• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

औषधी वनस्पती लागवड फायदेशीर

Team Agroworld by Team Agroworld
January 22, 2021
in तांत्रिक
0
औषधी वनस्पती लागवड फायदेशीर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. अपचन, हातपाय लचकणे, सूज, खरचटणे इत्यादी छोट्या-मोठ्या तक्रारींपासून ते बाळबाळंतिणीची काळजी संगोपन व उपचारसुद्धा अजूनही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात काही किरकोळ आजारांवर उपयोगी पडणा-या काही औषधी वनस्पतींची माहिती खाली देत आहेत. अशा प्रकारच्या वनस्पती लागवड करून शेतकरी जास्तीचे उत्पन्न तर मिळवू शकतातच शिवाय या वनस्पती पारंपारिक पिकांना एक चांगला पर्याय देखील ठरू शकतात.

अक्कलकाढा
हे लहान वर्षायू , ३० ते ४० सेंमी. उंचीचे लहान झुडूप असते. झाडाची फुले खोकल्याच्या रोगावर पानाच्या विड्यातून देतात. अकलकाढा हा नाश करण्याकरिता होतो. दात दुखत असल्यास अक्कलकाढा व कोरांटीचा पाला एकत्र कुटून दाताखाली धरावा. आवाज मोकळा होण्यास व लाळ सुटण्यास मुळाचा तुकडा तोंडात धरावा. अकलकाढा अर्धांगवायू व मजातंतूच्या रोगात अत्यंत उपयोगी, उत्तेजक व बलदायक आहे.

अडुळसा
मुळे, पाने, फुले व फळे यांचा औषधात वापर होतो. मुळ्या व पानांत वासिसीन नावाचे गुणद्रव्ये असून ते जंतुनाशक, कीटकनाशक आहे. अडुळसा, उत्तेजक, कफहारक, कफ पातळ करणारा, खोकला कमी करणारा, दमा, श्वास इत्यादींवर उपयुक्त आहे. क्षयरोग्यास फुलांचा कडेला लागवड करायला हवी. अनेक औषधी कंपन्या ओली किंवा सुकी पाने, साल घेऊ शकतात.
आघाडा
औषधांमध्ये आघाड्याचे पूर्ण पंचांग वापरतात. याच्या राखेत चुना, लोह, गंधक व मीठ ही घटकद्रव्ये असून वैद्यकीय द्रव्यात ही राख अग्रगण्य आहे. आघाडा कटू तीक्ष्ण, दीपक, आम्लतानाशक, स्वेदजनक, कपघ्न व पित्तसारक असून उंदराच्या विषावर, कुत्र्याच्या विषावर, विंचवाच्या दंशावर अशा विविध विषांवर गुणकारी आहे. रातांधळेपणावर सतत ३ दिवस संध्याकाळी भोजनानंतर १ तोळा मुळ्या खाण्यास देऊन झोपण्यास सांगावे. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खावीत.

आंबेहळद
ही हळद बागायती हळदीप्रमाणे मसाला म्हणून उपयोगात येत नाही. परंतु काही भागात याचे लोणचे घालतात . आंबेहळद रक्तविकारनाषक असून खरुज , मोच असल्यास , कोणत्याही आघाताने रक्त साकळलयास , जंत  अशा विविध व्याधींसाठी तिचा वापर होतो.
अद्रक (आले)
आले हे पाचक, सारक, अग्रेिदीपक, रुचिप्रद व कंठास हितकारक असे आहे. सूज, कफ, वायू कंठरोगास खोकला, दमा, मलबद्ध, तांती, अरुची व शूल यांचा नाश करते. आले वाळलेली सुंठ सुगंधी व उष्ण असून तिच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते व पोटातील वायूचा त्रास होत नाही.
झोपताना सुंठेचे चूर्ण खाल्ल्यास आम्लपित्ताचा त्रास होत नाही .
हळदीच्या पिकास उष्ण व कोरडे हवामानाची गरज असते. आल्याप्रमाणेच लागवड मे महिन्यात सरी-वरंब्यावर करतात. हळदीच्या प्रामुख्याने चांगल्या आहेत. हळद ही तिखट, कडू, उष्ण, रुक्ष असून कफ, वायू, रक्तदोष, कुष्ठ, कडू, प्रमेह, व्रण, सूज, पांडू, कृमी, विष, अरुची, पित्त यांचा नाश करते.

लसून
लसणाच्या सेवनाने अन्नपचन चांगले होऊन कोठा साफ राहतो. अजीर्ण, पोटदुखी, वात या विकारांवर लसूण पाकळ्या तुपात तळून खातात. घटसर्प, टी.बी., न्यूमोनिया या रोगांमध्येसुद्धा लसूण अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे त्वचारोग , लैगीक दुर्बलतेवरसुद्धा लसणाचा उपयोग होतो.कानदुखीत लसूण तेलात उकळून ते तेल सहन करू शकेल त्या तापमानात कानांत दोन ते तीन थेंब टाकतात
काळी मुसळी
काळी मुसळी स्नेहक, मूत्रजनक, बल्य व काहीशी वृष्य आहे. हिची क्रिया विशेषकरून मूत्रमार्गावर होत असते. काळ्या मुसळीची पेज परमा, मूत्रकुच्छ या रोगांवर गुणकारी आहे. काळी मुसळी बाळंतपणातसुद्धा देण्याचा प्रघात आहे
गुडमार
ही भरपूर फांद्या असणारे बहुवार्षिक वेल आहे. एप्रिल-मे महिन्यात येणारी फळे लांबट, उकलणारी, ७-८ सेंमी. लांबीची बियांवर लव असणारी असतात. अशा वेलीची लागवड बियांद्वारे किंवा छाट कलमांद्वारेसुद्धा केली जाते. या झाडाचे पान खाल्ल्याने हृदयाचे स्पंदन व लघवीचे प्रमाण वाढते. मधुमेहाच्या रोग्यांना २ ते ४ ग्रॅम वाळलेली पाने रोज खायला दिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. याचा उपयोग यकृत टॉनिक म्हणूनसुद्धा होतो. काविळीवरील आयुर्वेदीय औषधामध्ये याचा वापर होतो. गर्भाशयाचे टॉनिक म्हणूनसुद्धा गुडमार उपयोगात आणतात


गुळवेल
औषधामध्ये कडूनिंबाच्या झाडावर चढलेली गुळवेल महत्वाची समजली जाते. तसेच गुळवेलीची काढणी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यानच केली पाहिजे. गुळवेल उन्हाळ्यात पूर्णपणे पर्णविरहीत होते.खोडावरची साल पातळअसून सहज निघते. खोडास इजा केल्यास फिकट पिवळ्या रंगाचा स्राव येतो. गुळवेलीची पाने हृदयाच्या आकाराची, मोठी, चमकदार खोडावर एकाड एक असतात. फुले एप्रिल-मे महिन्यांत येत असून फळे औषधी उपयोगाचे असून ८-१० सेंमी. आकाराचे तुकडे करून ते उन्हात सुकविले जातात. लागवड करायची असल्यास खोड कलमाद्वारे निर्मिती करून नियोजित जागी लागवड करावी. गुळवेलीचे खोड चवीला कडू, होताना दिसून येतो. प्रामुख्याने जुलाब व हगवणीवर, पोटातील मुरडा, कृमी यांवर गुळवेल गुणकारी आहे. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीसुद्धा तिचा उपयोग होतो. गुळवेल विशेषतः कावीळ रोगावर लाभदायी असून, त्वचारोग निवारण व लैंगिक शक्ती वाढविण्यासाठीसुद्धा उपयोग आहे.
डिकमली
डिकमली हे लहान, बहुवर्षायू झुडूप आहे. लहान फांद्यांवर येणारा चिकासारखा पदार्थ म्हणजे डिकमली होय. निभेळ डिकमल ओलसर व विकस प्रतिबंधक कोष्ठवात, कृमिघ्न, ज्वरनाशक आहे. हिवतापात कापरे भरल्यास डिकमलोने कमी होती. आतड़याच्या रोगात डिकमली दिल्यास वायू नाहीसा होतो. गोल आकाराचे जंत पडल्यास हे उत्तम औषध आहे. मुलांना दात येताना जुलाब, उलट्या या वर डिकमली गुणकारी आहे.छाटकमल , बियांद्वारे किंवा गुटीकलमांद्वारे लागवड करता येऊ शकते.
किडामार

अनेक क्षार असणारी, अत्यंत कडू गुणकारी किडामार विविध औषधोपचारांत उपयोगात असून कष्टप्रद बाळंतपणात सुटका होण्यासाठी किडामारीचा रस किंवा चूर्ण देतात. गजकर्णावर पाने एरंडी तेलात वाटून लेप करतात. व्रणातील कृमीत मारण्यास व व्रण भरून येण्यास रस त्यावर लावतात. जनावरांच्या विषावर किडामारी पोटात देतात आणि दंशावर लेप लावतात . किडीमारांची वेल काळ्या जमिनीत तणासारखे येतात .
ज्येष्ठमध
ज्येष्ठमध हे बहुवर्षायू झुडूप असून पाने संयुक्त, फुले गुलाबीजांभळी, शेंगा चपट्या-मऊ, पण काटेरी असतात. ज्येष्ठमधाचे मूळ व जमिनीखालील खोड औषधात वापरतात. ज्येष्ठमध हे शीतल, स्नेहक, कफनाशक, मूत्रजनक व व्रणरोधक आहे. मुळे रेचक व कफ पातळ घसा खवखवत असल्यास मुळाचा तुकडा चघलण्यास  देतात. त्रिदोषशामक असून कोणत्याही रोगावर त्याचा उपयोग होतो. म्हणून सर्व प्रकारच्या काढ्यांत हा वापरतात.
माईनमुळा
माईनमुळ्याचा उपयोग रक्तदाब, हृदयरोग, श्वास घेण्यास त्रास, हृदयक्रिया बंद पडणे व काही विशिष्ट प्रकारचा कॅन्सर इत्यादी व्याधींवर होतो. सर्वसाधारणपणे या वनस्पतीस १0 ते २५ अंश से. तापमान व ८३ ते ९५ टक्के आर्द्रता मानवते. परंतु, उष्ण हवामान व कमी प्रमाणात आर्द्रता असल्यास पाणी दिल्याने वनस्पतीची वाढ चांगली होते. लागवडीस निचरा होणारी, रेताड, गाळाच्या जमिनी चांगल्या असतात. लागवड ही खोडाच्या छाट कलमाद्वारे करतात. लागवडीनंतर साधारणपणे १४o ते १५० दिवसांनी मुळे काढण्यास तयार होतात. हेक्टरी १५ किंटल ताज्या मुळ्यांचे उत्पादन होऊ शकते व मुळ्यांचा सरासरी दर ४0 रु. किलो.
निर्गुडी
सुजेवर निर्गुडीपाल्याचा शेक देतात. क्षयरोगात पंचांगांचा रस तुपाबरोबर दिल्यास गुण येतो. निर्गुडीच्या आणखी ३ प्रजाती असून साधारणतः सर्व प्रजातींचे गुणधर्म सारखेच आहेत. मुळापासून निघणा-या फुटव्यापासून लागवड करता येते.
सागरगोटी
सागरगोटीला गजगा, केंजा, काटा, करंज या नावांनीसुद्धा ओळखतात. शेंगा लांबट गोल, चपट्या, काटेरी १ ते २ बिया असणा-या असतात. पाला व बिया औषधी उपयोगाच्या आहेत. ही उष्ण, रुक्ष, कटू रक्तस्राव बंद होण्यास, सुजेवर, कानदुखीवरसुद्धा सागरगोटीचा उपयोग होतो. सागरगोटी भाजून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या १/४ हिस्सा पळसपापडी चूर्ण मिश्रण करून घेतल्यास कृमीवर गुणकारी होते. सागरगोटीची लागवड बियांद्वारे करतात. शेताला कुंपणासाठी  सागरगोटीचा लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते.
तुळस
तुळशीची पाने औषधी पानात ०.५ ते ०.७ टक्के तेल असते. तुळशीच्या तेलात युजेनॉल व लिनॅलुल ही प्रमुख गुणद्रव्ये आहेत. तुळशीच्या पानांचा उपयोग औषधाव्यतिरिक्त तेल निर्मिती करून विविध औषधी निर्माण करण्यासाठी होतो. तुळस रक्तशुद्धिकारक व हृदयबल असल्याने रक्तविकार व हृदल दुर्बलतेवर देतात. हिवताप, कफज्वर, गजकर्ण, खरूज या त्वचा रोगांवर तुळस गुणकारी आहे. मूत्रविकारात मूत्रल व पित्तनाशक म्हणून तुळशीचे बी वापरतात, तसेच तुळशीचा उपयोग उंदराच्या, मगरीच्या, विंचवाच्या व सपांच्या विषावरसुद्धा करतात.
वेखंड
औषधासाठी वेखंडच्या कंदमुळाचा वापर होतो . वेखंड कफ ,पित्त व वात नाशक असल्याने सर्दी, पडसे, डोकेदुखी, संधिवात, आमवात, सूज, उल्टी, मूळव्याध, ताप इत्यादी विकारांवर उपयोगी आहे. वेखंडाच्या वाळलेल्या कंदाची भुकटी जंतू व कीटकनाशक असून धान्यातील किडी नियंत्रणासाठी त्याचा वापर होतो. वेखडाच्या वाळलेल्या कंदामध्ये १.५ ते ३.0 टक्के सुगंधी तेले, एकोरीन, ग्लुकोसाईड्स, युजिनॉल, एसारोन, कॅपीन इत्यादी गुणद्रव्ये असतात. वेखंडाच्या लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान , भरपूर पाऊस, पाणथळ ,जमीन योग्य आहे. वेखंडाची लागवड वेखंड कंदाचे डोळेयुक्त तुकडे करून ३० बाय ३० सेंमी. अंतरावर सपाट कंद खोदून काढतात. कंद जमिनीखाली एकाच दिशेने ६० सेंमी.पर्यंत लांब वाढत असून, त्यावर तपकिरी रंगाचे आवरण असते. याची पाने ४५ ते ६0 सेंमी. लांब, उभार, गर्द हिरवी व चकचकीत दिसतात. कंदाप्रमाणेच यांनाही  सुगंध असतो.


अशोक
अशोक वृक्षाची साल ही औषधी उपयोगात येते. ही मधुर, शीत, कांती वाढविणारी आहे. सालीचा काढा मूत्राशयाच्या विकारावर व विटाळ प्रतिबंधक आहे. फुलांचे चूर्ण रक्तस्रावावर व रक्ती आमांशावर देतात. याचे अशोकधूत हे औषध प्रचलित आहे. याच्या सालीच्या अर्कामध्ये कॅन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती आहे. अशोक सालीमध्ये टॅनीन (६ टक्के), कॅटेचोल हे सुगंधी तेल, हॅमॅटोक्झीलीन, सॅपोनीन, सेंद्रिय कलश व लोह असतात .
शिकेकाई
उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूंत पिवळ्या रंगाची फुले येऊन तांबूस पिंगट रंगाच्या शेंगा लागतात. शिकेकाईच्या शेंगांचा उपयोग केस शेंगांत सेंपोनीन हे गुणद्रव्य आहे. झाडाचा पाला व शेंगाचा काढा पित कमी करण्यावर उपयोगी आहे. सूज, वात व कफ यांवरही शिकेकाई उपयुक्त आहे. लागवड करायची असल्यास शिकेकाई फोडून त्यातील बिया शेताच्या बांधावर , कुंपणावर लावाव्यात
रिठा
रिठा हासुद्धा  शिकेकाईप्रमाणे केस धुण्यासाठी , साबण,श्म्पू इत्यादींमध्ये उपयुक्त आहे. त्वचारोगात साबणापेक्षा रिठ्याच्या पाण्याने धुणे फारच चांगले असते. रिठ्याचा वृक्ष असून याची पाने उंबराच्या पानापेक्षा थोडीमोठी असतात. रिठ्याच्या आत काळे बी असते. रिठ्याच्या व स्निग्ध असून दाह, शूल्याचा नाश करतो. मस्तकशूल, अर्धशिशी अशा मस्तकरोगांत रिठ्याच्या पाल्याच्या रसात मिरी उगळून तो रस नाकात टाकतात. रिठ्याच्या लागवडीसाठी रिठ्यातून बी वेगळे करून शेताच्या
ब्राह्मी
ब्राह्मी ही जमिनीवर पसरणारी बहुवर्षीय वेल वनस्पती असून पाने हृदयाच्या आकाराची, एकाड एक व मांसल असतात. ही वनस्पती उन्माद, अपस्मारावर उपयुक्त व मन:शांती देणारी आहे. सर्वसामान्यपणे ब्राह्मीची पाने औषधात वापरतात. त्यापासून ब्राह्मीधृत, ब्राह्मीतेल, सारस्वतारिष्ठ, ब्राह्मी रसायन तयार करतात. मेंदूचे व हृदयाचे टॉनिक म्हणूनही ब्राह्मीचा आराम मिळण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी होतो. पानातील ५o टक्के अल्कोहोलमधील अर्क कॅन्सरच्या उपचारासाठी उपयुक्त आहे
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अक्कलकाढाअडुळसाअद्रक (आले)अशोकआघाडाआंबेहळदऔषधी वनस्पतीकाळी मुसळीकिडामारकृषी विभागगुडमारगुळवेलज्येष्ठमधडिकमलीतुळसनिर्गुडीब्राह्मीमहाराष्ट्र शासनमाईनमुळारिठालसूनवेखंडशिकेकाईसागरगोटी
Previous Post

चार एकरात ५४ क्विंटल हरभरा पिकविणारे शेतकरी: ज्ञानेश्वर पाटील यांची यशोगाथा

Next Post

पावनखिंड भाग – ३७ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – ३७ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.