    4 years ago

    अतिशय उत्कृष्ट उपयुक्त माहिती देत आहात धन्यवाद आभारी आहे

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.