महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित (म.म.वि.म.) (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ही कंपनी अधिनियम, १९५६ च्या अंतर्गत, ४ कोटी रुपयाच्या अधिकृत शेअर भांडवलासह, व्यावसायिक आधारावर मत्स्य व्यवसायाच्या पद्धतशीर विकासाकरिता स्थापित करण्यात आली. ३१ मार्च २०१२ रोजीच्या समयलेख्यानुसार शासनाने महामंडळास रू. ४ कोटी भांडवल वितरीत केलेले आहे. महामंडळाला राज्य शासन व केंद्र शासनाकडून वित्तीय सहाय्य, अनुदान आणि भाग भांडवलाच्या स्वरुपात प्राप्त होते. राज्य सरकार ने महामंडळाकडे सर्व व्यावसायिक आणि मत्स्यउत्पादन वाढीकरीता मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सोपविले आहेत.
म.म.वि.म. स्थापनेपासून महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागातील जवळजवळ ८ जलाशयांचे व्यवस्थापन आणि विकासाचे काम करीत आहे. याव्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या निरनिराळया योजनेअंतर्गत महाराष्ट्रीतील जलाशयांमध्ये मत्स्य बीज संवर्धन व उत्पादन वाढविणेकरीता स्थानिक सहकारी संस्थांच्या सहाय्याने प्रयत्न करीत आहे. म.म.वि.म. चे क्रमश: ससून गोदी, कुलाबा, मुंबई आणि चिखलठाणा, औरंगाबाद येथे स्वत:चे बर्फ़ कारखाने आहेत व नागपूर व कोकण विभागात कुडाळ येथे प्रत्येकी १ बर्फ़ कारखाना उभारणीचे काम सुरू आहे.
तसेच राज्यात राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळाच्या अर्थसहाय्यातून ३२ ठिकाणी आरोग्यवर्धक मत्स्य विक्री बाजारपेठ उभारणीची कामे सुरू आहेत.
महामंडळास स्थापनेच्या वेळी मंजूर अधिकृत भागभांडवल ४ कोटी मंजूर करण्यात आले महामंडळास आतापर्यंत प्राप्त २.७५ कोटी भागभांडवल महामंडळास आतापर्यंत १.१० कोटी शासनाकडून मिळालेले कर्ज महामंडळास त्यावर शासनाने १.९३ कोटी आकारलेले व्याज
- कंपनी अथवा इतर संस्थांकडून घाऊक अथवा किरकोळ पध्दतीने खरेदी केलेले मासे ताजे । गोठविलेले किंवा प्रक्रिया केलेल्या मासळीची खरेदी करणे आणि विक्री व निर्यात करणे.
- बर्फ कारखाने, शितगृह, गोठविणे केंद्रे उभारणे, ठेक्याने घेणे व मासळी साठवूणुकीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
- मासळीपासुन तयार केलेले विविध पदार्थ तयार करण्यासाठी प्रक्रीया केंद्रे (यंत्रसामुग्री) उभारणे । ठेक्याने देणे.
- मासेमारीच्या व्यवसायाकरीता लागणा-या अनुषंगीक बाबी, जसे जाळे, बोटी व वाहतुकीकरीता लागणारे ट्रक्स इत्यादी तयार करणे किंवा खरेदी करून विक्री करणे.
- नविन इमारती, कारखाने, जलक्षेत्र खरेदी करणे, भाड्याने घेणे, ठेक्याने घेणे किंवा देणगी म्हणून घेणे.
- जेटीत मासेमारांच्या बोटी बांधण्याचे कारखाने उभारण्यास मदत करणे, कंत्राटदाराकडून ते बनवून घेणे इत्यादी उद्दिष्टे समोर ठेऊन महामंडळ स्थापन केलेले आहे.
महामंडळचा कार्यकाळ
स्थापनेचा काळ | – | १९७३ ते १९७६ | |
सुप्त अवस्थेतील काळ | – | १९७७ ते १९८३ | |
पुनर्निर्मितीचा काळ | – | १९८३ ते १९९७ | |
योजनांचा काळ | – | १९९८ ते २०१० |
महामंडळास प्राप्त झालेल्या भागभांडवल (रूपये लाखात)
अ.क्र. | तपशिल | सन | वर्ष | एकूण प्राप्त भागभांडवल |
---|---|---|---|---|
१) | स्थापनेचा काळ | १९७३ ते १९७६ | ४ | १३.५० |
२) | सुप्त अवस्थेतील काळ | १९७७ ते १९८३ | ७ | ३७.५६ |
३) | पुर्नर्निर्मितीचा कालावधी | १९८३ ते १९९७ | १४ | ४१.९५ |
४) | मंत्रीमंडळाच्या बैठकीतील दि.२७.०१.१९९७ च्या निर्णयानंतरचा काळ | १९९८ ते २००२ | ५ | ७८.९३ |
५) | उपासनी समितीच्या बैठकीतील दि. १३.१२.२००२ च्या निर्णयानंतरचा काळ | २००३ ते २०१० | ७ | १०३.४३ |
एकूण : | ३७ | २७५.३७ |
महामंडळास एकूण ११०.८५ लाख कर्ज शासनाकडून प्राप्त झाले. यापैकी २७.७७ लाखाचे कर्ज महामंडळाने परत केले यावर शासनाने ३७ वर्षात महामंडळावर १९३.०५ लाख व्याज आकारण्यात आले.
सुरूवातीचे उपक्रम व कार्यक्षेत्र
- ससून गोदी, मुंबई येथील बर्फ कारखाना, शितगृह , मासे गोठविण्याचा कारखाना इ.
- तांत्रिक प्रयोगशाळा, मुंबई
- तांत्रिक प्रयोगशाळा, मुंबई
- यांत्रिक नौकाद्वारा मासेसारी.
- अलिबाग, वेंगुर्ले व मुरूड येथे बर्फ कारखाने व शितगृहे.
- मालवण येथील फिश कॅनिंग कारखाना.
- मत्स्य भूकटी तयार करण्याचा कारखाना, मुंबई.
- मासे निर्यात योजना.
- नागपूर येथील बर्फ कारखाना व शितगृह.
- विदर्भ विभागातील भुजलाशयीन मत्स्य विकास.
वरील योजना दिल्यानंतर त्या विकसित करण्याच्या दृष्टीने महामंडळाची वाटचाल सुरू असताना सन १९७६ मध्ये महामंडळाची पुनर्रचना करणेसाठी महामंडळाकडील सर्व योजना काढून घेण्यात आल्यात.
महामंडळाअंतर्गत सध्या कार्यरत योजना
- राज्यात पोशा कोळंबी बीज वितरण योजना.
- ससून गोदी येथाल ६० टनी क्षमतेचा बर्फ कारखाना.
- भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय विकास योजनेअंतर्गत ९ जलाशयाचे व्यवस्थापन .
- ससून गोदी येथे ४५० टनी शितगृह.
- भूजल मत्स्यपणन योजना व मूलभूत सुविधांचे बळकटीकरणाअंतर्गत –
- औरंगाबाद येथील १० टनी क्षमतेचा बर्फ कारखाना.
- नागपूर येथील २० टनी क्षमतेचा बर्फ कारखाना प्रस्तावित.
- नागपूर येथील दोन मत्स्यविक्रीकेंद्र व तीन मत्स्य संकलन केंद्र.
महामंडळाला सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित योजना
- गोड्या पाण्यातील मत्स्यबीजाचे वितरण.
- जलाशय विकास योजना.
- मच्छिमारांसाठी साधन सामुग्री व्यवस्थापन योजना.
- विदर्भात कुडाळ येथे ३० टनी बर्फ कारखाने उभारणी सुरू.
- मत्स्य औद्योगिक संकुल उभारणे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन