• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 30, 2021
in हॅपनिंग
0
त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) ः केंद्राच्या ज्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या सहा प्रकारच्या कृषी मालाचा समावेश केला आहे, तो अंकुश काढून घेण्यात यावा. बाजार समित्यांना पर्यायी खुली विक्री व्यवस्थेस परवागनी द्यावी. ज्या प्रकारे सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आहेत, त्याप्रमाणे या प्रश्नांवर स्वतंत्र शेतकरी न्यायालय स्थापन करावे यासारखे बदल या कायद्यात केल्यास हा कायदा शेतकर्‍यांचा हिताचा ठरेल व त्याला शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहील, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी अ‍ॅॅग्रोवर्ल्ड कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी चर्चा करताना सांगितले.
श्री. घनवट यांच्यासोबत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, यवतमाळचे विजय निवल, उत्तर महाराष्ट्र विभागाचे माजी प्रमुख कडूआप्पा पाटील उपस्थित होते. अ‍ॅॅग्रोवर्ल्डचे प्रमुख संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. घनवट म्हणाले, की शेतकर्‍यांची मुले एकत्र येतात, कंपनी देखील स्थापन करतात. मात्र, उत्पादीत झालेल्या मालाची विक्री करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः शेतकर्‍यांच्या मुलांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या फळे व भाजीपाला या शेतीमालातील काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आजही 40 टक्के शेतमाल वाया जातो. त्यामुळे नाशवंत कृषी मालासंदर्भात काढणी पश्चात तंत्रास बळकटी दिल्यास, हा शेतमाल उपयोगात येऊन शेतकर्‍यांच्या खिशात नक्कीच जास्तीचे पैसे मिळतील व त्यांच्या आर्थिक आयुष्यात बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

इथेनॉल ही काळाची गरज
शेतकरी संघटनेचे जनक शरद जोशी यांनी इथेनॉलची गरज लक्षात घेऊन 2008 मध्येच औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांना इथेनॉलची गरज व वापर याबाबत सूचित केले होते. शिवाय इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल वापरल्यास देशाची व शेतकर्‍यांची हजारो कोटींची आर्थिक बचत कशी होऊ शकते, याचे अर्थसंकल्पीय उदाहरण दिले होते. परंतु आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने इथेनॉलबाबतचा निर्णय अद्यापही सक्षमपणे लागू करण्यात आलेला नाही. तो जर पूर्ण क्षमेतेने लागू केला तर इंधन आयातीसाठी भारताबाहेर जाणारे चलन कमी होईल तसेच नाशवंत कृषी मालाच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती होऊन शेतकर्‍यांनाही अधिकचा लाभ होईल.

त्रुटी दूर केल्यास तीन कायद्यांना पाठिंबा*
कृषी कायद्यांसंदर्भात बोलताना श्री. घनवट म्हणाले, की ज्या तीन कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. जसे की आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या सहा प्रकारच्या कृषी मालाचा समावेश केला आहे, तो अंकुश काढून घेण्यात यावा. बाजार समित्यांना पर्यायी खुली विक्री व्यवस्थेस परवागनी द्यावी. ज्या प्रकारे सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आहेत, त्याप्रमाणे या प्रश्नांवर स्वतंत्र शेतकरी न्यायालय स्थापन करावे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

तरुणांना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्नशील
मध्यंतरीच्या काळात संघटनेतून अनेक जण विविध कारणांमुळे बाहेर पडले. त्यातच खुद्द शरद जोशी यांचे आजारपणामुळे झंझावाती दौेरे देखील कमी झाले. परिणामी, शेतकरी संघटनेत अलिकडच्या 20 वर्षांत खूप कमी तरुण सहभागी झाले. ही बाब लक्षात घेता, संघटनात्मक उभारणी करण्यावर आमचा विशेष जोर आहे. त्यासाठी पुन्हा दौर्‍यांचे नियोजन करुन तरुणांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही श्री. घनवट म्हणाले. अनिल घनवट यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांचेही कौतुक केले.

शेतकर्‍यांच्या गरीबीचे मूळ सरकारच्या चुकीच्या धोरणात ः सीमा नरोडे
सीमा नरोडे यांनी शरद जोशींचा दाखल देत सांगितले, की शेतकर्‍यांच्या गरीबीचे मूळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमध्ये
आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांप्रती असलेल्या धोरणात बदल केला पाहिजे असे सांगून त्यांनी शेतकरी संघटनेच्या कामात महिलांचा पुन्हा सक्रीय सहभाग वाढवणार असल्याचे सांगितले.

जी. एम. मका अमेरिकेत आठव्या स्तरावर ः विजय निवल
जी. एम. (जेनेटिकली मॉडीफाईड) पिकाबाबत माहिती देताना विजय निवल यांनी सांगितले, की कमी जागेत अधिक उत्पादनाशिवाय जगात आता पर्याय नाही. त्यामुळे जी. एम. पीक ही गरज बनली असून ती सुरक्षित देखील आहे. अमेरिकेत जी. एम. मका आठव्या स्तरावर असून आपण अद्यापही जी. एम. पिकांच्या बाबतीत बाल्यावस्थेतच आहोत. शासनस्तरावर याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. यावेळी कडूआप्पा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आनन शिंपी यांनी सूत्रसंचालन व हेमलता जावळे यांनी आभार मानले.

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनिल घनवटइथेनॉलकाढणी पश्चात तंत्रज्ञानकामगार न्यायालयकृषी कायदेजी. एम. तंत्रज्ञानपश्चिम महाराष्ट्रशरद जोशीशेतकरी संघटनासीमा नरोडे
Previous Post

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

Next Post

जळगावात रविवारी 31 ऑक्टोबरला बांबू लागवड कार्यशाळा (निःशुल्क)

Next Post
जळगावात रविवारी 31 ऑक्टोबरला बांबू लागवड कार्यशाळा (निःशुल्क)

जळगावात रविवारी 31 ऑक्टोबरला बांबू लागवड कार्यशाळा (निःशुल्क)

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.